CNG Tractor : शेतकऱ्यांसाठी खास सीएनजी ट्रॅक्टर उपलब्ध…आता डिझेलची गरज नाही, पैशाची मोठी बचत करा

CNG Tractor : शेतीत सातत्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे जीवन अधिक सुलभ होत चालले आहे तसेच उत्पादन क्षमता ही वाढत चालली आहे. या बदलांमध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजेच इंधन कार्यक्षमतेकडे झुकलेली यंत्रसामग्री .अशाच प्रकारे शेतकऱ्यांना डिझेलच्या वाढत्या किमती पासून सुटका मिळणार आहे.

आता प्रत्येक नागरिकांना पारंपारिक पद्धतीने शेती करणे होत नाही. वेळेवर मजूर मिळत नाही अशावेळी शेतकरी हा तंत्रज्ञानाचा उपयोग करत असतो. शेतीतील प्रत्येक कामासाठी शेतकरी हे मनुष्यबळापेक्षा तंत्रज्ञानाकडे वळले आहेत. यामुळे वेळेची बचत होऊन शेतातील कामे लवकर पूर्ण होतात परंतु इंधनाचा वापर करायचा म्हटलं तर डिझेल आलेच.आणि डिझेलचे भाव तर खूपच वाढले आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही. मजूर लावून करून घ्यायला मजूर मिळत नाही? तर अशाच शेतकऱ्यांना मजुरापासून व डिझेलच्या वाढत्या किमती पासून दिलासा देण्यासाठी आयशर कंपनीने “आयशर 485 डी सीएनजी ” (CNG Tractor) हा नवीन ट्रॅक्टर बाजारात सादर केला आहे.

20250602 143607

सीएनजी वर चालणारा हा ट्रॅक्टर फक्त पर्यावरण पूरकच नाही, तर त्याचे मायलेज देखील उल्लेखनीय आहे. हा ट्रॅक्टर डिझेलच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरत आहे यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये याची मागणी वाढत आहे. या ट्रॅक्टरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी इंधन खर्च, उत्तम कार्यक्षमता आणि देखभाल खर्चात बचत.CNG Tractor

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : नवीन मिनी ट्रॅक्टर साठी सरकार देतंय 90 टक्के अनुदान, फक्त 35 हजार रुपये गुंतवा आणि असा घ्या लाभ !

या ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये काय?

या ट्रॅक्टरचे वैशिष्ट्ये म्हणजेच 485 डी सीएनजी ट्रॅक्टर मध्ये 45 एचपी चे शक्तिशाली इंधन आहे. ज्यामुळे मध्यम ते मोठ्या शेतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच या ट्रॅक्टरमध्ये 8 फॉरवर्ड आणि दोन रिव्हर्स गेअर्स आहेत ज्यामुळे शेतातील कामात योग्य गती आणि नियंत्रण राखता येते. या ट्रॅक्टरला ब्रेकिंग सिस्टम मध्ये दोन पर्याय मिळतात एक म्हणजे, सील केलेले ड्राय ब्रेक्स आणि ऑइल इमर्स्ड ब्रेक्स ,जे त्यांच्या गरजेनुसार निवडता येतात. तसेच या ट्रॅक्टरमध्ये, मेकॅनिकल आणि पॉवर स्टोअरिंगचे पर्यायही देण्यात आले आहेत . या सिस्टम मुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चालवणे अधिक सोपे आणि आरामदायक होत आहे .यामुळे शेतकऱ्यांना दिवसभरही काम केले तरीही थकवा जाणवणार नाही .CNG Tractor

या ट्रॅक्टरला डिझेल लागणार नाही

सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीएनजी या ट्रॅक्टरला डिझेलची गरज लागत नाही. यामुळे इंधन खर्चात मोठी बचत होते. सध्याच्या काळामध्ये तर डिझेल आणि पेट्रोलचे दर सतत वाढत आहेत. यामुळे प्रत्येक नागरिकांना याचा मोठा आर्थिक बहुत सहन करावा लागतो . परंतु आयशर 485 डी सी एन जी मुळे शेतकऱ्यांना शेतातील कामासाठी हा ट्रॅक्टर खूप फायद्याचा ठरणार आहे .सीएनजी हे इंधन स्वस्त आणि पर्यावरण पूरक असल्यामुळे हे ट्रॅक्टर केवळ शेतकऱ्यांच्या खिशाला थालके नाही तर पर्यावरणाच्या दृष्टीने ही फायदेशीर ठरणार आहे .

एकूणच पाहता आयशर 485 डी सीएनजी (CNG Tractor) हा ट्रॅक्टर आधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक इंधनाचा उत्तम मिलाफ आहे. यामुळे शेतकऱ्यांना केवळ उत्पादनातच नाही तर खर्चातही मोठा फायदा होतो. मायलेज, पॉवर, आराम आणि किफायतशीरता या सर्व बाबतींत हा ट्रॅक्टर एक आदर्श पर्याय आहे. त्यामुळे भविष्यात सीएनजी ट्रॅक्टर हे शेतीत गेम चेंजर ठरणार आहेत, हे निश्चित.CNG Tractor

1 thought on “CNG Tractor : शेतकऱ्यांसाठी खास सीएनजी ट्रॅक्टर उपलब्ध…आता डिझेलची गरज नाही, पैशाची मोठी बचत करा”

Leave a comment