Mini Tractor Anudan : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वकांशी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती (SC) आणि नव बौद्ध समाजातील नागरिकांना मिनी ट्रॅक्टर साठी अनुदान दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 90% अनुदानावर हे मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor Anudan) दिले जाणार आहे. या ट्रॅक्टर बरोबरच शेतकऱ्यांना शेती उपयोगी अवजारे ही दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ हा लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी आहे जेणेकरून अशा शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आधुनिक साधने पुरवणे आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे असा या योजनेचा उद्देश आहे. Mini Tractor Anudan

मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्याचे फायदे काय आहेत?
मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor Anudan) हा मोठ्या ट्रॅक्टरच्या तुलनेत स्वस्त असतो तसेच, किफायतशीर आणि मोठ्या ट्रॅक्टरच्या तुलने मिनी ट्रॅक्टरचा देखभाल खर्च कमी असतो . या मिनी ट्रॅक्टरच्या आधारे तुम्ही तुमच्या शेतातील भात, भाजीपाला,हळद, कडधान्ये ,ऊस अशा पिकांसाठी हे ट्रॅक्टर खूप फायदेशीर ठरणार आहे . विशेष म्हणजे लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे . Mini Tractor Anudan
हे वाचा : घरकुलाच्या अनुदानात झाली वाढ! आता लाभार्थ्यांना किती मिळणार अनुदान.
मिनी ट्रॅक्टरचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अटी
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे .
- मिनी ट्रॅक्टर चा लाभ फक्त अनुसूचित जाती किंवा नव बौद्ध समाजातील नागरिकांना घेता येणार आहे .
- अर्ज करणाऱ्या नागरिकांच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे .
- या योजनेचा अर्ज शेतकरी बचत गटामार्फत करता येतो .
मिनी ट्रॅक्टरचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती?
- अधिवास प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीची 7/12 ,8 अ उतारे .
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- मोबाईल क्रमांक
- ई-मेल आयडी
- बचत गट प्रमाणपत्र (जर अर्ज गटामार्फत असेल)
अर्ज कसा करायचा?
ऑनलाइन अर्ज
मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor Anudan) योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना mahadbt.maharashtra.gov.in पोर्टल वर जाऊन अर्ज करता येतो. अर्ज करताना लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्हाला स्कॅन करून अपलोड करावी लागतात. अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची स्थिती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पाहता येते.
ऑफलाईन अर्ज
जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे शक्य झाले नाही तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने पण अर्ज करू शकतात त्यासाठी तुम्हाला तालुका किंवा जिल्हा कृषी कार्यालयात जाऊन अर्ज करता येतो.
मिनी ट्रॅक्टर साठी किती अनुदान दिले जाते?
या ट्रॅक्टर साठी एकूण खर्च 3.5 लाख रुपये आहे. तर यासाठी तुम्हाला 90% अनुदान दिले जाते म्हणजेच सुमारे 3.15 लाख रुपये दिले जाते. तर उर्वरित 10 टक्के रक्कम ही लाभार्थ्याने भरावी लागते. तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर उपकरणे वितरित केली जातात. अनुदान हे थेट लाभार्थी व्यक्तीच्या बँक खात्यात DBT प्रणालीने जमा होते.Mini Tractor Anudan
अर्ज करताना कोणती काळजी घ्यावी .
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीनी सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि अद्ययावत असावीत
- अर्जदार व्यक्तीचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
- अर्जातील सर्व माहिती अचूक द्यावी