HSRP Number Plate: एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी मिळाली मुदतवाढ! या तारखेपर्यंत करता येणार अर्ज.

HSRP Number Plate : राज्यातील परिवहन विभागाने अलीकडे एक अधिसूचना जाहीर केली आहे. ज्यामध्ये एप्रिल 2019 च्या अगोदर विकल्या गेलेल्या तरी वापरात असणाऱ्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडून 30 मार्च पूर्वी नंबर प्लेट बसवण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु आता यामध्ये मुदतवाढ करण्यात आली आहे.

HSRP Number Plate

आतापर्यंत किती गाड्यांनी HSRP नंबर प्लेट बसवल्या?

सुरुवातीला राज्यातील गाड्यांना नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 मार्च पर्यंत आणि त्यानंतर 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, आता तिसऱ्या वेळेस ही मुदत वाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील अंदाजे 18 लाख गाड्यांनी HSRP नंबर प्लेट बसवल्याचा अंदाज आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी असा करा ऑनलाइन अर्ज….

HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी किती आहे अंतिम तारीख

राज्य सरकारकडून 2019 नोंदणीकृत असणाऱ्या वाहनांना एचएसआरपी (HSRP Number Plate) क्रमांक पाटी बसवणे बंधनकारक केले आहे. जर तुमची वाहन 2019 अगोदर खरेदी केलेले असेल तर तुम्हाला तुमच्या वाहनांना Hsrp नंबर प्लेट बसवणे आवश्यक आहे. नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहनधारकांना 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जर तुम्ही 30 जून पर्यंत तुमच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नसेल तर दंड आकारण्यात येणार आहे.

30 जून पर्यंत HSRP नंबर प्लेट नसेल तर किती आहे दंड?

आपले वाहन जर 2019 पूर्वी खरेदी केलेले असेल तर आपणास आपल्या वाहनांना एचएसआरपी (HSRP Number Plate) नंबर प्लेट बसवणे आवश्यक आहे. जर तुम्ही 30 जून पर्यंत तुमच्या वाहनांना नंबर प्लेट नाही बसवली तर 10000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. पहिल्या वेळी HSRP नंबर प्लेट दंड हा 5 हजार रुपये आहे तर दुसऱ्या वेळी परत HSRP नंबर प्लेट नसल्यास तुमच्याकडून 10 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
HSRP नंबर प्लेट दंडापासून वाचवण्यासाठी तुमच्या वाहनाला 30 जून पर्यंत HSRP नंबर पाटी बसवून घेणे गरजेचे आहे. HSRP नंबर पाटी ही सर्व वाहनांसाठी बंधनकारक करण्यात आलेली आहे.HSRP Number Plate

नंबर प्लेट रजिस्टर करण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

  • मोटरसायकल आणि ट्रॅक्टरसाठी 450 रुपये.
  • तीन चाकी वाहनांना 500 रुपये.
  • चार चाकी, अन्य वाहने 745 रुपये.

महत्वाची सूचना

कृपया तुम्ही लक्षात ठेवा, (HSRP Number Plate) जर तुमचे वाहन महाराष्ट्र राज्यात एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत असेल तरच तुम्हाला HSRP नंबर प्लेट साठी अर्ज करू शकतात.

निष्कर्ष

वाहनांच्या सुरक्षे आणि ओळखीसाठी HSRP नंबर पाटी आवश्यक आहे. राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार, 30 जून 2025 पूर्वी आपल्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसून नियमाचे पालन करावे, जेणेकरून भविष्यातील दंडात्मक कारवाई टाळता येईल आणि वाहनांची सुरक्षा निश्चित होईल.HSRP Number Plate

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

  1. HSRP नंबर प्लेट कुठे बसवता येते?.
  • एचएसआरपी ही नंबर प्लेट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने https://transport.maharashtra.gov.in/1035/Home या संकेतस्थळावर नोंदणी करता येऊ शकते.
  1. एच एस आर पी म्हणजे काय?.
  • एचएसआरपी म्हणजे उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट, जी वाहनांची ओळख आणि सुरक्षा वाढविण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे.
  1. HSRP नंबर पाटी वाहनाला बसवणे कधीपासून बंधनकारक आहे?
  • तुमचे वाहन जर 1 एप्रिल 2019 पूर्वी खरेदी केलेली असेल तर तुम्हाला 30 2025 पर्यंत एचएसआरपी बसवणे बंधनकारक आहे .
  1. एचएसआरपी नंबर प्लेट रजिस्टर करण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?
  • वाहनाच्या प्रकारानुसार किंमत वेगळी आहे: मोटर सायकल साठी 450 रुपये, तीन चाकी वाहनाला 500 रुपये, फोर व्हीलर साठी 745 रुपये मोजावे लागणार आहे.

Leave a comment

Close Visit Batmya360