Gram Rojgar Sevak Mandhan Vadh 2024 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाची बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये 38 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत या बैठकीमध्ये कोतवाल आणि ग्राम रोजगार सेवकांच्या मानधना बद्दल देखील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयामुळे कोतवाल आणि ग्राम रोजगार सेवकांना याचा मोठा लाभ होणार आहे.
आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यात आले आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला अथवा कर्मचारी निवृत्त झाले, अशा कर्मचाऱ्यांच्या निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे याबरोबरच सेवानिवृत्ती अनुदान 14 लाखावरून थेट 20 लाख रुपये एवढा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच गाव गाडा हाकण्यास मदत करणाऱ्या कोतवाल आणि ग्रामरोजगार सेवकांच्या मानधन वाढ करण्याविषयी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. Gram Rojgar Sevak Mandhan Vadh 2024
ग्रामरोजगार सेवकांच्या आणि कोतवालांच्या मानधनांमध्ये आता वाढ करण्यात आली आहे याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे सर्व निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामुळे ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे याबरोबरच कोतवालांच्या मानधन मध्ये देखील वाढ करण्याबद्दल निर्णय घेण्यात आले आहे याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.
Gram Rojgar Sevak Mandhan Vadh 2024 ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनात झाली वाढ :
राज्यांमधील ग्राम रोजगार सेवकांना प्रति महिना 8000 रुपये मानधन मिळणार आहे तसेच प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे ग्राम पातळीवरील ग्रामरोजगार सेवकांना 2 हजारापेक्षा जास्त दिवस काम पूर्ण केले आहेत त्यांना मजुरी खर्चाच्या 1% प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल 2000 दिवसापर्यंत काम केलेल्या ग्राम रोजगार सेवकांना प्रति महिना ₹1000 आणि 2001 पेक्षा जास्त दिवस काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना प्रति महिना ₹2000 प्रवास पत्ता आणि डेटा पॅक करिता अनुदान देण्यात येईल.
कोतवालांचा मानधन ठरलं :
Gram Rojgar Sevak Mandhan Vadh 2024 राज्यांमधील कोतवालांच्या मानताना मध्ये 10% वाढ करण्याबद्दल निर्णय घेण्यात आला आहे आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे त्याबरोबरच कोतवाल कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू करण्यास ही मंजुरी देण्यात आली आहे याबरोबरच राज्यांमधील 12793 कोतवालांना याचा लाभ मिळणार आहे.