Mobile Solar Pump: आता शेतकऱ्यांना सोलार पंप चालू बंद करण्यासाठी शेतात जाण्याची गरज नाही…. घरबसल्या मोबाईल वरून सोलर पंप करा चालू बंद…!

Mobile Solar Pump : राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी मागेल त्याला सोलार पंप या योजनेअंतर्गत अर्ज केले आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना सोलार पंप मिळाले असून त्यांनी ते सोलार पंप आपल्या शेतात बसवले आहेत. राज्यातील अनेक शेतकरी आपल्या शेतीसाठी या सोलार पंपाचा वापर शेतात करत आहेत. आता याच शेतकऱ्यांसाठी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हाच सोलर पंप शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरून घरबसल्या चालू बंद करता येणार आहे . यामुळे शेतकऱ्यांना आता चालू बंद करण्यासाठी शेतात जाण्याची गरज पडणार नाही. आता आपल्याला तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रात नवनवीन प्रगती होताना पाहायला मिळत आहे. Mobile Solar Pump

Mobile Solar Pump

मोबाईल ॲप्सच्या मदतीने सोलर पंप घरबसल्या चालू /बंद करा

मागेल त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत विविध कंपन्या समाविष्ट आहेत. लाभार्थी शेतकरी हे कोणत्याही एका कंपनीची निवड करून आपल्या शेतात सोलार बसून घेत असतात. या कंपन्यांच्या माध्यमातून सोलार मध्ये काही फीचर्स अपडेट करण्यात येत आहेत. यातील एक फीचर म्हणजे च मोबाईल (Mobile Solar Pump) वरूनच सोलार पंप चालू बंद करता येणार .जर तुम्ही मागेल त्याला सोलार पंप योजनेसाठी अर्ज केला आहे आणि तुम्हाला सोलारही पंप मिळाला आहे व तो सोलार पंप तुम्ही तुमच्या दूरच्या शेतात लावला असला तरी तुम्हाला ऑपरेट करता येणार आहे .म्हणजेच तुम्हाला आता घरबसल्या सोलार पंप चालू बंद करता येईल .तसेच याशिवाय जर सोलार ड्रीप वर असेल तर तुम्ही आहेत त्याच ठिकाणाहून चालू बंद करू शकतात . मागेल त्याला सोलार पंप योजनेमधील काही निवडक कंपन्यांनी शेतकऱ्यांसाठी हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे .यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची बचत होणार आहे .Mobile Solar Pump

हे वाचा :शेतकरी ओळखपत्र असेल तरच मिळणार शासकीय योजनांचा लाभ.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या एप्लीकेशनचे अनेक महत्त्वाचे फायदे

तुम्हाला या सुविधेचा उपयोग फक्त मोटार स्टार्ट/पुरताच नाहीतर, काही ॲप्समध्ये पाण्याचा पुरवठा किती वेळ चालू होता, सध्याचा न व्होल्टेज लिव्हल ,बॅटरीची चार्जिंग स्थिती,आणि या सिस्टम मध्ये जर काही बिघाड झाला असेल तर त्याची पण सूचना देण्याचे पर्याय दिले जात आहेत .यामुळे शेतकऱ्यांना अधिक माहिती घेऊन कोणताही निर्णय घेऊ शकतात आणि वेळेवर समस्याचे निवारण करू शकतील .याची सर्व प्रणाली ही GSM किंवा LOT तंत्रज्ञानावर आधारित आहे. ज्यामुळे वापर करणाऱ्यांना सोलार कंट्रोल पॅनल सोबत सलग असलेल्या सिस्टमला मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून नियंत्रित केले जाते. Mobile Solar Pump

या ॲपच्या माध्यमातून असा करा सोलार चालू बंद

आता तुम्हाला घरबसल्या मोबाईल ॲप्सच्या मदतीने सोलार पंप चालू /बंद करता येणार आहे.

  • हे सोलार पंप ॲप वापरण्यासाठी संबंधित कंपनीकडून रजिस्ट्रेशन केल्यावर, तुम्हाला एक युजर फ्रेंडली ॲप उपलब्ध करून दिले जाते. हे ॲप उपलब्ध करून दिल्यानंतर यामध्ये शेतकऱ्यांचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर नोंदवून ॲप मध्ये लॉगिन करता येतो .
  • हा मोबाईल नंबर एकदा लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला मोटर ऑन/ऑफ करण्याची बटन,तसेच पंप चालू आहे की बंद हे तपासण्यासाठी सोय,त्यानंतर तांत्रिक बिघाडीची सूचना आणि इतर माहिती यामध्ये सहज उपलब्ध होते.तसेच काही ॲप मध्ये बॅटरी स्टेटस,सोलर एनर्जी युटीलायझेशन,आणि वॉटर पोलो रेटही दर्शवले जातात.
  • या सुविधेमुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे .शेतकऱ्यांना उन्हामध्ये किंवा पावसामध्ये शेतात जाण्याची गरज पडणार नाही .वेळेची बचत होईल .तसेच याशिवाय पाण्याचा अपव्यय त शेतीला पाणी देता येते .

मोबाईल द्वारे सोलर पंप ऑपरेट करण्याची सोय म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे आहे ज्यामुळे आधुनिक शेतीच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल ठरणार आहे .ज्या शेतकऱ्यानी आतापर्यंत सोलर पंप घेतलेला नाही किंवा मागेल त्याला सोलार पंप योजनेसाठी अर्ज केलेला नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सोलार पंप योजनेसाठी अर्ज करून या सुविधेचालाभ घ्यावा .आणि ज्या शेतकऱ्यांकडे सोलर पंप आहे व त्यांनी ते आपल्या शेतामध्ये बसवले आहेत अशा शेतकऱ्यांनी मोबाईल कंट्रोल यंत्रणा बसवून या सुविधेचा लाभ घ्यावा .Mobile Solar Pump

Leave a comment

Close Visit Batmya360