CBSE Pattern राज्यात कसा असेल CBSE पॅटर्न? नव्या शैक्षणिक धोरणाची अभ्यासक्रमापासून ते परीक्षेपर्यंत सर्व माहिती ,पहा सविस्तर

CBSE Pattern : आता महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू केला जाणार आहे. 2025 -26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीपासून सीबीएसीई पॅटर्न लागू केला जाणार आहे . अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे . राज्यातील सीबीएसई पॅटर्न लागू करण्यासंदर्भातील शिक्षक आणि पालकांच्या मनातील जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत या प्रश्नांची उत्तर आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत .

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

शिक्षक मंत्र्यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत नव्या शिक्षण धोरणाची सविस्तर माहिती जाहीर केले आहे . NCERT चा अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक आणि CBSE ची परीक्षा पद्धती महाराष्ट्रात कशी राबवली जाणार आहे याबद्दल जे काय प्रश्न पडले होते ते दूर होणार आहेत. हे नवीन धोरण 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार आहे . टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार असून, पूर्ण करण्यात पूर्ण होईल .CBSE Pattern

CBSE Pattern

नव धोरण 2025 -26 या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने चार टप्प्यात अमलबजावणी होणार

  • 2025- 26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 1 ली .
  • 2026-27 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 2 री ,3 री,4 थी,6 वी .
  • 2027- 28 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी ,7 वी,9 वी,11 वा .
  • 2028-29 शैक्षणिक वर्षात इयत्ता 8 वी, 10 वी,12 वी या वर्गांमध्ये टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार आहे .

हे वाचा : लाडक्या भावांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या निकषात मोठे बदल

पाठ्यपुस्तक बालभारती कडून तयार केले जाणार आहे का?

राज्य मंत्रिमंडळाची पाठ्यपुस्तक हे बालभारती तयार करणार आहे .NCERT च्या पुस्तकांचा अभ्यास करून राज्याच्या आवश्यकते सर्व बदल करून बालभारती स्वातंत्र्य पाठ्यपुस्तक बनवले. SCERT मार्फत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत चा अभ्यासक्रम तयार करण्यात येत असून, नव्या धोरणानुसार पहिलीच्या पुस्तकाचे काम सध्या सुरू आहे. CBSE Pattern

राज्य मंडळ बंद होणार का?

शिक्षण मंत्री स्पष्ट केले आहे की, राज्याची समृद्धी शिक्षण एक परंपरा लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळ बंद होणार नाही. राज्य मंत्रिमंडळ बंद करण्याचा असा कोणताही विचार नाही. कारण की, CBSE पॅटर्न चा अभ्यासक्रम स्वीकारण्यात येईल, पण फक्त 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा राज्य मंडळ घेईल.

पालकांवर बोर्ड निवडीचे बंधन असणार आहे का?

राज्य मंडळ दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेणारा असल्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना कोणत्या बोर्डातून शिक्षण घ्यावे किंवा कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा याबाबत कोणतीही बंधन नाही. CBSE Pattern

इतिहास, भूगोल आणि मराठीच काय ?

नवीन अभ्यासक्रमात महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, संत, समाज सुधारक ऐतिहासिक व्यक्तींना प्राधान्य असेल. इतिहास, भूगोल आणि भाषा विषयात या बाबींचा समावेश असेल. मराठी भाषा ही सर्व शाळांमध्ये बंधनकारक राहील, त्यामुळे तिचा सन्मान आणि अभिजात दर्जा कायम टिकून राहील.

शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक असणार

वेळापत्रकाविषयी खुलासा करण्यात येतो की आपल्या सध्याच्या हवामान आणि भौगोलिक परिस्थितीनुसार शाळेचे वेळापत्रक ठरवण्यात येणार आहे.

सरकारी शाळेमध्ये मुलांना मप्रशिक्षण असणार आहे का?

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळा शासन मान्यता प्राप्त अनुदान शाळा यामधील मुलांना दहावीपर्यंतचे शिक्षण आणि मुलींना बारावीपर्यंतची शिक्षण मोफत दिले जाणार आहे.

शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे काय?

नवीन अभ्यासक्रमानुसार शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू आहे. ब्रिज कोर्सद्वारे अतिरिक्त प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. CBSE Pattern

CBSE पॅटर्न म्हणजे काय?

2020 च्या राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित व्हावीत ,यासाठी धोकपट्टी आधारित परीक्षा न ठेवता CBSE च्या परीक्षा पद्धतीप्रमाणे सर्वकष मूल्यमापन पद्धतीचा अवलंबन केलं जाईल .यामध्ये संकल्पना वर भर ,सतत मूल्यमापन (CCE) व्यवहारिक ज्ञान, स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सीबीएसई अभ्यासक्रम JEE, NEET, UPSC यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी फायदेशीर ठरतो, सॉफ्ट स्किल्स आणि उच्च दर्जेदार शिक्षणावर लक्ष असेल.हे नवीन धोरण विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यास मदत करणार आहे, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे .व्यक्त करण्यात आला आहे. CBSE Pattern

Leave a comment

Close Visit Batmya360