पंचायत समिती कुक्कुटपालन योजना अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे

पंचायत समिती कुक्कुटपालन योजना

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

महाराष्ट्र मध्ये वेगवेगळे योजना राबवल्या जातात. तर तशीच आज आपण एक राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत ते योजनेचे नाव आहे कुक्कुटपालन योजना. ही योजना महाराष्ट्र मध्ये राज्य सरकारने एक नवीन रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे किंवा असे बरेच विद्यार्थी असे असतात की शिक्षण पूर्ण होऊन सुद्धा त्यांना नोकरी लागत नाही. अशा मुलांना हा कुकुट पालन व्यवसाय खूप फायदेशीर ठरते या व्यवसायापासून एक चांगली रोजगार संधी निर्माण होते आणि स्वतःचा व्यवसाय पण होतो. आशा इच्छुक युवकांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी राज्य सरकारने पंचायत समिती कुक्कुटपालन योजना सुरुवात करण्यात आली या योजनेसाठी अनुदान दिले जाते जेणेकरून हा व्यवसाय ज्याला सुरू करायचा आहे त्यांना पैशाची अडचण येऊ नये म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.

चला तर आपण आज या लेखांमध्ये या योजनेची माहिती ,वैशिष्ट्ये ,लाभ ,पात्रता, आवश्यक लागणारे कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत , या सर्वांची माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा आणि अशा लोकांना या योजनेची माहिती द्या ज्यांना कुक्कुटपालन व्यवसाय करण्याची इच्छा आहे.

पंचायत समिती कुक्कुटपालन योजना माहिती

महाराष्ट्र राज्यातील कुकुट पालन योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली.

या योजनेचा फायदा हा शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी नोकरांनी तरुण आणि ग्रामीण महिला यांच्या फायदे आहेत या योजनेअंतर्गत बँक कर्ज आणि अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत करते. कुकुट पालन योजना मास आणि अंडी उत्पादन वाढवते ज्यामुळे राज्यातील अन्न सुरक्षा अधिक मजबूत होते. या योजनेमुळे रोजगार वाढ होईल.

पंचायत समिती कुक्कुटपालन योजना

योजनेचे नाव

पंचायत समिती कुक्कुटपालन योजना

कोणामार्फत राबवली जाते

महाराष्ट्र राज्य सरकार

योजनेचा उद्देश

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना कुक्कुटपालन करण्यासाठी आर्थिक अनुदान देणे.

अर्ज प्रक्रिया

ऑफलाइन / ऑनलाइन

योजनेचा विभाग

कृषी ,पशुसंवर्धन ,दुग्ध व्यवसाय, विकास व मत्स्यव्यवसाय विभाग.

लाभ

1 लाख 60 हजार पर्यंत आर्थिक अनुदान.

लाभार्थी

महाराष्ट्र राज्यातील नागरिक

अधिकृत संकेतस्थळ

https://ahd.maharashtra.gov.in/

 

पंचायत समिती कुक्कुटपालन योजना उद्देश

रोजगार निर्मिती

राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे, या योजनेअंतर्गत बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. शेतकऱ्यांसाठी तसेच ग्रामीण व्यवसायिक बेरोजगार मुलांना कुकुट पालन योजना खूप फायद्याचे ठरेल.

उत्पादनात वाढ

या योजनेअंतर्गत भारताच्या वाढत्या लोकसंख्येत सोबत यासह इतर पोल्ट्री उत्पादन वाढविण्यासाठी भर  देण्यात येते तसेच बाजारपेठेतील वाढत्या मागण्या त्या पूर्ण करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. हा व्यवसाय निर्माण करणाऱ्यांसाठी आवश्यक पायाभूत  सुविधांची निर्मिती शासनामार्फत करून दिली जाते, अन्नसुरक्षा सुरक्षेला चालना मिळते.

कौशल्य विकास व क्षमता वाढीवर भर

या योजनेअंतर्गत लाभार्थी गट , शेतकरी कौशल्य विकास आणि क्षमता निर्माण करून त्यांना प्रोत्साहन देऊन. कुक्कुट पालन व्यवस्थापनांच्या पेलूंची सविस्तर माहिती देणे, कार्यशाळा आणि प्रात्यक्षिक प्रदान करताना, ज्यामध्ये जातीची निवड ,आहार, रोग ,नियंत्रण आणि विपणन इत्यादी  बाबींचा समावेश यात येतो.

तंत्रज्ञान

उत्पादकता, कार्यक्षमता आणि नफा सुधारण्यासाठी कुकूटपालनामध्ये आधुनिक आणि वैज्ञानिक तंत्राचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करतात. पोल्ट्री फार्मची एकूण कामगिरी वाढवण्यासाठी प्रगत उपकरणे, सुधारित जातीच्या वापराला प्रधान्य देणे.

बाजारपेठ आणि उत्पादनाचे मूल्यवर्धन

कुकुट पालन योजनेचा उद्देश  पोल्ट्री  उत्पादनासाठी मार्केट आणि उत्पादनाचे मूल्यवर्धन करणे, लाभार्थ्यांना आणि तसेच शेतकऱ्यांना बाजारपेठेमध्ये मिळवून देण्यास मदत करणे. स्वयंपाकासाठी तयार पदार्थ तसेच पोल्ट्री प्रक्रिया उद्योग स्थापना करणे उदा. पॅकेज अंडे तसेच कुक्कुटपालनावर आधारित  मूल्यवर्धित उत्पादनाच्या वाढीस प्रोत्साहन देऊन त्यास बाजारपेठ उपलब्ध करून देणे.

महाराष्ट्रातील कुक्कुटपालन योजनेचा उद्देश ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासातील योगदान देणे, कुक्कुटपालन उत्पादन आणि पौष्टिक अन्नाची उत्पादनात वाढवणे आणि व्यवसाया त गुंतलेल्या शेतकऱ्यांना आणि उद्योगजनाचे जीवनमान सुधारणे हा या योजनेचा उद्दिष्ट आहे

पंचायत समिती कुक्कुटपालन योजना वैशिष्ट्ये

 • या योजनेची सुरुवात पशुसंवर्धन विभागाद्वारे करण्यात आलेली आहे.
 • जिल्हा परिषद ,अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन हे या योजनेचे अंमलबजावणीची अधिकारी राहतील.
 • जे व्यक्ती  स्वतःच्या व्यवसायाचे स्वप्न बघत आहेत त्या व्यक्तींसाठी, नागरिकांसाठी ही एक उत्तम योजना आहे.
 •  कुक्कुटपालन योजना अंतर्गत दिली जाणारी अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात DBT च्या साह्याने जमा करण्यात येते.

पंचायत समिती कुक्कुटपालन योजना पात्रता

 • या योजनेअंतर्गत लाभार्थ्याचे वय साधारणपणे 18 ते 60 दरम्यान असावे.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे अनिवार्य आहे.
 •  या योजनेमध्ये पात्रता असलेले लाभार्थी नोकरी नसलेले तरुण, शेतकरी, कोंबडी पालनाची आवड असलेल्या महिला किंवा भूमिहीन मजूर उद्योजक.
 •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोल्ट्री हाऊस बांधण्यासाठी तुम्हाला योग्य जमिनीची आवश्यकता असेल.
 • जमीन ही लाभार्थ्याच्या किंवा जवळच्या नातेवाईकाच्या मालकीची असावी.

कुक्कुटपालन योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या पक्षांच्या जाती

 1.  ब्लॅक
 2. अस्ट्रॅलॉप
 3. आयआयआर
 4. गिरीराज
 5. कडकनाथ
 6. वनराज

 इत्यादी शासनमान्य जातीचे पक्षी

पंचायत समिती कुक्कुटपालन योजना लाभ

 • कुक्कुटपालन योजना अंतर्गत राज्यातील बेरोजगारी कमी होईल.
 •  या योजनेअंतर्गत राज्यात रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होण्यास मदत होईल.
 • कुक्कुटपालन योजना अंतर्गत पशुपालनाला एक चालना मिळेल.
 •  या महाराष्ट्र राज्यातील जर एखादा व्यक्ती स्वतःचा एखादा उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक आहे. तो या योजनेच्या सहाय्याने कुक्कुटपालन  व्यवसाय सुरू करू शकतो.
 • या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखाली लाभार्थी, भूमिहीन शेतमजूर, मागासवर्गीय, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कुक्कुटपालन योजना अंतर्गत मास आणि अंडी विकून आर्थिक उत्पन्न मिळू शकतो.
 •  कुक्कुटपालन हा एक शेती सोबत जोडधंदा म्हणून सुरू करता येईल ज्यामुळे लाभार्थ्यास आर्थिक मदत मिळेल उत्पन्नात वाढ ही होईल.
 • जे व्यक्ती उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे त्यांना हि योजना फायद्याची ठरणार आहे.
पंचायत समिती कुक्कुटपालन योजना

पंचायत समिती कुक्कुटपालन योजना आवश्यक लागणारे कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • मतदान कार्ड
 • राशन कार्ड
 •  रहिवाशी प्रमाणपत्र
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • जमिनीचा 7/12 व 8 अ
 • मोबाईल क्रमांक
 • ई-मेल आयडी
 •  बँक खाते क्रमांक
 • शपथ पत्र पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र

पंचायत समिती कुक्कुटपालन योजना अटी व शर्ती

 •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
 • महाराष्ट्र  राज्याच्या बाहेरील नागरिकाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • या योजनेचा लाभ फक्त एकाच कुटुंबातील एकच व्यक्ती घेऊ शकेल.
 •  30 टक्के महिला लाभार्थी निवडण्याबाबत प्रधान्य देण्यात येईल
 •  योजना सुरू झाल्यापासून अर्ज  स्वीकारण्यासाठी 30 ते 40 दिवसाची मुदत देण्यात येईल या मुदतीनंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
 •  या योजनेअंतर्गत निर्धारित रकमेपेक्षा जास्त खर्च झाल्यास लाभार्थ्यांने स्वतः करणे अपेक्षित आहे.
 •  या योजनेअंतर्गत एकदा लाभार्थ्याची निवड झाल्यास त्या लाभार्थ्याच्या या योजने करिता किमान पुढील पाच वर्षे पुन: शच विचार करण्यात येणार नाही
 • पिल्याच्या गटासाठी लागणारा निवारा, वाहतुकीवरील खर्च ,उर्वरित खात्यावरील खर्च ,औषधी,  पाण्याची भांडी ,खाद्याची भांडी इत्यादी हा सर्व खर्च लाभार्थ्याला करणे आवश्यक आहे .

अर्ज करण्याची पद्धत

     तुम्ही या योजनेचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करू शकतात.

 • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात पशुसंवर्धन विभागात जाऊन कुक्कुटपालन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
 • अर्जात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील व सादर अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.
 • जिल्हाधिकारी तुमच्या अर्जाची व कागदपत्राची छाननी करून तुम्ही योजनेअंतर्गत पात्र असल्यास लाभाचे वितरण करण्यात येईल.

अशाप्रकारे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज 

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपण play store ला जाऊन AH-MAHABMS या नावाचे अँप्लिकेशन  डाउनलोड करा आणि त्या अँप च्या माध्यमातून आपला ऑनलाइन अर्ज करा अँप्लिकेशन  डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पंचायत समिती कुक्कुटपालन योजना

निष्कर्ष

महाराष्ट्र कुक्कुटपालन योजना ही खूप अत्यंत महत्त्वाची योजना आहे ज्या व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्याकरिता ही योजना खूप फायद्याची आहे. एखाद्या व्यक्तीला व्यवसाय करायचा असतो पण पैशांची अडचण असते त्या व्यक्ती करिता या योजनेअंतर्गत कर्ज दिले जाते ते पण कमी व्याज दारात आणि एक नवीन व्यवसाय पण सुरू करता येईल जर तुमच्या नातेवाईकांमध्ये , मित्र मैत्रिणी मध्ये, कोणाला कुक्कुटपालन हा व्यवसाय जर करायचा असेल तर त्यांना या योजनेबद्दल माहिती सांगा जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

सतत विचारले जाणारे प्रश्न

 1. कुक्कुटपालन ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू आह?
 • कुक्कुटपालन ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे.

        2. कुक्कुटपालन माहिती कोठे मिळेल?

 • या योजनेची माहिती पशुसंवर्धन विभाग ,महाराष्ट्र यांचे संकेतस्थळ .तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात. योजनेत सहभागी बँक. या ठिकाणी तुम्हाला या योजनेची माहिती मिळेल.

      3. कुक्कुटपालन योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाते?

 •  कुकुट पालन योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन कुक्कुटपालन योजनेसाठी 50 % अनुदान देते. अनुसूचित जाती/ जमातीसाठी 75% टक्के अनुदान दिले जाते.

2 thoughts on “पंचायत समिती कुक्कुटपालन योजना अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे”

Leave a comment