Crop Insurance – शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपया मध्ये पिक विमा
शेतकरी बांधवांनो crop insurance – राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपयांमध्ये पिक विमा. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प 2023 मध्ये एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांना पिक विमा crop insurance मिळणार याची घोषणा केली.राज्यातील शेतकऱ्यांना आता एक रुपयांमध्ये पिक विमा मिळणार आहे बाकीचा हिस्सा राज्य शासन स्वतः भरणार आहे.अशी घोषणा 2023 चा अर्थसंकल्पात अर्थमंत्री माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली होती परंतु त्याचा शासन निर्णय आलेला नव्हता. दिनांक 23 जून 2023 रोजी शासनाने, सर्व समावेशक crop insurance-पिक विमा योजना राबवण्यास मान्यता देणे बाबत चा शासन निर्णय तयार केलेला आहे.
या योजनेसाठी ३३१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे असेही अर्थमंत्र्यांनी सांगितले होते.प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०१६ पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना राज्यात राबविण्यात येत आहे प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या संदर्भात क्रमांक एकच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये मुद्दा क्रमांक 13. 1. 10. राज्य शासन शेतकऱ्यांच्या विमा हप्ता रक्कम भरणार असेल तर इलेक्ट्रॉनिक ट्रेकिंग व नाव नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यामार्फत विमा हप्त्याच्या ऐवजी किमान एक रुपयाचे टोकण अनिवार्य पणे स्वीकारले जाईल त्या अनुषंगाने माननीय अर्थमंत्री यांनी 2023 24 चा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा योजनेचा लाभ देण्याकरिता एक रुपयात पिक विमा या योजनेची घोषणा केली केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनानुसार. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे.
सर्वसमावेशक पिक विमा योजना राबविण्याच्या प्रस्तावास दिनांक 30 मे 2023 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.
Crop Insurance पिक विमा जोखीम मध्ये या बाबीचा समावेश असेल
1) हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यास मुळे होणारे नुकसान.
2) पिकाच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान.
3) पीक पेरणी पासून काडणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट वादळ, चक्रीवादळ ,पूर ,क्षेत्र जलमय होणे व भु्खलन ,दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट.
4) स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान.
5) नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काडणी पश्चात नुकसान.
अशी असेल नवीन Crop Insurance योजना
शेतकऱ्याला पिक विम्याचा दोन ते पाच टक्के भरणा भरावा लागत होता त्या अनुषंगाने शेतकऱ्या वरचा बोजा कमी करून शासनाने शेतकऱ्याला एक रुपयांमध्ये पिक विमा काढण्याची योजना आखलेली आहे या योजनेअंतर्गत पीक विम्याचा भरणा राज्य शासनामार्फत केला जाईल.
pik pera – पिक पेरा 2023
या ठिकाणी Crop Insurance साठी करू शकता आपण अर्ज .
केंद्र शासनाचे पिक विमा पोर्टल, सामायिक सुविधा केंद्र, बँक इत्यादी मार्फत आपण अर्ज करू शकतो.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
Vima Milne babat
कोणत्या वर्षी चा विमा नाही मिळाला आपल्याला
लहू गोरख आबुज रा.रंजेगाव पोस्ट नाथापुर तालुका बीड
जिल्हा बीड