तुषार सिंचन अनुदान योजना

तुषार सिंचन अनुदान योजना

       शेतकरी बांधवांनो आपले बरेच शेतकरी बांधव  वेगवेगळ्या नवनवीन लेखा विषयी माहिती घेत आहेत आणि लेखातल्या प्रत्येक योजनांचा लाभ घेत आहेत. आज आपण तुषार सिंचन अनुदान योजना या योजनेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. शेतकरी बांधव आपल्या शेतीसाठी तुषार सिंचन करत आहेत.  जसं की शेतकरी बांधव आपल्या पद्धतीने शेती करतात त्याच्यापेक्षा व्यतिरिक शेती विषयी माहिती घेऊन जर आधुनिक प्रकारची शेती केली तर आपल्या शेतकरी बांधवांना जास्त प्रमाणामध्ये उत्पन्न मिळते. तसंच आपण आपल्या शेतासाठी पाणी सुद्धा वेगळ्या पद्धतीने वापरलं जातं आहे.  तुषार सिंचन च्या माध्यमातून आपण कमी पाण्यामध्ये आपले पीक जोमदार अनू शकतोत. यासाठी तुम्हाला सरकार कडून  तुषार सिंचन अनुदान मिळत आहे. महा डी बी टी योजनेमार्फत तुषार सिंचन अनुदान योजना सध्या वाढलेली पण आहे. ही माझ्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बाब आहे. तुषार सिंचन संचासाठी सरकारकडून जास्त अनुदान दिले जाणार आहे. याची माहिती माझ्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त माहित असायला हवी. शेती सिंचनाखाली आणण्याकरिता माझे बरेच शेतकरी बांधव तुषार संच खरेदी करण्याकरिता इच्छुक आहेत.

      राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आर्थिक भार कमी करण्यासाठी, सरकार कडून मुख्यमंत्री सिंचन शाश्वत सिंचन योजनेद्वारे तुषार सिंचनाकरिता पुरेपूर पूरक अनुदान शेतकरी बांधवांना देण्यासाठी पाऊल उचललेला आहे. शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. बरेच शेतकरी बांधवांच्या जमिनी खडकाळ आहेत अशा शेतकरी बांधवांना त्यांच्या विहिरींना बोरवेल ला पाणी कमी पडते अशावेळी शेतकरी बांधव तुषार सिंचनाचा पुरेपूर फायदा घेऊ शकतात. कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन घेऊ शकता. तुषार सिंचन पद्धतीमध्ये पंप पाईप द्वारे, पिंकलद्वारे आपल्या शेतातल्या पिकाला पाणी दिले जाते. तुषार जलसिंचनाचा उपयोग शेतीसाठी तसेच औद्योगिक व्यवसायासाठी  केला जातो.

तुषार सिंचन अनुदान योजना

       तुषार सिंचन ज्यावेळेस चालू असते त्याच्या पंपाच्या साह्याने पाणी दिले जाते. त्यावेळेस त्या गोल गोल फिरणाऱ्या नोजल मधून नाजूक रिमझिम पाऊस आल्यासारखे पाणी आपल्या पिकावर पडत असते तुषार सिंचन घेतल्यामुळे पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होते त्यामधून उत्पन्नही चांगले वाढते. शेतकऱ्यांना पाठ पानी देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट करावे लागते. तुषार सिंचन अनुदान योजना च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्याचा सरकार चा हेतु आहे.

योजनेचे नाव

तुषार सिंचन अनुदान योजना

योजना राबवणारे राज्य

महाराष्ट्र

लाभार्थी

महराष्ट्रातील शेतकरी.

योजने अंतर्गत मिळणार लाभ

एकूण रकमेच्या 40 टक्के

योजनेचा विभाग

कृषि विभाग महाराष्ट्र राज्य

अधिकृत संकेतस्थळ

https://mahadbt.maharashtra.gov.in/

योजनेचे उदिष्ट

पाण्याचा कमी वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे.

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाइन

तुषार सिंचन अनुदान योजना स्वरूप

 वेगवेगळ्या पद्धतीने आधुनिक तंत्राचा वापर करणे  जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे आधुनिक तंत्रावर कृषी उत्पादनाचा विकास करण्यासाठी सुषमा सिंचन पद्धतीने विकसित करणे. अल्प अत्यल्पभूधारक किमतीच्या 75 टक्के किंवा एकूण एकूण रक्कम 57 हजार पर्यंत अनुदान दिले जात आहे. तुषार सिंचन पद्धती करिता दोन हेक्टर एका संचाकरिता अर्थसहाय्य दिले जात आहे.  बाकी शेतकऱ्यांना 50% किंवा 38 हजारापर्यंत अनुदान दिले जाते तुषार सिंचन क्षेत्र  अनुदान: प्रती संच नुसार 75% नुसार – 18,145 रुपये अनुदान:80% नुसार- 20000  रुपये खर्च मर्यादा: (75mm):- 24,194 रुपये.

तुषार सिंचन अनुदान योजना उद्दिष्ट

 1. पाणी वापरण्याच्या पद्धतीमध्ये वाढ करणे.
 2. कृषी फलोत्पादन करण्याकरिता त्याचा विकास करण्याकरिता वेगवेगळ्या आधुनिक तंत्राचा वापर करणे
 3. सूक्ष्म सिंचन पद्धतीला चालना  देणे.   
 4. शेतकरी बांधवांचे उत्पादन वाढवणे.
 5. त्याचबरोबर कृषी उत्पादनाची गुणवत्ता वाढवणे.
 6. तुषार सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यांमध्ये आधुनिक तंत्राचा वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करणे.
 7. सूक्ष्म सिंचनखाली शेती क्षेत्राची वाढ करणे.

तुषार सिंचनाच्या समाविष्ट बाबी

 • सूक्ष्म तुषार सिंचन
 • मिनी तुषार सिंचन.
 • हलविता येणारे तुषार सिंचन.
 • मिस्टर रेनगन.
 • सेमी परमनंट इरिगेशन सिस्टीम.

आवश्यक कागदपत्रे

 • आपल्या शेतकरी बांधवांकडे कायमस्वरूपी ची वीज जोडणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वीज बिलाची चालू पावती सादर करणे महत्त्वाचे आहे.
 • लाभार्थी शेतकऱ्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थी शेतकऱ्याकडे 7/12 उतारा 8अ उतारा असणे आवश्यक आहे.
 • आधार कार्ड असणे आवश्यक आहे
 • कंपनीच्या प्रतिनिधीने तयार केलेला सूक्ष्म सिंचन आराखडा .
 • बँक पासबुक असणे आवश्यक आहे.  
 • पाणी व मृदा तपासणी अहवाल.
 • मोबाइल क्रमांक
 • ईमेल आयडी
 • पासपोर्ट साइज फोटो.
 • क्षेत्र ओलिताखाली असल्याचे स्वयं घोषणा पत्र.  

तुषार सिंचन अनुदान योजना अर्ज प्रक्रिया

आपले बरेच शेतकरी बांधव असे आहेत की त्यांना अर्ज कसा करावा हे माहीत नसते अर्जाची प्रक्रिया कशी आहे. हे सुद्धा आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत

 • शेतकरी बांधवांना सर्वप्रथम https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या पोर्टल वर  जायचं आहे.
 • त्या संकेतस्थळावर गेल्यावरती सर्वप्रथम तुमच्या आधार कार्डचा मदतीने तुमचं नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यायचा आहे.
 • आपल्या समोर एक फॉर्म ओपन होईल
 • त्या फॉर्म मध्ये सविस्तर माहिती भरावी लागेल.
 • सर्व माहिती भरल्या नंतर तुमचा अर्ज अपलोड करायचा आहे

निष्कर्ष

 सिंचन केल्यामुळे उत्पन्न वाढते आणि आपला पिक उत्पादनाचे विश्वासार्था संचित होते. बागायती जमिनीवर 40% अन्न पिकवले जाते. याचा वाटा जगातील 20 टक्के जमिनीचे पीक उत्पादन काढण्यासाठी वापरला जातो तुषार सिंचन माध्यमातून आपण ज्या पाण्याचा अचूक पद्धतीने वापर करतो त्याचा योग्य पद्धतीने वापर करण्यास मदत करते. सिंचनासाठी सरळ साधेपणाने वापरत आलेल्या 40% पाण्याची बचत होते. तुषार सिंचन हे नैसर्गिक रिमझिम पाऊस म्हणून शिंपडते स्प्रिंकलर वाहत्या पाण्याचे थेंब फोडटतात आणि पावसासारखे थेंब या फवारणीतून पडतात. ज्या मुले हवेतील घटक पिकाला सहज उपलब्ध होतात. आपल्या पिकाच्या उत्पन्नात भरघोस अशी वाढ आपणास मिळते.  

   आपणास तुषार सिंचन अनुदान योजना मधील फायदे तसेच आवश्यक कागदपत्रे या विषयी सर्व माहिती आपणास दिलेली आहे. आपणास लाभ घ्यायचा असल्यास आपण त्वरित अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. अर्ज करताना किंवा कागदपत्रा बद्दल आपणस काही अडचण असेल तर तुम्ही तुमच्या जवळील सीएससी सेंटर वर जाऊन अधिक माहिती घेऊ शकतात. आपणास अर्ज करताना काही अडचण आली तर आपण आम्हाला संपर्क साधू शकतात. आम्ही आपणास नक्कीच मदत करू.

   चला तर मग शेतकरी बांधवांनो तुम्ही कोणतेही योजनापासून पासून वंचित राहणार नाही शेतकरी बांधवांची हरली आता चिंता बांधवानो तुम्ही निश्चित रहा   वेगवेगळ्या योजनांची नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा काम मराठी तंत्रज्ञान माहिती करत आहे

FAQ

 1. तुषार सिंचन म्हणजे काय?
 •    पिकांच्या झाडांच्या मुळशी  रिमझिम नोजल द्वारे पावसासारखी फवारणी होते
 1. तुषार सिंचन योजनेमार्फत शेतकऱ्यांना किती टक्के अनुदान दिले जाते?
 •  भूधारक शेतकऱ्यांसाठी 55% तसेच अन्य भूधारक शेतकऱ्यांना 45% अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
 1. तुषार सिंचनासाठी शेतकऱ्याला येणारा खर्च किती?
 • पाणीपुरवठा व्यवस्थापासून तुषार सिंचनाच्या प्रणालीच्या स्थानापर्यंत एकूण खर्च 61,300  इनर प्रति एकर आहे

2 thoughts on “तुषार सिंचन अनुदान योजना”

 1. Pingback: शेती तार कुंपन योजना महाराष्ट्र Tar Kumpan Yojana - Marathitantradnyanmahiti.com

 2. Pingback: Rte Maharashtra योजना अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे 2024

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *