Electric Tractor : शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आहे! आता राज्यातील शेतकऱ्यांना शेती अधिक सोपी आणि कमी खर्चात होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ई-ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारी खास योजना घेऊन आले आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त बिनव्याजी कर्जत मिळणार नाही तर,तब्बल 1.5 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतातील उत्पन्न वाढविणे आणि खर्च कमी करणे शक्य होणार आहे.Electric Tractor

ई-ट्रॅक्टर शेतीतील नवीन क्रांती
सध्याच्या काळामध्ये तंत्रज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे आणि आता त्याचाच फायद शेतीलाही मिळत आहे .ई-ट्रॅक्टर म्हणजेच इलेक्ट्रिक ट्रॅक्टरहोय .पारंपरिक पद्धतीने चालणारा डिझेलवरच्या ट्रॅक्टरच्या तुलनेत हा ई-ट्रॅक्टर अनेक बाबतीत उत्तम करत आहे .हा ट्रॅक्टर तुम्हाला चालवायला खूप सोपं आहेयामुळे तुमच्या वेळेची आणि पैशाची खूप मोठी बचत होणार आहे .विशेष म्हणजे, हा ट्रॅक्टरपर्यावरणाची काळजी घेण्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे .
या ट्रॅक्टरची महाराष्ट्रामध्ये पहिली नोंदणी झाली आहे .ही नोंद ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाले आहे .हा ऑटोनेक्स्ट याभारतीय कंपनीने तयार केलेला आहे . या ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे .Electric Tractor
हे वाचा : पशूसंवर्धन योजनेत कागदपत्रे चुकली? आता पुढे काय
राज्य शासनाकडून 1.50 लाखापर्यंत अनुदान
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई-ट्रॅक्टर खरेदी करावे यासाठीराज्य सरकारकडून 1.50 लाख रुपये पर्यंतच्या अनुदान दिले जाणार आहे .हे अनुदान महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक (Electric) वाहन धोरण 2025 अंतर्गत दिले जाणार आहे .याचा अर्थ असा की, शेतकऱ्यांना अत्यंत कमी पैशांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार आहे .ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर खरेदीसाठी मोठी रक्कम नाही अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना खूप फायदेशीर ठरणार आहे .Electric Tractor
बिनव्याजी कर्जाची सुविधा उपलब्ध
या अनुदाना सोबतच, ज्या शेतकऱ्यांना कर्जाची आवशक्यता आहे त्यांच्यासाठी देखील याचा खूप मोठा फायदा होणार आहे . स्व.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ई-ट्रॅक्टर खरेदीसाठी बिनव्याजी कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे .ज्यामुळे आर्थिक अडचणीमुळे ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करणे शक्य होत नाही अशा शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेणे शक्य होणार आहे .बिनव्याजी कर्ज मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक भार कमी होणार आहे.
ई-ट्रॅक्टर खरेदीचे फायदे
ई-ट्रॅक्टरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याचा खर्च अत्यंत कमी आहे .या ट्रॅक्टरने एक एकर क्षेत्राची नांगरणी करण्यासाठी फक्त 300 रुपये खर्च येतो,आणि पारंपारिक डिझेलच्या ट्रॅक्टरने एक एकर क्षेत्राची नांगरणी केल्यास 1200 ते 1500 रुपये खर्च येतो. म्हणजे एका कामातच जवळपास 70% पर्यंत बचत होते .
तसेच,इतर खर्चाचा विचार केल्यास डिझेलच्या ट्रॅक्टरच्या तुलने ई-ट्रॅक्टर ची दुरुस्ती, देखभाल करण्याचा खर्च पण खूप कमी आहे .कारण की या ई-ट्रॅक्टर मध्ये इंजन ऑइल बदलणे, फिल्टर बदलणे यासारख्या गोष्टींची गरज नसते .पण या ट्रॅक्टर साठी विजेचा वापर अधिक आहे .परंतु , विजेचा वापर जास्त स्वस्त असल्याने रोजच्या इंधन खर्चातही डिझेलच्या तुलनेत 60 ते 70 टक्के कमी आहे.
पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने हा ट्रॅक्टर अत्यंत महत्त्वाचा आहे .डिझेल ट्रॅक्टर सारखे प्रदूषण न करता हा ई-ट्रॅक्टर शेती कामे पूर्ण करते .यामुळे तुमच्या गावात, शिवारात होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत मिळणार आहे .
शेतकऱ्यांसाठी मोठे फायदे
ई-ट्रॅक्टर खरेदीमुळे शेतकऱ्यांना फक्त आर्थिक पर्यावरणीय फायदेच नाही तर इतर अनेक फायदे मिळणार आहेत .या ट्रॅक्टरमुळे शेतातील कामाचा वेग वाढतो आणि वेळेची बचत होते .मुजरा वर अवलंबून राहण्याची गरज कमी भासते ,कारण की जास्तीत जास्त कामे हे हा ट्रॅक्टरच करू शकतो .सरकारच्या प्रोत्साहन योजनेमुळे लवकरच राज्यभरात ई-ट्रॅक्टर ची संख्या वाढेल,असा अंदाज आहे.यामुळे शेतकऱ्यांना पारंपारिक ट्रॅक्टर पेक्षा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हा जास्त फायदेशीर वाटणार आहेत .Electric Tractor
1 thought on “Electric Tractor: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ई-ट्रॅक्टर खरेदी करा बिनव्याजी कर्जावर आणि मिळवा 1.5 लाखापर्यंत अनुदान”