HSRP Number Plate: वाहनांना HSRP पाटी बसवण्यासाठी मुदत वाढ! कोणत्या वाहनासाठी किती पैसे लागणार? येथे पहा

HSRP Number Plate : परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यातील दिनांक 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP Number Plate) बसवणे बंधनकारक केले आहे. हे काम 1 जानेवारी 2025 पासून सुरू झाले आहे. सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP Number Plate) पाटी बसवण्यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत वाहन मालकांना मुदत देण्यात आली होती. परंतु आतापर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटील HRSP बसवण्याचे काम कमी झाले आहे त्यामुळे आता राज्य शासनाने एक एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 जून 2025 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

HSRP Number Plate

1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांना नंबर प्लेट बसवण्यासाठी तीन संस्थांची/उत्पादकांची परिवहन विभागामार्फत निवड करण्यात आली आहे. तरी संबंधित वाहन मालकांनी याची नोंद घेऊन एक एप्रिल 2019 अगोदर नोंदणी असलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटील बसवण्यात यावी, असे आव्हान परिवहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.HSRP Number Plate

हे वाचा : HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी असा करा ऑनलाइन अर्ज….

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

कोणत्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणे बंधनकारक

  • उप प्रादेशिक परिवहन कार्यालय , कल्याण कार्यक्षेत्रातील खाजगी वाहनधारकांना
  • तसेच बस धारकांना
  • ऑटो रिक्षा धारकांना
  • ट्रक धारकांना
  • टॅक्सी धारकांना
  • तसेच कार्यरत संघटनांनी आपल्या वाहनांना नंबर प्लेट बसून घ्यावी.
  • दुचाकी वाहनधारकनि
  • चार चाकी वाहनधारकांनी
  • ट्रक मालिकांनी एचएसआरपी (HSRP Number Plate) नंबर प्लेट बसवणे आवश्यक आहे.

हाय सिक्युरिटी (HSRP) नंबर प्लेट बसवण्यासाठी शुल्क किती ?

  • दुचाकी आणि ट्रक वाहनांसाठी – 450 रुपये
  • तीन चाकी वाहनांसाठी – 500 रुपये.
  • चार चाकी वाहन व इतर वाहनांसाठी – 745 ते 1200 रुपये .
  • कमर्शियल वाहन – 1500 ते 2000 रुपये

Leave a comment

Close Visit Batmya360