बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही योजना महाराष्ट्र सरकारची योजना आहे. सरकारचा असा उद्देश आहे की अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देणे. जेणेकरून त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि त्यांना एक आर्थिक मदत मिळेल आणि त्यांची परिस्थिती सुधारेल. या योजनेच्या माध्यमातून त्यांना सिंचन दिले जाणार आहे .
सरकारचा असा विचार आहे की काही भागांमध्ये पाण्याची पातळी कमी असल्यामुळे शेतीला भरपूर पाणी देऊ शकत नाही. पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळ शेतकऱ्याला अनेक संकटाला सामोरे जावे लागते. जर त्या शेतकऱ्यांना सिंचनाची साधन उपलब्ध करून दिले तर कमी पाण्यामध्ये सिंचनाच्या माध्यमातून शेतीला पाणी देण्यात येईल आणि जमिनीतला ओलसरपणा टिकून राहील आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यांना खूप मोठी मदत मिळेल या सगळ्याचा विचार राज्य सरकारने केला आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू करण्यात आली.
ही योजना अनुसूचित जाती-जमातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ कोरडवाहू शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेमार्फत सरकारने कृषी सिंचनाला प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे या आदिवासी शेतकऱ्यांना कमी पाण्यात जास्त उत्पन्न काढता येणार आहे यामुळे या शेतकऱ्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यांना सरकारची खूप मोठी मदत होणार आहे.
योजनेचे नाव | बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. |
कोणामार्फत राबवली जाते | महाराष्ट्र शासनाद्वारे |
विभाग | कृषि विभाग महाराष्ट्र |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन / ऑनलाइन |
उद्देश | शेतीसाठी सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे |
लाभ | अनुसूचित जाती जमाती शेतकरी |
लाभार्थी | या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांना दिला जाईल |
अधिकृत संकेतस्थळ |
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना मध्ये अनेक योजनेचा समावेश आहे त्या योजनेचे नाव आणि त्या योजनेला किती अनुदान दिले जाते ते आपण खालील प्रमाणे पाहूया.
- जुनी विहीर दुरुस्ती करणे-अनुदान 50 हजार रु
- नवीन विहीर – अनुदान 2.50 लाख रु.
- इनवेल बोअरिंग – अनुदान 20 हजार रु.
- पंप संच – अनुदान 20 हजार रु.
- शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण- अनुदान 1 लाख रु.
- वीज जोडणी आकार- अनुदान 10 हजार रु.
- सूक्ष्म सिंचन संच- अनुदान 1 लाख रु.
- ठिबक सिंचन- अनुदान 50 हजार रु.
- तुषार सिंचन संच- अनुदान 25 हजार रु.
- पीव्हीसी पाईप- अनुदान 30 हजार रु.
- परसबाग – अनुदान 500रु.
या सर्व योजनेला अनुदान दिले जाते कारण की शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळावे आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी हा सरकारचा उद्देश आहे.
सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, व कोल्हापूर हे जिल्हे सोडता बाकी राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना पात्रता
- लाभार्थी हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
- जातीचा वैद्य दाखला सादर करणे लाभार्थ्यांने बंधनकारक आहे.
- लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न मर्यादा दीड लाख रुपये असावी तोच व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल.
- जमिनीचा 7/12 व 8 अ उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
- उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे
- लाभार्थ्याची जमीन धारण 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत आणि नवीन विहिरी साठी किमान 0.40 हेक्टर असणे बंधनकारक आहे .
मिरासा मुंडा कृषी क्रांती योजना आवश्यक कागदपत्रे
- जातीचा वैद्य दाखला
- सातबारा व आठ अ चा उतारा
- लाभार्थ्याचे प्रतिज्ञापत्र
- उत्पन्नाचा दाखला
- अपंग असल्यास प्रमाणपत्र
- तलाठी यांच्या कडचा दाखला सामाजिक धारण क्षेत्राबाबत दाखला विहीर नसल्यास प्रमाणपत्र दाखला आणि प्रस्तावित विहीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून 500 फुट जास्त अंतरावर असलेला दाखला.
- भूजल विकास यांत्रनेकडे पाणी उपलब्ध याचा दाखला
- कृषी अधिकारी यांचे क्षेत्रीय पाहणे व शिफारस पत्र
- गटविकास अधिकारी यांचे शिफारस पत्र
- लाभार्थ्याला ज्या जागेवर विहीर घ्यायची आहे त्या जागेचा फोटो.
- ग्रामसभेचा ठराव.
जुनी वीर दुरुस्ती/इनवेल बोरिंग या बाबी करिता
- सक्षम प्राधिकारी यांचे कडील अनुसूचित जात जमातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- तहसीलदार यांच्याकडे मागील वर्षी उत्पन्न प्रमाणपत्र किंवा दारिद्र्य रेषेखालील असलेल्या बाबतचे प्रमाणपत्र bpl कार्ड आवश्यक आहे
- जमीन धारणेचा सातबारा दाखला 8 अ उतारा
- तलाठी यांच्या कडील दाखला एकूण धारणाक्षेत्राबाबतचा दाखला (0.20ते 6 हेक्टर मर्यादित) विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र प्रस्तावित विहीर. नकाशा हे देखील असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याचे बंद पत्र सादर करावे लागेल
- कृषी अधिकारी यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारस पत्र लागेल.
- गटविकास अधिकारी यांच्या शिफारस पत्र सादर करावे.
- ज्या विहिरीवर जुनी विहीर दुरुस्ती /त्या विहिरीचा काम सुरू असलेला फोटो
- माननीय प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रलक्य यांच्याकडील आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य (SCA) व घटनेच्या कलम 275 (A) अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र
शेततळ्यास अस्तरीकरण/वीज जोडणी आकार/सूक्ष्म सिंचन संचलयासाठी आवश्यक कागदपत्रे
- सक्षम प्राधिकारी यांचे कडील अनुसूचित जमातीचे जात/ प्रमाणपत्र जात वैद्यता प्रमाणपत्र.
- तहसीलदार यांच्याकडील मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र किंवा दारिद्र्यरेषेखालील असणे बाबतचे प्रमाणपत्र
- जमीन धारणेचा अद्यावत सातबारा दाखला
- तलाठी यांच्याकडे एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला.
- ग्रामसभेची शिफारस /मंजुरी
- शेततळे स्तरीकरण पूर्ण तत्वाबाबतचे हमीपत्र.
- काम सुरू करण्या अगोदरचा फोटो
- विद्युत कनेक्शन व विद्युत पंप संच नसणेबाबतचे हमीपत्र
- माननीय प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडील आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य (SCA) व घटनेच्या कलम 275 (A) अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या योजनेतून लाभ घेतला नाही असे प्रमाणपत्र
- प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तकेच्या छायांकित प्रत व मापन पुस्तकातील मोजमाप प्रमाणे संबंधित मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडून अंदाजपत्र प्रतिस स्वाक्षरी करून घ्यावे.
* बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेबाबत माहिती घेण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अर्ज करण्याची पद्धत आदिवासी शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे या योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/SchemeData/SchemeData?str=E9DDFA703C38E51ACA98B76653871714 या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
2 thoughts on “बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना”