Ration Card e-KYC :घरी बसल्या रेशन कार्ड E-KYC कशी करायची ? पहा सविस्तर

Ration Card e-KYC : रेशन कार्डधारकांनी ई- केवायसी करणे खूप महत्त्वाचे आहे . नियमानुसार दर 5 वर्षांनी करून घेणे आवश्यक झाले आहे .अनेक जणांनी शेवटची e-KYC 2013 मध्ये केली होती, यामुळे आता त्यांनी अपडेट करणे आवश्यक झाले आहे. केंद्र सरकारने सध्या प्रत्येक रेशन कार्डधारकांना (Ration Card e-KYC) ई- केवायसी करणे बंधनकारक केले आहे.

ई- केवायसी करण्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे , योग्य लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हा आहे. आता ई- केवायसी तुम्हाला तुमच्या घरी बसल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून करता येणार आहे यासाठी एक विशेष ॲप बनवण्यात आले आहे . Mera KYC आणि Aadhaar face RD या ॲपचा वापर तुम्ही करू शकतात आणि तुम्ही तुमची ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात .Ration Card e-KYC

Ration Card e-KYC

रेशन कार्ड ची (Ration Card e-KYC) ई- केवायसी कशी करावी?

  • ई- केवायसी करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम डिव्हाइसवर Mera KYC ॲप आणि Aadhaar Face RD ॲप इन्स्टॉल करा .
  • यानंतर तुम्हाला ॲप ओपन करावी लागेल आणि तुमचे लोकेशन टाकावे लागेल .
  • यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर, कॅप्चा कोड आणि OTP भरावा लागेल जो तुमच्या मोबाईलवर येईल .
  • यानंतर तुम्हाला आता तुमचे आधार डिटेल्स स्किन वर दिसतील .
  • त्यानंतर तुम्ही तिथून face e- KYC चा पर्याय निवडा .
  • हे सर्व केल्यानंतर कॅमेरा आपोआप ऑन होईल .
  • आता तुम्ही तेथील तुमच्या फोटोवर क्लिक करा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा .
  • अशा पद्धतीने तुम्ही तुमची e – KYC पूर्ण करू शकाल .

तुमची e- KYC झाली आहे की नाही हे कसे तपासावे?

जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल आणि तुम्हाला याची खात्री करून घ्यायची असेल की तुमची e- KYC झाली आहे की नाही, तर खालील दिलेल्या स्टेप फॉलो करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Kisan Sampada Yojana Kisan Sampada Yojana :शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आज मंत्रिमंडळ बैठकीत PM मोदींनी केली मोठी घोषणा…!
  • यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुमचे Mera KYC ॲप ओपन करावे लागेल .
  • यानंतर तुम्हाला तुमचे लोकेशन टाकावे लागेल .
  • त्यानंतर आधार नंबर, कॅप्चा आणि ओटीपी टाकावा लागेल .
  • सर्व माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर, जर तुमची e- KYC आधीच झाली असेल, तर तुम्हाला स्क्रीनवर स्टेटस Y असे दिसेल . y म्हणजे Yes .म्हणजे तुमची ई केवायसी पूर्ण झाली आहे .
  • आणि जर तुम्हाला तुमचे स्टेटस N असे दिसेल .तर N म्हणजे No म्हणजे तुमची ई- केवायसी पूर्ण नाही .म्हणजे तुम्हाला e- KYC प्रक्रिया करावी लागेल .

रेशन कार्ड ची ऑफलाइन पद्धतीने e- KYC कशी करावी?

ज्या नागरिकांना स्वतःच्या मोबाईलवरून ई- केवायसी करता येत नाही अशा नागरिकांनी ऑफलाइन पद्धतीने करावी यासाठी .तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन दुकानात किंवा CSC केंद्रात जाऊन देखील करू शकतात .e- KYC पूर्ण करू शकतात .यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे सोबत घेऊन जावी लागतील.ऑफलाइन पद्धतीने e- KYC करण्यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत घेऊन जावे लागतील .

यानंतर दुकानातील पीओएस मशीनद्वारे तुमची बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन घेतली जाईल आणि आधार नंबर ही व्हेरिफिकेशन केला जाईल . आणि यानंतर तुम्ही तुमची E-KYC पूर्ण होईल. Ration Card e-KYC

हे पण वाचा:
PM Kisan Installment Date PM Kisan Installment Date: पीएम किसानचा 20 वा हप्ता या दिवशी होणार जमा; तारीख जाहीर

Leave a comment