सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी पाईप लाइन योजना

पाईप लाईन योजना

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आपला देश हा भारत देश कृषी प्रधान देश आहे या देशांमध्ये बहुतांश लोक हे शेती व्यवसाय करतात प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते. वेगवेगळ्या प्रकारचे पिके घेतली जातात.

तर या पिकांना पाणी देण्यासाठी सरकारने वेगवेगळे योजना वेगवेगळ्या राज्यात राबवलेले आहेत तर आपण आज महाराष्ट्र राज्यातील अशीच एक योजना पाहणार आहोत जी पिकांना पाणी देण्यासाठी उपयोगी केली जाते ती योजना म्हणजे पाईप लाईन योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये विहीर, तलाव, बोरवेल, नदी, इत्यादी पासून ते शेतापर्यंत पाणी नेण्यासाठी पाईप लाईन करावी लागते. तर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतात पाईपलाईन करण्यासाठी 50 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

पाईप लाईन अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाईपलाईन करण्यासाठी 50% म्हणजे जास्तीत जास्त 15 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाते. यातून 428 मीटर पर्यंत 35 रुपये प्रति मीटर प्रमाणे अनुदान देण्यात येते. त्यातून शेतकऱ्यांना आपल्या शेतात पाईपलाईन करण्यासाठी सरकारचा हातभार लागेल.

हे अनुदान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत देण्यात येते. तसेच शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. ही योजना अशा शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे विहीर ,तलाव, बोरवेल, शेततळे ,म्हणजे पाण्याची सुविधा उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांना शेतात पाईपलाईन करण्यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाते.

 

तसेच सरकारच्या अशा बऱ्याच योजना आहेत की ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध नाही त्यांच्यासाठी पण बऱ्याच योजना आहेत . त्या आपण खालील प्रमाणे पाहूया.

अशा बऱ्याचशा योजना आहेत ज्या शेतकऱ्यांना शेतामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी आहे परत नंतर मोटार योजना पण आहे आणि आज आपण या लेखात जी योजना पाहणार आहोत ती म्हणजे पाईपलाईन योजना. म्हणजे सरकारने शेतकऱ्यांसाठी खूप सारे योजना अमलात आणलेल्या आहेत जेणेकरून शेतकऱ्यांचा विकास व्हावा आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी असा या सरकारचा विचार आहे. चला तर आपण आज या लेखामध्ये पाईपलाईन योजनेची माहिती, या योजनेचा लाभ काय आहे, उद्देश, पात्रता, आवश्यक लागणारे कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत या सर्वांची माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा.

आपण आज या लेका मध्ये या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत या योजनेचे उद्देश काय आहेत फायदा पात्रता निकष योजनेचा लाभ कसा घ्यायचा या सर्वांची माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा.

पाईप लाईन योजना

पाईप लाईन योजना

अशा बऱ्याचशा योजना आहेत ज्या शेतकऱ्यांना शेतामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी आहे परत नंतर मोटार योजना पण आहे आणि आज आपण या लेखात जी योजना पाहणार आहोत ती म्हणजे पाईपलाईन योजना. म्हणजे सरकारने शेतकऱ्यांसाठी खूप सारे योजना अमलात आणलेल्या आहेत जेणेकरून शेतकऱ्यांचा विकास व्हावा आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी असा या सरकारचा विचार आहे. चला तर आपण आज या लेखामध्ये पाईपलाईन योजनेची माहिती, या योजनेचा लाभ काय आहे, उद्देश, पात्रता, आवश्यक लागणारे कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत या सर्वांची माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा.

योजनेचे नाव

पाईप लाईन  योजना

कोणामार्फत राबवली जाते

महाराष्ट्र शासनाद्वारे

विभाग

कृषि विभाग महाराष्ट्र  

अर्ज प्रक्रिया

ऑफलाइन / ऑनलाइन

उद्देश

शेतीसाठी सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे

लाभ

50 टक्के अनुदान

लाभार्थी

महाराष्ट्रातील शेतकरी

अधिकृत संकेतस्थळ

https://mahadbt.maharashtra.gov.in/

पाईप लाईन योजना उद्दिष्ट

 • या महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सिंचना सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने  राज्य शासनाने पाईप लाईन योजनेची सुरुवात करण्यात आली.
 • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक विकास करणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
 •  शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने जास्तीत जास्त उत्पन्न काढून शेतकऱ्यांना आर्थिक नफा मिळवून देणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली.
 •  शेतकऱ्याला शेतीच्या पाण्यासाठी कोणाकडून कर्ज काढायची गरज पडू नये म्हणून शासनाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
 • या योजनेमुळे शेतकऱ्यांना आत्मनिर्भर या पाईपलाईन योजनेमुळे बनवता येते.
 •  या योजनेचा असा उद्देश आहे की महाराष्ट्र राज्यातील कोरडवाहू क्षेत्र कमी होऊन जास्तीत जास्त क्षेत्र सिंचन निर्माण करणे.
 • सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ होईल आणि आर्थिक मदत मिळेल त्यांची परिस्थिती सुधारेल त्यांचे जीवनमान उंचावने .

पाईप लाईन योजना वैशिष्ट्ये

 • पाईपलाईन योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे.
 •  पाईपलाईन योजना अनुदान योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाईपलाईन करण्यासाठी 50 टक्के अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येत आहे.
 •  पाईपलाईन योजनेअंतर्गत 428 मीटर पर्यंत पाईपलाईन करण्यासाठी प्रति मीटर 35 रुपये याप्रमाणे या योजनेअंतर्गत अनुदान मिळेल.
 • या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ही अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे.
 • पाईपलाईन योजनेअंतर्गत जी अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे ती (DBT) मार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते.

पाईप लाईन योजना चे फायदे

 • महाराष्ट्र राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या पाईप लाईन अनुदान योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक दृष्ट्या सुधरतील .
 •  या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्यासाठी कोणाकडून कर्ज घेऊन कर्जबाजारी होण्याची गरज पडणार नाही.
 • पाईपलाईन योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल आर्थिक विकास सामाजिक विकास होण्यास मदत होणार आहे.
 •  शासनाकडून पाईपलाईन करण्यासाठी अनुदान दिल्याने शेतकऱ्याचा एक  बोच कमी होईल
 •  पाईपलाईन अनुदान योजनेमुळे तरुण पिढीला शेतीकडे आकर्षित होईल.
 •  शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे त्यांचे आर्थिक जीवनमान सुधारेल त्यांच्या मुलांना एक चांगल्या प्रकारचे उच्च दर्जाचे शिक्षण देण्यास मदत होईल असा या सरकारचा उद्देश आहे.
 • या योजनेमुळे शेतकऱ्यांची शेती ही सिंचन सुविधा होण्यास मदत होईल आणि शेतकऱ्याला कोणतीही पिके घेताना अडथळा येणार नाही.

पाईप लाईन योजना पात्रता

 • पाईपलाईन  योजनेसाठी शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
 •  या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उतारा वर सिंचन किंवा पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहे असे शेतकरी या योजनेसाठी लाभार्थी राहतील.
 •  तसेच या योजनेसाठी राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणारे शेतकरी व गरीब शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील.

पाईपलाईन योजना आवश्यक कागदपत्रे

 1. आधार कार्ड
 2.  पॅन कार्ड
 3. राशन कार्ड
 4.  मतदान कार्ड
 5. जमिनीचा सातबारा /8 अ
 6. पी व्ही सी पाईप खरेदी केलेली बिल
 7. बँक खाते क्रमांक
 8. मोबाईल नंबर
 9. ई-मेल आयडी
 10. पाण्याची सुविधा असलेले प्रमाणपत्र
पाईप लाईन योजना

पाईप लाईन योजना अटी व नियम

 • या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पाईपलाईन अनुदान योजना चा लाभ घेता येईल.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला स्वतःच्या नावावरती सातबारा उतारा असणे आवश्यक आहे
 •  पाईपलाईन योजनेसाठी शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाण्याचा स्रोत उपलब्ध असावा.
 •  या योजनेसाठी शेतकरी हाजर दारिद्र्यरेषेखालील असेल, तर त्याला या योजनेचा लाभ दिला जाईल.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी  अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे एक हेक्टर किंवा कमीत कमी एक एकर जमीन असणे गरजेचे आहे.
 •  पाईपलाईन  योजनेअंतर्गत शासनाकडून पाईप खरेदीसाठी 50 टक्के अनुदान दिले जाते, वरील लागलेली रक्कम शेतकऱ्यांनी स्वतःकडील भरावी लागेल.
 •  या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एचडी पी पाईप साठी पन्नास रुपये प्रति मीटर प्रमाणे जास्तीत जास्त 300 मीटर पर्यंतच्या पाईप साठी अनुदान मंजूर केले जाते.
 • पाईप लाईन योजनेसाठी शेतकरी पी ओ सी पाईप साठी जर अर्ज केला तर त्याला 35 रुपये प्रमाणे जास्तीत जास्त 500 मीटर पर्यंतच्या पाईप साठी अनुदान दिले जाईल.
 • महाराष्ट्र राज्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

पाईप लाईन योजना अर्ज करण्याची पद्धत

 • पाईप लाईन या योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल .
 • या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावा लागेल म्हणजे (Maha DBT) या पोर्टलवर जावे लागेल.
 • आता आपल्यासमोर एक पेज ओपन होईल.
 • वेबसाईटच्या होम पेजवर आल्यानंतर आपल्याला नोंदणी पर्याय क्लिक करावे लागेल.
 • परत नंतर युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावा लागेल.
 • आता सर्व माहिती व्यवस्थित भरावी लागेल.
 • नंतर सिंचन साधने व सुविधा ही बाबत त्यामधील निवडून त्यावर क्लिक करावे.
 • त्यानंतर पाईप सिंचन किंवा पाईपलाईन या ऑप्शन वर क्लिक करावे.
 • परत नंतर पाईप लाईन अनुदान योजनेचा अर्ज आहे त्यामध्ये सर्व माहिती भरावी.
 • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
 • नंतर तो अर्ज सबमिट करावा.

अशाप्रकारे तुमचा पाईपलाईन योजनेची ऑनलाईन प्रोसेस पूर्ण होईल.

विचारले जाणारे प्रश्न

 1. पाईप लाईन योजना चे अनुदान किती दिले जाते?
 • पाईप लाईन योजना अनुदान 50 टक्के दिले जाते.
 1. पाईपलाईन योजनेचे अनुदान कोणाला दिले जाईल?
 • पाईपलाईन योजनेचे अनुदान महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहे जास्त करून दारिद्र्यरेषेखाली शेतकरी व आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या शेतकरी
 1. या योजनेअंतर्गत अनुदान कसे मिळतील,?
 • या योजनेअंतर्गत 428 मीटर पर्यंत पाईपलाईन करण्यासाठी प्रति मीटर 35 रुपये याप्रमाणे या योजनेअंतर्गत अनुदान मिळेल.
 1. या योजनेचा लाभ कोणाला दिला जाणार नाही?
 • या योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्याच्या नावावर जमीन नसेल त्या शेतकऱ्याला व शेतजमीन असून पण त्या शेतकऱ्याच्या सातबारावर जर पाणी सुविधा उपलब्ध नसेल तर त्या शेतकऱ्याला पण या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

2 thoughts on “सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी पाईप लाइन योजना”

Leave a comment