अस्मिता योजना माहिती मराठी

अस्मिता योजना माहिती मराठी Asmita Yojna

अस्मिता योजना माहिती मराठी 

  महाराष्ट्र शासनाने एक नवीन योजना सुरू केलेली आहे ही योजना महिलांच्या भल्यासाठी व त्यांचे काळजीसाठी राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात महिलांसाठी व मुलींसाठी या देशांमध्ये खूप साऱ्या विविध योजना आहेत ज्या की मुलींच्या भल्यासाठी असतात. तर आपण जे आज योजना पाहणार आहोत ती योजना महिला व किशोरवयीन मुली यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता 8 मार्च 2018 मध्ये सुरू करण्यात आलेली योजना. अंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील मुली व ग्रामीण भागातील महिला 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींना कमी दरात सॅनिटरी नॅपकिन ची वाटप करण्यात येते.

चला तर आपण या लेखांमध्ये अस्मिता योजनेची माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, या योजनेचा उद्देश , आवश्य लागणारे कागदपत्रे ,अर्ज करणे याची पद्धत, या सर्वांची माहिती आपण पाहणार आहोत हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा.

अस्मिता योजना माहिती

या योजनेमध्ये ग्रामीण भागातील महिला व किशोरी मुली यांना आरोग्य विषयक विविध समस्यांचा सामना करावा लागतो, त्याच काळामध्ये ग्रामीण भागामध्ये मानसिक पाळी बद्दल आजही बरेचसे गैरसमज पसरलेले आहेत. ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकिन या महाग असल्यामुळे महिला व किशोरवयीन मुली वापर करीत नाही .त्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम व बऱ्याचश्या वेगवेगळ्या आजाराला बळी पडावे लागते. ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुलींमध्ये वैयक्तिक स्वच्छते बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील महिला व मुलीना कमी दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन द्वारे अस्मिता योजना राबविण्यात येत आहे . महिला आणि किशोरवयीन मुलींना स्वच्छते संदर्भात जाणीव निर्माण करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत अस्मिता योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे.

योजनेचे नाव

अस्मिता योजना

राज्य

महाराष्ट्र

विभाग

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन

अर्ज प्रक्रिया

 ऑनलाइन   

अधिकृत संकेतस्थळ

https://www.umed.in/index.php

लाभ

अगदी कमी दरामध्ये सॅनिटरी नॅपकिन चा पुरवठा करणे

लाभार्थी

ग्रामीण भागातील महिला आणि किशोरवयीन मुली

योजनेचा उद्देश

ग्रामीण महिला आरोग्य संबंधित वैयक्तिक स्वच्छते संदर्भात  जागरूक करणे.

 

अस्मिता योजना माहिती मराठी

अस्मिता योजना माहिती मराठी उद्देश

  अस्मिता योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील महिला आणि मुली तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुली 11ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे हा महाराष्ट्र शासनाचा मुख्य उद्देश आहे

  •  योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिला व मुलींना स्वच्छता संदर्भात जागृती निर्माण करणे व त्यांना कमी दरामध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे हा महाराष्ट्र शासनाचा मुख्य उद्देश आहे.
  •  अस्मिता योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मुलींचे व महिलांचे जीवनमान सुधारणे
  • महिलांना व मुलींना अगदी कमी दरामध्ये सॅनिटरी नॅपकिन चा पुरवठा करणे.
  •  या योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा मधील मुलींची उपस्थिती वाढवणे हा देखील उद्देश आहे.
  •  अस्मिता योजनेअंतर्गत महिला बचत गटांना सॅनिटरी नॅपकिन पुरवण्यासाठी निवडले जाते आणि त्या प्रशिक्षण आणि अनुदान दिले जाते.

अस्मिता योजना माहिती मराठी वैशिष्ट्ये

  • या योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ग्रामविकास विभागामार्फत आणि उमेद अभियानांतर्गत योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  •  अस्मिता योजनेअंतर्गत स्वयंसहाय्यता समूहाची सॅनिटरी नॅपकिन ची मागणी नोंदवण्यासाठी अस्मिता हे मोबाईल ॲप्लिकेशन निर्माण करण्यात आलेले आहेत.
  • अस्मिता योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांमध्ये व मुलींमध्ये त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांना स्वच्छतेची जाणीव निर्माण होण्यासाठी अस्मिता योजना ही खूप महत्त्वाची शासनाची योजना आहे.
  •  या योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळेमध्ये 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलीसाठी अस्मिता योजना राबविण्यात येत आहे या योजनेमध्ये मुलींना अस्मिता कार्ड सुद्धा देण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान उमेद

 राज्य ग्रामीण जीवन्नोती उमेद अभियानाची अंमलबजावणी ग्रामीण विकास विभाग व महाराष्ट्र शासन यांच्याकडून केली जाते. या योजनेअंतर्गत गरिबांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी सहाय्यता दिली जाते. या अभियाना अंतर्गत महिलांचा स्वयम सहाय्यता गटांमध्ये समावेश करणे संस्थाची क्षमता वृद्धी व कौशल्य वृद्धी करणे त्याचबरोबर आर्थिक सेवा पुरविणे आणि उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे गरिबांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करणे असा उद्देश आहे.

अस्मिता योजना माहिती मराठी  अंमलबजावणी करिता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद नोडल एजन्सी व अतिरिक्त संचालक, कुटुंब कल्याण, पुणे नोडल अधिकारी हे आहेत. 

अस्मिता अँप्लिकेशनच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन मागणी नोंदवण्यासाठी

अस्मिता योजनेअंतर्गत उमेद पुरस्कृत स्वयं सहाय्यता समूहाची (SHG) सॅनिटरी नॅपकिन मागणी  नोंदविण्यासाठी व त्याचा पुरवठा करण्यासाठी अस्मिता नावाच्या मोबाईल ॲप चा वापर करावा लागेल.

* स्वयं सहाय्यता गटांनी नोंदणीसाठी सर्वप्रथम Play Store वरून अस्मिता App डाऊनलोड करावे.

* त्यानंतर तुम्हाला स्वयंसहायता  गटांनी एप्पवर NIC कोड टाकावा.

* स्वयंसहाय्यता गटाच्या नोंदणीकृत मोबाईलवर नोंदणीसाठी आवश्यक असलेला ओटीपी आल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

* जर एखाद्या स्वयंसहाय्यता गटाचा मोबाईल क्रमांक NIC च्या SHG पोर्टलवर नोंदणीकृत नसेल तर त्या स्वयंसहाय्यता गटांना अस्मिता एप्पवर नोंदणी करणे शक्य होणार नाही, त्यांनी NIC च्या SHG पोर्टलवर त्याच्या मोबाईल नंबरची प्रथम नोंदणी करणे आवश्यक असेल.

* सॅनिटरी नॅपकिन ची ऑनलाईन मागणी नोंदविण्यासाठी स्वयंसहाय्यता गटांनी स्यानेटरी नॅपकिन ची मागणी ही अस्मिता वर ॲप वर नोंदवावी लागेल. तसेच मागणी करताना अस्मिता ॲप मध्ये असलेल्या (Wallet) वायलेट मध्ये प्राप्त रक्कम असणे गरजेचे आहे नसल्यास वॉलेट मध्ये  पर्याप्त रक्कम रिचार्ज करणे आवश्यक आहे. हा रिचार्ज तुम्हाला कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्रात करता येईल, किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इत्यादीचा वापर करून करता येईल.

* मागणी नोंदविताना प्रत्येक सॅनिटरी नॅपकिन ची 140 पॅकेटच्या पटीत मागणी नोंदणी आवश्यक आहे. (240मि.मी. चे किमान 140 पॅकेट किंवा मुलींसाठी 240 मि.मी . चे किमान 140 पॅकेट )

* मागणी विनंती मिळवल्यावर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS पाठवला जाईल आणि सॅनेटरी नॅपकिन ची किंमत वायलेट मधून डेबिट केली जाईल.

अस्मिता योजना माहिती मराठी

तालुका  पातळीवर वितरण कडून हे नॅपकिन संबंधित स्वयंसहायता  गट प्राप्त करून घेतील आणि अस्मिता ॲप वर नॅपकिनच्या पावती बद्दल नोंदणी करतील. त्यानंतर पूल खात्यातील रक्कम आपोआप  पुरवठादाराच्या यांच्या खात्यात हस्तांतरित  जाईल .

जिल्हा परिषद शाळेमधील 11 ते 19 वयोगटातील मुलींसाठी अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया

* जिल्हा परिषद शाळेमधील किशोरवयीन मुलींसाठी हे योजना अनुदान राबवण्यात येणार असून त्यांना आठ नॅपकिन एका पॅकेट पाच रुपयांना या दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

* या योजनेसाठी प्रत्येकी जिल्हा परिषद शाळेमधील मुलींकडे अस्मिता असणे आवश्यक आहे. शाळेमध्ये नोंदवलेल्या 11 ते 19 वयोगटातील सर्व  मुलींच्या यादी मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीने ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्र प्रत्येक शाळेला जमा करावी लागेल.

* आपली सरकार सेवा केंद्राचे केंद्रप्रमुख गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन शाळेतील 11 ते 19 वयोगटातील सर्व मुलींची नोंदणी करतील. याच्यासाठी मुलींकडून कोणतेही शुल्क रक्कम आकारण्यात येणार नाही. फक्त पाच रुपये नोंदणी करिता प्रत्येक मुलीकडून फि शासनाकडे अदा करण्यात येईल.

* नोंदणी झाल्यानंतर मुलींचे अस्मिता कार्ड तयार करण्यात येईल. व उमेदामार्फत जिल्हा परिषद शाळेत पोहोचविण्यात येतील.

* अस्मिता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक शाळात पात्र मुलींची नोंदणी करतील.

* मुलींना अस्मिता कार्ड मिळाल्यानंतर गटाकडून पाच रुपये किमती सॅनिटरी नॅपकिन विकत घेता येईल. हे नॅपकिन घेताना अस्मिता कार्ड दाखविणे गरजेचे आहे या कार्डावरचा OR कोड Read केल्याशिवाय स्वयंसहायता गटामार्फत हि विक्री होणार नाही.

अस्मिता योजना माहिती मराठी निष्कर्ष

आम्ही तुम्हाला अस्मिता योजना माहिती मराठी  अस्मिता योजनेबद्दल सविस्तर माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा व या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेमध्ये ग्रामीण भागातील महिला व मुलींना जिल्हा परिषद शाळेतील किशोरवयीन मुलींना सॅनेटरी नॅपकिन याचा लाभ दिलेला आहे.  याचा घेण्यासाठी ग्रामीण भागातील मुली व महिलानी अर्ज करावा.