Chara Anudan 2025: जनावरांच्या चाऱ्यासाठी सरकार देतयं अनुदान…!असा करा अर्ज…

Chara Anudan 2025 : प्रत्येक ग्रामीण भागातील शेतकरी हे शेतीबरोबरच दूध उत्पादन व्यवसाय करत असतात .तर अशा शेतकऱ्यांसाठी एक सरकारने महत्वकांशी योजना सुरू केली आहे .या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरासाठी आवश्यक असणारा चारा(वैरण) तयार करण्यासाठी 100% अनुदानावर बियाणे आणि ठोंबे दिले जाणार आहेत .या योजनेची सुरुवात 2025-26 ते 2028-29 या कालावधीसाठी राज्यात राबविण्यात येणार आहे .

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे अनेक वेळा जनावरांना पाहिजे तेवढा चारा उपलब्ध नसल्यामुळे अनेक वेळा दूध उत्पादनावर परिणाम होतो. यामुळे जनावरांना भरपूर आणि पौष्टिक चारा उपलब्ध करून देऊन दूध उत्पादनामध्ये वाढ करणे हा आहे . या कारणामुळे शासनाने चारा उत्पादनासाठी विशेष भर देण्याचा निर्णय घेतला आहे. Chara Anudan 2025

Chara Anudan 2025

कसे आहे या योजनेचे स्वरूप?

या योजने अंतर्गत दूध उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या जनावरांच्या चाऱ्यासाठी प्रति लाभार्थी 1 हेक्टर क्षेत्रासाठी 4000 रुपयापर्यंतचे बियाने आणि ठोंबे मोफत पुरवले जातील .म्हणजेच या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना हा संपूर्ण खर्च मोफत होणार आहे. ज्वारी, मका ,बाजरी ,बरसीमा, लसूणघास , न्युट्रीफिड तसेच नेपियर गवता सारख्या बहुवर्षीय प्रजातीचे बियाणे आणि ठोंबे या योजनेतून पुरवली जातील .Chara Anudan 2025

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : जमिनीची हिस्से वाटप मोजणी आता फक्त 200 रुपयात, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता आणि निकष

  • या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे कमीत कमी 3 ते 4 स्वतःची जनावरे असणे आवश्यक आहे .
  • याची माहिती भरताना पशुधन प्रणाली किंवा केंद्र सरकारने घोषित केलेल्या प्रणालीवर नोंदलेली असावी .
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःची शेत जमीन असावी .तसेच त्यावर सिंचनाची सोय असणे अनिवार्य आहे .
  • शेतकऱ्यांना वैरणीच्या उत्पादनासाठी लागणारी खते, सूक्ष्मद्रव्ये व इतर आवश्यक घटक स्वतःच्या खर्चाने खरेदी करावे लागणार आहे .
  • या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना – लहान,मध्यम,अल्पभूधारक किंवा मोठ्या शेतकऱ्यांनाही दिला जाणार आहे.
  • शेतकऱ्यांना मात्र एका आर्थिक वर्षात एकदाच लाख मिळेल .

ही योजना कशी राबविण्यात येईल?

ही योजना ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यालय अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त यांच्यामार्फत लाभार्थ्याकडून ऑनलाइन अर्ज राबविले जाणार आहेत .उपलब्ध असणाऱ्या निधीच्या आधारावर पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची निवड केली जाईल .यासाठी बियाण्याची खरेदी महाबीज,राष्ट्रीय बियाणे महामंडळ,कृषी विद्यापीठे,महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ,पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकासमहामंडळ यांच्या प्रक्षेत्रांतून होणार आहे .त्यामुळे बियाण्यांची गुणवत्ता ही अत्यंत उच्च प्रतीची असेल, याची हमी आहे.

या योजनेत बियाणे वाटप करण्या आयागोदर लाभार्थ्यांना तांत्रिक मार्गदर्शन दिले जाईल. कोणत्या ऋतूमध्ये कोणती वैरण पिके घ्यावीत, लागवड कशी करावी, उत्पादन वाढवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत प्रशिक्षक याच्या कडून माहिती दिली जाईल त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ अनुदान मिळणार नाही, तर प्रत्यक्ष उत्पादन वाढवण्यासाठी मार्गदर्शनही मिळेल.Chara Anudan 2025

1 thought on “Chara Anudan 2025: जनावरांच्या चाऱ्यासाठी सरकार देतयं अनुदान…!असा करा अर्ज…”

Leave a comment