onion rate : दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 21 हजार क्विंटल पेक्षा अधिक कांद्याची आवक झाली. यामध्ये सर्वाधिक कायद्याची अवकी अहिल्यानगर पारनेर आणि दौंड या बाजारात झाल्याची पहायला मिळाले . उन्हाळी कांद्याचे बाजारात आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये देखील काही प्रमाणात स्थिरता पाहायला मिळाली. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क हटवल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांच्या मनात होती. परंतु बाजारात उन्हाळी कांदा उपलब्ध झाल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली नाही.

लाल कांद्याला सर्वाधिक दर
onion rate धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची 119 क्विंटल एवढी आवक झाली. या ठिकाणी कांद्याला कमीत कमी 1000 रुपये एवढा दर मिळाला. तर जास्तीत जास्त 1800 रुपयापर्यंत लाल कांद्याला दर मिळाला. धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी कांद्याला 1400 रुपये पर्यंत दर मिळाला आहे. हा लाल कांद्याचा दर राज्यातील इतर बाजार समिती पेक्षा चांगला असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणात का होईना दिलासा मिळत आहे.
इतर बजार समितीमधील कांद्याचे दर onion rate
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 36 कुंटल पेक्षा अधिक कांदा प्राप्त झाला. या कांद्याला सरासरी पंधराशे रुपये या प्रमाणात दर मिळाला आहे. त्या फोटो पाठव शिरूर कांदा मार्केटमध्ये देखील १३५० रुपयाचा सरासरी दर पाहायला मिळाला. या मार्केटमध्ये जास्तीत जास्त सोळाशे रुपये एवढा दर कांद्याला मिळाला आहे तर कमीत कमी पाचशे रुपये हा दर कांद्याला प्राप्त झाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी कांद्याला 1300 रुपये एवढा दर मिळाला आहे. परंतु पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वात कमी आवक झाली. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त 40 कुंटल एवढीच कांद्याची आवक झाली.
जुन्नर नारायणगाव येथे कांद्याची 56 क्विंटल एवढी आवक झाली. या बाजारात कांद्याला सरासरी 1200 रुपयांचा दर मिळाला. पारनेर बाजारामध्ये आज सर्वाधिक म्हणजेच 8233 क्विंटल ची आवक झाली. या बाजारात कांद्याला सरासरी 1250 रुपये या प्रमाणात दर मिळाला.
onion rate कांद्याच्या आजच्या दराबाबत ची माहिती आज आपण पाहिली आहे. कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांच्या मनात होती. कारण केंद्र शासनाने एक एप्रिल 2025 पासून कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याबाबतचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र शासनाने हा निर्णय घेऊन देखील कांद्याला व्यवस्थित दर मिळत नाही. शासनाने घेतलेला हा निर्णय आणि उन्हाळी कांद्याची बाजारात होणारी आवक यामुळे कांद्याच्या दरामध्ये सुधारणा होत नसल्याचे व्यापाऱ्याकडून सांगण्यात येत आहे.
onion rate उन्हाळी कांद्याचे बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्यामुळे. पुढील काही काळ देखील कांद्याचे दर हे स्थिरच पाहायला मिळतील. केंद्र सरकारने निर्यात शुल्क हटवला असला तरी देखील शेतकऱ्यांच्या कांद्याला अधिक दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना कांद्याच्या दरामध्ये सुधारणा होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते. ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवणूक करण्याची सुविधा आहे अशा शेतकऱ्यांनी आणखी काही दिवस कांदा व्यवस्थित राखून ठेवल्यास कांद्याला नक्कीच चांगला दर मिळू शकतो.