Table of Contents
Toggleपीक कर्ज योजना
भारतात शेती हा सर्वात मोठा व्यवसाय आहे. देशात शेती ही आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे . आपल्या देशात 70% पेक्षा जास्त कुटुंबे शेतीवर जीवन जगत आहेत. आपल्या देशाचे 2017-18 मध्ये अन्नधान्याचे उत्पादन 275 दशलक्ष टन इतके होते.
आपल्या गरीब शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतीच्या कामासाठी मदत करण्यासाठी आपल सरकार अनेक ऑफर आणि सुविधा उपलब्ध करुन देत आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदतीची गरज असते जसे की आधुनिक उपकरणे, सिंचन, खते, बियाणे, जमीन कर्ज, पशुधन खरेदी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पीक कर्ज योजना हे या सर्वांसाठी गरजेचं आहे.
अल्प-मुदतीचा आगाऊपणा हा ऐक पीक कर्जाचा प्रकार आहे. जो शेतकऱ्यांच्या भागांमधील प्राथमिक सहकारी संस्थांनी मिळुन लागवडीचा खर्च भरून काढण्यासाठी पीक कर्ज दिले जाते. याचा उपयोग उत्तम खते, बी बियाणे, औषधे इत्यादीची खरेदी करण्यासाठी वापर करता येतो. आणि पिकाची कापणी केल्यास या कर्जाची परतफेड करू शकतो.
पीक कर्ज योजना रक्कम ही आपण लावणी केलेल्या पिकाचा प्रकार आणि क्षेत्रपाहून निश्चित केली जाते. त्या विशिष्ट क्षेत्रातीलप्रत्येक पिकासाठी गरजेचे असलेल्या वित्तपुरवठयाचे प्रमाण जिल्हा तांत्रिक समिती (DTC) ही निश्चित करते. पीक कर्जाची रक्कम त्यांच्या अहवालावर आधारित असते.
योजनेचे नाव | पीक कर्ज योजना
|
योजना कोणामार्फत राबवली जाते | राज्य सरकार |
लाभार्थी | महाराष्ट्रातील शेतकरी |
लाभ | तीन लाख रुपये पर्यन्त बिनव्याजी कर्ज |
योजनेचा विभाग | कृषि विभाग महाराष्ट्र सरकार |
योजनेचे अधिकृत संकेतस्थळ | |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन / ऑफलाइन |
योजनेचा उद्देश | महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शेती पीक काढण्यासाठी आर्थिक मदत करणे. |
पीक कर्ज योजना उद्दिष्टे :-
- राज्यातील शेतकरी बांधवांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे.
- राज्यातील नागरिकांना शेतीकडे आकर्षित करणे.
- शेतकरी बांधवांनच्या डोक्यावरचा व्याजाचा बोजा कमी करणे.
- पीक कर्ज या योजनेअंतर्गत आपल्या शेतकरी बांधवांन चे जीवन मान सुधारणे तसेच शेती करण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी आत्मनिर्भर बनविणे.
- शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी आवश्यक पैशांसाठी कोणाकडून जास्त व्याजदराने पैसे उधार घेण्याची गरज भासु नये या हेतूने पीक कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे.
- शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठीसशक्त व आत्मनिर्भर बनविणे व तसेच आथिर्क स्थितीमध्ये विकास करणे हे उद्दीष्टे आहे
पीक कर्ज योजना वैशिष्टे
- महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाकडून पीक कर्ज योजना ही राबवण्यात आली आहे.
- पीक कर्ज योजने मार्फत शेतकरी बांधवांना त्यांच्या क्षेत्रातील बँके द्वारे बिनव्याज कर्ज दिले जात आहे. व त्यावर महाराष्ट्र शासन देखरेख करत आहे.
- पीक कर्ज या योजने मार्फत दिली जाणारी कर्जाची रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येत आहे.
- पीक कर्ज योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ठेवण्यात आली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही बँकेत फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. त्यामुळे शेतकरी बांधवांचा वेळ आणि पैसा दोन्ही ही वाचेल.
पीक कर्ज योजना पात्रता
- वय 18-70 वर्षे
- अर्जदार शेतकरी बांधव हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.
- शेतकरी बांधव हा जमिनीचा स्वता मालक असणे गरजेचे आहे.
- जमिनीचा वापर पिके घेण्यासाठी करत असला पाहिजे.
- शेतकरी बांधवांनी पीक विमा काढणे आवश्यक आहे.
- शेतकरी बांधवान कडे कर्ज फेड करण्याची क्षमता आहे हे सिध्द व्हायला हवे
पीक कर्ज योजनेसाठी कागदपत्रे:-
- सातबारा उतारा (7/12 उतारा)
- खाते उतारा (8 अ उतारा)
- सोसायटीचे कर्ज नसलेले प्रमाणपत्र
- आपल्या परिसरातील कोणत्याही बँकेचे कर्ज घेतले नसलेला दाखला.( नो ड्युज सर्टिफिकेट)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँकेचे खाते
- मतदार ओळखपत्र
- पासपोर्ट फोटो
पीक कर्ज योजनेची अर्ज प्रक्रिया :-
पीक कर्ज योजना
प्रत्येक राज्यात व जिल्यात वेगवेगळी पद्धत आहे. काही राज्यांमध्ये व जिल्ह्यांमध्ये ऑनलाइन पद्धतीने पीक कर्ज योजनेचा अर्ज करावा लागतो तर काही जिल्ह्यांमध्ये ऑफलाईन पद्धतीने बँकांकडे जाऊन अर्ज केला जात आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना जर पीक कर्ज मिळविण्यासाठी अर्ज करायचा आहे तर आधी चेक करा की तुमच्या राज्यात किंवा जिल्ह्यात कोणती पद्धत आहे ऑनलाइन की ऑफलाईन आहे. जी पद्धत असेल त्या पद्धतीने वरील दिलेल्या कागदत्रांद्वारे अर्ज करावा.
पीक कर्ज योजनेचे निष्कर्ष:-
पीक कर्ज योजना ही भारतात खास कृषी क्षेत्रासाठी केली आहे. पीक कर्ज हे कृषी वित्त व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हे कर्ज शेतकरी बांधवांना चालू ठेण्यासाठी शेतीमध्ये आवश्यक असलेल्या हंगामी घटकांचा वापर करण्यासाठी आवश्यक आहे. शेतकरी बांधवांना किसान क्रेडिट कार्ड हे त्यांच्या घरगुती खर्च भागवण्यासाठी देखील हे वापरण्यास परवानगी देत आहे. जे पिकाची कापणी होई पर्यंत उत्पन्न म्हणून शेतकरी बांधवांनची मदत करत आहे.
FAQ
- पीक कर्ज म्हणजे काय?
पीक कर्ज हे शेतकरी बांधवांच्या लागवडीशी आधारित असलेले खर्च भागवण्यासाठी हे कर्ज दीले जाते.
- पिक कर्ज योजना ही शासन मान्य आहे?
होय. ही योजना महाराष्ट्र राज्यांच्या कृषी विभागाकडून शेतकरी बांधवांन च्या हितासाठी केली गेली आहे.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
4 thoughts on “शेतकऱ्यांच्या फायद्याची पीक कर्ज योजना”