अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान साठी 237 कोटी 07 लाख 13 हजार निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी : Nuksan Anudan 2024

Nuksan Anudan 2024 अतिवृष्टी पूर आणि चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे यासाठी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून विहित दराने मदत करण्यात येणार आहे.

Nuksan Anudan 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
KRUSHI SAMRUDH YOJANA शेतकऱ्यांसाठी क्रांतीकारी ‘कृषी समृद्धी’ योजना: हवामान बदलाच्या संकटातून बाहेर पडून आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग: KRUSHI SAMRUDH YOJANA

शासन निर्णय महसूल व वनविभाग यांच्यातर्फे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष आणि आणि दर विहित करण्यात आले आहेत केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने अवेळी पाऊस, अतिवृष्टी वीज कोसळणे, समुद्राचे उधाण आणि आकस्मिक आग या स्थानिकांमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे.

हे वाचा : कापूस/सोयाबीन अनुदान तारीख ठरली

Nuksan Anudan 2024 अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानसाठी 237 कोटी 07 लाख 13 हजार निधी मंजुर :

हे पण वाचा:
onlion policy committee कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारचं नवं धोरण कधी येणार? onlion policy committee

शासन निर्णयाप्रमाणे सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस आणि गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस आणि गारपीट तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत केली जाणार आहे.

जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन निर्णयाद्वारे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 23707.13 लक्ष इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे

हे पण वाचा:
today bajar bhav today bajar bhav : शेतीमाल बाजार भाव: १४ जुलै २०२५ रोजीचा आढावा

नवीन शासन निर्णय :

  • शासन निर्णयाद्वारे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 237 कोटी 07 लाख 13 हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे
  • या शासन निर्णय सोबतच जोडलेल्या प्रक पत्रात दर्शविल्या प्रमाणे उपलब्ध तरतुदी मधून अथवा आवश्यकतेनुसार पूर्व नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यसन यांनी हा निधी वितरित करावा
  • ही रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी पोर्टल द्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये निधी वितरित करण्यात यावा
  • हंगामात यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीसाठी वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्ताव अंतिम मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी
  • एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येते
  • जिरायत पिके बागायती पिके आणि बहुवार्षिक वार्षिक व्याजदर हात पाय देऊ शकेल पीक या पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये असल्याची खातरजमा करण्यात यावी
  • कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देत असताना द्विरुक्ती होणार नाही याची तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने काळजी घ्यावी

हे पण वाचा:
pashusavardhan yojana list पशूसंवर्धन नावीन्यपूर्ण योजना अंतिम निवड यादी लांबणीवर.. pashusavardhan yojana list

Nuksan Anudan 2024 किती अनुदान मिळणार ?

Nuksan Anudan 2024 गडचिरोली जिल्ह्यासाठी 5772.42 लक्ष, वर्धा जिल्ह्यासाठी 3691.76 लक्ष, चंद्रपूर जिल्ह्यासाठी 7429.22 लक्ष, नागपूर जिल्ह्यासाठी 1836.56 लक्ष, सांगली जिल्ह्यासाठी 1113.25 लक्ष, अमरावती जिल्ह्यासाठी 51.01 लक्ष, अकोला जिल्ह्यासाठी 1290.17 लक्ष, यवतमाळ जिल्ह्यासाठी 547.96 लक्ष, बुलढाणा जिल्ह्यासाठी 1358.66 लक्ष आणि वाशिम जिल्ह्यासाठी 72.55 लक्ष अशा 237 कोटी 7 लाख 13 हजार इतका निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

Nuksan Anudan 2024 अनुदान वाटप शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हे पण वाचा:
today bajar bhav 11 जुलै महाराष्ट्रातील प्रमुख पिकांचे बाजार भाव : today bajar bhav

Leave a comment