Onion Export Duty कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवला, केंद्र सरकारचा निर्णय

Onion Export Duty : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmers) सर्वात मोठी बातमी आहे. 1 एप्रिल पासून कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवला जाणार आहे. केंद्र सरकारकडून याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे .त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हे नाराज होते. उन्हाळी कांदा बाजारात दाखल होत असल्याने येत्या काळात आणखीन आणखीन भाव कमी होण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, अशातच केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. Onion Export Duty

20250323 152948

कांद्यावरील निर्यात शुल्क हटवावे अशी मागणी

मागील काही दिवसांपासून कांद्यावरील निर्यात शुल्क हटवावे अशी मागणी करण्यात येत होती. निर्यात शुल्क लावल्यामुळे कांद्याच्या दरावर परिणाम होताना पाहायला मिळत होता. याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत होता. पण आज केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 20 टक्के निर्यात शुल्क (Onion Export Duty) हटवण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबर राज्यातील शेतकऱ्यांसह देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पण फायदा होणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले आहे.Onion Export Duty

हे वाचा : मागील वर्ष भरात सोन्याच्या भावात किती रुपयांची झाली वाढ

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

1 एप्रिल 2025 पासून कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवला जाणार

केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क (Onion Export Duty) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले, एक एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. लासलगाव आणि पिंपळगाव या ठिकाणाहून सर्वात जास्त प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. जगभरात सर्वात अधिक कांदा महाराष्ट्रातून निर्यात होतो. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा खूप महत्त्वाचा निर्णय घेत राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) मोठा दिलासा दिल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहा यांचे अत्यंत आभारी असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे .

कांद्याला योग्य भाव मिळण्याचा मार्ग मोकळा

महाराष्ट्रातील (Maharshtra Farmer) कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारा हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे . कांदा निर्यातीवरील 20 टक्के निर्यात शुल्क 1 एप्रिल 2025 पासून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे . त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे . त्यामुळे राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे . केंद्र सरकारने हा घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे . निर्यातीवर आकारण्यात येणारा 20 टक्के निर्यात शुल्क (Onion Export Duty) हटवण्यात आल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेतकऱ्यांचा हा प्रश्न सुटावा यासाठी मी केंद्रीय सरकार मंत्री अमित शहा साहेबांसोबत थेट संवाद साधून त्यांना याबाबत लक्ष घालवण्याची विनंती केली होती .महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यावरील लवकरात लवकर उपाय योजना करण्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी पुढाकार घेत ,पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे मी त्यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनःपूर्वक आभार मानतो. राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या (Farmers) हितासाठी कटिबद्ध असून, भविष्यातही शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील.” असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले आहे.Onion Export Duty

Leave a comment