Farmer income: शेतकऱ्यांवर विविध नैसर्गिक आपत्तीचा मारा होतो. ज्यामधून शेतकऱ्याचे पीक उध्वस्त होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीव होण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न मातीमोल होऊन जातात. यामुळे शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणावर कर्जाचा डोंगर वाढत राहतो. विविध आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याचे आपण नेहमीच पाहतो. याच अशा आपत्तीला कंटाळून अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे देखील आपण पाहिले आहे. खरंच शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीचे असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. सरकारच्या एका अहवालाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न 4747 असल्याची माहिती उघड झाली आहे.

या आकडेवारीनुसार राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न हे शेतमजुरा पेक्षा देखील कमी असल्याचे उघड झाले आहे. राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर सरासरी पाचशे रुपये प्रति दिन या प्रमाणात शेतमजुरांना मजुरी मिळते. त्यानुसार जरी पकडलं तरी मजुरांना महिन्याला पंधरा हजार रुपये या प्रमाणात उत्पन्न मिळते. परंतु राज्याची अर्थव्यवस्था सांभाळणारा आणि दिवस-रात्र मेहनत करणारा शेतकरी मात्र चार हजार सातशे रुपये महिना या प्रमाणात उत्पन्न मिळवतोय. खरंच आपला देश कृषीप्रधान म्हणता येईल का हा प्रश्न देखील सतावत आहे?
राज्यातील शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न
राज्यातील शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न हे 4747 रुपये असल्याचे लोकसभेत बोलताना कृषी राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांनी माहिती दिली. याचवेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याची देखील माहिती दिली. लोकसभेमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्नाची माहिती सादर करताना राज्याच्या शेतकऱ्यांना प्रति महिना किती उत्पन्न मिळते याची आकडेवारी जाहीर करण्यात आली.
Farmer income निव्वळ शेतीतून मिळणारे उत्पन्न
देशातील निवड शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आकडा फारच कमी आहे. या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार देशातील शेतकऱ्यांना सरासरी 3798 रुपये मासिक उत्पन्न मिळते. यामध्ये पहिल्या क्रमांकावर मेघालय हे राज्य आहे. मेघालय राज्यातील शेतकऱ्यांना प्रति महिना 21 हजार 60 रुपये या प्रमाणात उत्पन्न मिळते. मेघालय पाठोपाठ पंजाब 12597 त्यानंतर हरियाणा 9092 आणि कर्नाटक 6835 या प्रमाणात मासिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते.
इतर राज्यातील शेतकऱ्यांचा निवड शेतीतून मिळणारे उत्पन्न अत्यंत कमी आहे. सर्वात कमी शेतकऱ्यांना मिळणारे मासिक उत्पन्नामध्ये पश्चिम बंगाल येथील शेतकऱ्यांना मासिक 1547 रुपये एवढा आर्थिक लाभ होतो. तर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना महिन्याला 4747 रुपये एवढा आर्थिक लाभ प्राप्त होतो.
शेती पेक्षा मजुरी बरी
दिवस-रात्र जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न 4747 रुपये आहे. आणि वेळेवर जाऊन वेळेवर परत येणाऱ्या मजुराला प्रति दिवस पाचशे रुपये याप्रमाणे महिन्याला पंधरा हजार रुपये कमवण्याची संधी मिळते. या अहवालातून उघड झालेल्या या आकडेवारीनुसार राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती मजुरा पेक्षा देखील हालाखीची झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या मनामध्ये शेती सोडून मजुरी करावी असा विचार निर्माण होऊ शकतो.
दिवसेंदिवस वाढती महागाई शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ करत आहे. त्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतमालाला व्यवस्थित भाव मिळत नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च अधिक होऊन शेतकऱ्याचे उत्पन्न घटत आहे. या समोर आलेल्या अहवालातील आकड्यानुसार शेतकऱ्यांना शेतीपेक्षा मजुरीच फायद्याची असल्याचे उघड झाले आहे.
पाच दिवस मजूरी केली तरी जास्त उत्पन्न
या अहवालातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना महिन्याला 4747 रुपये आर्थिक लाभ मिळतो. यामध्ये जर पाहिलं तर रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना देखील यापेक्षा अधिक महिन्याला आर्थिक लाभ मिळतो. त्या समवेतच शेतकऱ्यांनी शेतमजुराप्रमाणे महिन्याकाठी दहा दिवस जरी काम केले तरी देखील शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्राप्त होऊ शकतात. या आकडेवारीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या मनात शेती सोडून मजुरी करण्याचा विचार निर्माण होत आहे.