Aadhar Online: आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. याशिवाय तुमचे कोणतेही काम होतच नाही. आधार कार्ड शिवाय शासकीय काम किंवा खाजगी कामासाठी मुख्य ओळखपत्र म्हणून जास्तीत जास्त आधार कार्ड ची मागणी केली जाते. यावरूनच आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. बँकिंग, मोबाईल आणि सरकार योजना यासारख्या अनेक योजनांचा लाभ हा तुमच्या थेट आधारशी जोडला जातो. पण, यासाठी तुमचा अधिकृत मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक असणे खूप महत्त्वाचे आहे.
कारण की, जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत असेल तर तुम्हाला वन टाइम पासवर्ड (OTP) आधारित पडताळणी, UPI व्यवहार आणि इतर डिजिटल पेमेंट मध्ये सहज तुम्हाला प्रवेश मिळतो. पण जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आधार मध्ये अपडेट केलेला नसेल तर तुम्हाला या कोणत्याही सुविधाचा लाभ मिळणार नाही. किंवा तुमचा नोंदणीकृत असलेला मोबाईल नंबर हरवला किंवा कोणत्याही कारणामुळे तुमचा फोन नंबर बदलला असेल तर, तुम्हाला तो ऑनलाइन देखील अपडेट करता येऊ शकतो. ऑनलाइन अपडेट कसा करायचा याबद्दल आज आपण या लेखांमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत .Aadhar Online


आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याची आवश्यकता आहे का?
तुमचा मोबाईल नंबर आधार मध्ये अपडेट करणे हे खूप महत्त्वाचे आहे. आधार व्यवहारासाठी आणि आधार – आधारित पडताळणीसाठी OTP मिळवणे. आदर्श जोडलेल्या सरकारी योजनांमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि तुमच्या आधारशी जोडलेल्या खात्याचे अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.Aadhar Online

हे वाचा : किसान सन्मान निधी योजना – नवीन अपडेट मे 2025

आधार मध्ये मोबाईल नंबर बदलण्याची ऑनलाईन पद्धत
- सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत UIDAI पोर्टल https://www.uidai.gov.in/ ला भेट द्यावी लागेल आणि सेल्फ- सर्व्हिस अपडेट पोर्टल (SSUP) वर जावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला अपडेट करायचा असलेला नोंदणीकृत फोन नंबर एंटर करावा लागेल.
- त्यानंतर OTP पाठवा यावर क्लिक करावे लागेल, प्राप्त झालेला ओटीपी एंटर करावे लागेल आणि पुढे जा.
- त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन आधार सेवा मेनू मधून, तुम्हाला अपडेट करायचा असलेला पर्याय निवडावा लागेल (या प्रकरणात तुमचा मोबाईल नंबर)
- आवश्यक असणारी माहिती द्या व तुमचा मोबाईल नंबर सबमिट करा.
- कॅप्चा व्हेरिफिकेशन: दिलेला सुरक्षा कोड टाकून घ्या आणि पुढे जा .
- त्यानंतर तुमच्या नवीन मोबाईल नंबर वर आलेला OTP एंटर करा.
- आणि सर्व पडताळणी यशस्वी झाल्यानंतर, सेव्ह करून घ्या आणि पुढे जा वर क्लिक करा.
- वर दिलेल्या स्टेप बाय स्टेप फॉलो केल्यानंतर, आधार नोंदणी केंद्रावर अपॉइंटमेंट घ्या आणि बायोमेट्रिक प्रमाणिकरण करण्यासाठी आधार सेवा केंद्राला भेट द्या. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि विविध शुल्क भरण्यासाठी आवश्यक लागणारे कोणतेही अतिरिक्त कागदपत्रे द्या.
- अशा पद्धतीने तुम्ही तुमचा हरवलेला मोबाईल नंबर किंवा कोणत्याही कारणास्तव फोन नंबर बदलला असेल नवीन नंबर अपडेट करू शकतात.Aadhar Online


