पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना
ही योजना शैक्षणिक वर्षासाठी सुरु केलेली आहे. पात्र विद्यार्थ्यांना योजनेद्वारे भत्ता दिला जातो. महाराष्ट्र शासनाने उच्चं शिक्षण संचालनच्या माध्यमातून डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आणि या योजनेची माहिती तुम्हाला पुढीलप्रमाणे सांगणार आहेत.तुम्हालासुद्धा तुमच्या शिक्षणासाठी शासनाच्या या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकता.तुम्ही त्या वयाचे असाल तर पुढे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा की ज्यामुळे तुम्हांला शिक्षणाची आर्थिक मदत होईल.
ही योजना मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेली आहेत. गरीब मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना वर्षातून १०महिन्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली आहे.
गरीब मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना वर्षातून १० महिने ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे फक्त शैक्षणिक कालावधीमध्येच ही योजना लागू राहणार आहे. या योजनेत २००० /- ते ३००००/-रुपये शिष्यवृत्ती देणार आहेत.
यामध्ये मेट्रो सिटी, अर्बन एरिया आणि ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिष्यवृत्ती दिली जाईल. त्यामुळे योजनेचा फायदा घेण्याची संधी सर्वांना आहे,त्यासाठी ही संधी सोडू नका. तुम्ही पात्र असाल,तर लगेच अर्ज करा.

योजनेचे नाव | पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना |
कोणामार्फत राबवली जाते | महाराष्ट्र राज्य सरकार |
विभाग | शिक्षण मंत्रालय महाराष्ट्र |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
योजनेची सुरुवात | 2016 / 2017 |
लाभ | 2000 ते 30000 |
लाभार्थी | महाराष्ट्रातील बाहेर शिक्षण घेत असणारे विद्यार्थी. |
अधिकृत संकेतस्थळ | |
योजनेचा उद्देश | उद्देश गरीब मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची आर्थिक मदत |
पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना योजनेची पात्रता
- अर्ज करणारा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवाशी असणे
- अर्ज करणारा विद्यार्थी नोकरदार असू नये
- अर्ज करणारा विद्यार्थी सरकारच्या इतर शिष्यवृत्तीचा लाभ घेणारा नसावा
- अर्ज करणारा हा बाहेर शिक्षण घेणारा असणे
- अर्ज करणारा त्याच्याच गावात किंवा शहरात शिक्षण घेत असल्यास, या योजनेला पात्र नाही
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न १लाखापेक्षा जास्त असू नये
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कुटुंबातील वार्षिक उत्पन्न १लाख ते ८ लाखापर्यंत असेल तर अश्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना योजनेचा फायदा
पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी ३०,०००/- ते २०००/-रुपये एवढी आर्थिक सहाय्यता केली जाईल. यामध्ये निर्वाह भत्ता आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मदत केली जाईल अर्ज करणारा पात्र गरीब मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी ३०,०००/-ते २०००/-रुपये आर्थिक मदत केली जाते यामध्ये निर्वाह भत्ता, व्यावसायिक अभ्यासक्रम अश्या गोष्टी ही समाविष्ट आहेत शासनाद्वारे या योजनेसाठी आर्थिक मदत कशी दिली जाईल हे संपूर्ण माहिती खाली दिली आहेत, संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचणे, म्हणजे तुम्हाला किती शिष्यवृत्ती मिळणार आहे हे कळेल
अल्पभूधारक शेतकरी आणि नोंदणीकृत मजूर याच्यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा कोणतीही नाही यांचे वसतिगृह ठिकाण उदा :मुंबई, पुणे, छत्रपती. संभाजीनगर, नागपूर आणि महानगरपालिका असे क्षेत्र असले तर यांची शिष्यवृत्तीची रक्कम ३०,०००/-इतकी आहे. इतर शहरे आणि ग्रामीण भागासाठी २०,०००/-रुपये इतकी आहे
इतर विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न हे १लाख ते ८ लाख रुपये आहे. वसतिगृह ठिकाण उदा : मुंबई, पुणे, नागपूर, महानगरपालिका क्षेत्र यांची शिष्यवृत्ती रक्कम १०,०००/-रुपये इतकी आहे, इतर शहरे आणि ग्रामीण भागसाठी ८०००/- इतकी आहे व्यावसायिक अभ्यासक्रम नसलेल्या विद्यार्थ्यांना १ लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे, त्यांना शिष्यवृत्ती २०००/- रुपये दर महिणा इतकी आहे
योजनेला लागणरी कागदपत्रे
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आधारकार्ड
- राहिवासी प्रमाणपत्र (महाराष्ट्र )
- जर गॅप असेल tr त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र ( १लाख ते ८लाख )
- पालक शेतकरी असल्यास, अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र
- पालक मजूर असल्यास, नोंदणीकृत मजूर प्रमाणपत्र
- दोन मुले असल्यास पालकांचे घोषणापत्र असायला हवेत
अर्ज कसा करावा?
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या गरीब मध्यमवर्गीय विद्यार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.त्यासाठी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून आपला अर्ज सादर करा. सर्वात अगोदर संकेतस्थाळावर जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करुन अधिकृत वेबसाईट पोहचू शकता https://mahadbt.maharashtra.gov.in/ . वेबसाईट उघडल्यानंतर पोर्टलवर गेल्यानंतर अगोदर नोंदणी करणे, नंतर लॉगिन करणे. डॅशबोर्डवर जाऊन प्रथम आधार बँक लिस्ट आहे का ते चेक करणे, आधार लिंक आहे का ते बघणे, जर आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घेणे. त्यानंतर तुमची पर्सनल माहिती विचारली जाईलती तुम्ही भरून घेणे, नंतर पत्ता आणि तुमची जास्तीची माहिती फॉर्ममध्ये भरली जाईल.तुम्हाला तुमच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती भरायची आहे, ज्या वसतिगृहात राहता त्याची माहिती भरणे.
त्यानंतर शिष्यवृत्तीची माहिती समोर येईल, मग आपला फॉर्म तपासून पहाणे, नंतर I agree या बटणावर क्लिक करुन Submit करणे. शेवटी तुम्हाला, success चा मॅसेज येईल. अशाप्रकारे अर्ज सादर होईल. डॉ *. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह योजना या योजनेसाठी दरवर्षी फॉर्म रिन्यू करावा लागतो. त्यासाठी फॉर्मचा Application ID नंबर नोंदवून ठेवणे.

या योजनेत विचारले जाणारे प्रश्न :
- डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्तीसाठी कोण पात्र आहे?
- ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८लाखापेक्षा कमी आहे, आणि ज्यांचे पालक अल्पभूधारक व नोंदणीकृत कामगार आहेत.
- डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती कोणी सुरु केली?
- डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती ही गुणवत्तेवर आधारित शिष्यवृत्ती आहे. जी आर्थिकदृष्टीने गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने निर्माण केली आहे.
1 thought on “पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना”