Agriculture News : राज्यातील अनेक गावांमध्ये जमिनीच्या मालकांमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये अनेक वेळा जमिनीची वाटणी होते, पण महसूल विभागाच्या नोंदीमध्ये (7/12 उतारा) ती वेगळी दाखवली जात नाही. त्यामुळे वाटणी होऊनही अधिकृत कागदपत्रांमध्ये प्रत्येक मालकाचा स्वातंत्र्य हक्क स्पष्टपणे दिसत नाही. या अशा अडचणीमुळे जमिनीच्या खरेदी विक्री सारख्या व्यवहारांमध्ये अनेक कायदेशीर अडचणी येत राहतात. पण मात्र आता ही समस्या सोडवण्यासाठी राज्य शासनाने एक सोपी प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. वाटणी झालेल्या जमिनीचा आता स्वातंत्र्य 7/12 उतारा मिळवण्यासाठी एक प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया आपण आज या लेखांमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया.Agriculture News

पोटहिस्सा नोंद म्हणजे काय आणि ती आवश्यक आहे?
पोटहिस्सा नोंद म्हणजे, जमिनीची वाटणी झाल्यानंतर सामूहिक 7/12 उताऱ्यातून प्रत्येक भागधारकाला आपल्या आपल्या वाट्याचा जमिनीचा स्वातंत्र्य 7/12 उतारा मिळवण्याच्या प्रक्रियेला पोटहिस्सा असे म्हटले जाते. ही प्रक्रिया करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण की या प्रक्रियेमुळे जमिनीवरील आपला असलेला वैयक्तिक मालकी हक्क कायदेशीर रित्या स्थापित होतो. ज्यावेळेस अनेक व्यक्ती एकाच 7/12 उताऱ्यावर सहमालक म्हणून नोंदवले असतात, त्यावेळेस प्रत्येकाच्या वाटणीची जमीन नेमकं कोणती, स्पष्ट होत नाही यामुळे अनेकांना कर्ज घेण्यास, जमिनीची विक्री करण्यासाठी किंवा कोणत्याही कायदेशीर व्यवहारासाठी अनेक अडचणी येतात. स्वातंत्र्य सात बारा मिळवल्यामुळे प्रत्येक मालकाला आपल्या हिश्याची जमीन स्वतंत्रपणे वापरण्यास आणि तिचा व्यवहार करण्यास पूर्ण अधिकार मिळतो.Agriculture News
स्वातंत्र्य 7/12 उतारा मिळवण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी
- वाटणी कारनामा तयार करा आणि त्याची नोंदणी करा
- सर्व भागीदारांची संमती : कशी करायची यावर सर्व सह-मालकाची एकमताने संमती असणे खूप आवश्यक आहे .जमिनीचा कोणत्याही प्रकारे कायदेशीर वा सुरू असेल,तर पोट हिस्सा नोंदणीची प्रक्रिया पुढे सरकू शकत नाही.यामुळे सर्व वाद मिटवून घेऊन सर्व मालकाची संमती मिळवणे हे पहिले आणि महत्त्वाचे पाऊल आहे .
- लेक वाटणी करार आणि नोंदणी: एकदा सर्व निश्चित झाल्यानंतर , हा निर्णय लेखी स्वरूपात वाटणी करारनामा म्हणून तयार केला जातो .हा करारनामा एका वकिलामार्फत तयार करून घ्यावा .यानंतर हा करारनामा तुमच्या क्षेत्रातील नोंदणी कार्यालयात जाऊन रीतसर नोंदणी करणे बंधनकारक आहे .नोंदणी केल्यामुळे याला कायदेशीर वैधता प्राप्त होते आणि तो भविष्यात पुरावा म्हणून वापरता येऊ शकतो .
2. पोट हिस्सा नोंदणीसाठी अर्ज सादर करा .
- अर्ज कुठे करायचा : नोंदणीकृत वाटणी कारनामा झाल्यावर तुम्हाला तुमच्या संबंधित तालुका कार्यालयातील महसूल विभागाशी संपर्क साधावा लागेल .किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही महाभुलेख या अधिकृत महसूल पोर्टलवरूनही पोट हिस्सा नोंदणीसाठी अर्ज करू शकतात .
- यासाठी आवश्यक कागदपत्रे : ज्या जमिनीची वाटणी झाली आहे त्याचे क्षेत्रफळ, गट क्रमांक, प्रतीक भागधारकाला मिळालेल्या हिश्याची सविस्तर तपशील अर्जात नमूद करणे आवश्यक आहे ,नोंदणीकृत वाटणी कारनामा त्याची मूळ प्रत किंवा प्रमाणित प्रत अर्जासोबत जोडावी ,त्यानंतर जुना सामूहिक सातबारा उतारा ज्याच्यावर सर्वसह मालकाची नावे आहेत ,सर्व जमीन धारकाचे ओळखपत्र जसे की,आधार कार्डआणि पॅन कार्ड.रहिवासी पुरावा,जमिनीचा नकाशा ही कागदपत्रे आवश्यक आहे .Agriculture News
- तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांमार्फत तपासणी : अर्ज प्राप्त झाल्यानंतर, तलाठी संबंधित जमिनीची पाहणी करतो. यामध्ये जमिनीच्या प्रत्यक्ष बांधाची तपासणी केली जाते आणि प्रत्यक्षात जमिनीची वाटणी झाली आहे की नाही याची पाहणी तलाठी कडून केली जाते.
- तलाठी मार्फत तपासणी केल्यानंतर मंडळ अधिकारी एक अहवाल तयार करतो यामध्ये जमिनीची स्थिती वाटण्याची सत्यता आणि इतर संबंधित सर्व माहिती समाविष्ट असते हा अहवाल नंतर पुढील कारवाईसाठी तहसीलदारांकडे सादर केला जातो.Agriculture News
4. तहसीलदाराची मंजुरी
- मंडळ अधिकाऱ्यांचा अहवाल आणि अर्जासोबत जोडलेली सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर मग तहसीलदार पोट हिस्सा मंजूर करतात आणि याची मंजुरी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात पोहोचते.
- तहसीलदारांकडून मंजुरी दिल्यानंतर, महसूल नोंदणी मध्ये बदल करण्यात येतो. यामध्ये प्रत्येक भागधारकांच्या नावाने स्वतंत्र 7/12 उतारा तयार केला जातो. हा उतारा म्हणजेच विशिष्ट भागधारकांच्या मालकी हक्काचा अधिकृत पुरावा असतो.
5. नवीन स्वतंत्र 7/12 उतारा प्राप्त करणे
- मंजुरी दिल्यानंतर, संबंधित व्यक्ती महाभुलेख किंवा ई सातबारा या वेबसाईटवरून आपला नवीन स्वातंत्र्य सात बारा पाहू शकतात आणि डाऊनलोड करू शकतात.Agriculture News
महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवा
- महत्त्वाची बाब म्हणजे , वाटणी सर्व भागीदारांच्या संमतीने झालेली पाहिजे. जर जमिनीवर कोणताही कायदेशीर वाद असेल तर, पोटहिस्सा नोंद करता येत नाही.
- जर जमिनीवर कोणत्याही प्रकारचा कायदेशीर वाद, बंधन किंवा कर्ज असेल तर , तुम्हाला ते अगोदर मिटवणे बंधनकारक आहे . नाहीतर, पोटहिस्सा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही.
- नगरपालिकेच्या हद्दीत किंवा महानगरपालिका हद्दीतील असलेल्या जमिनीसाठी स्थानिक मंजुरी घ्यावी लागेल.Agriculture News