कापूस सोयाबीनचे कसे असणार दर ; तुरीला तेजी कायमच राहणार ? Kapus Soyabean Rate 2024

Kapus Soyabean Rate 2024 शेतकरी यावर्षी नाशवंत शेतीमाल वगळता नेहमीसारखे लगेच विक्री करत असताना दिसत नाहीत शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीन कापूस आणि तुरीचा स्टॉल केला आहे हरभऱ्याची ही विक्री काही प्रमाणात का होईना अशीच होण्याची शक्यता आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Kapus Soyabean Rate 2024

सोयाबीन आणि कापूस हंगाम सुरू होऊन आता सहा महिने झाले तुरीही बाजारामध्ये येऊन आता तीन महिने होत आहेत हरभरा आवक दबाव पुढील काही दिवसांमध्ये जास्त वाढेल शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस दरवाढीच्या आशेने माल मागे ठेवले आहे.

शेतकऱ्यांना देखील मिळणार कापूस सोयाबीन अनुदान

परंतु मागील दोन महिन्यापासून दर दबावात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विक्री वाढवण्यासाठी त्याला आणखी अनेक घटक कारणीभूत आहेत तरीही अनेक शेतकऱ्यांकडे अजूनही स्टॉक उपलब्ध आहे त्यामुळे पुढील काळामध्ये सोयाबीन, कापूस, तूर आणि हरभरा बाजार भाव कसा असणार आहे याचा आढावा घेतलेला आहे. Kapus Soyabean Rate 2024

Kapus Soyabean Rate 2024 कापसाला कशामुळे भाव येईल ?

देशामध्ये यावर्षी कापसाचे उत्पादन कमी राहील हे जवळपास ऑक्टोंबर मध्ये स्पष्ट झाले होते शेतकरी उत्पादकता कमी असल्याचे सांगत होते . त्यामुळे बाजार दबावात ठेवण्याचा प्रयत्न झाला परंतु मागील हंगामामध्ये कापसाचा तुटवडा होता गेल्यावर्षी शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 12000 पर्यंत दर मिळाला होता मात्र हा भाव शेवटच्या टप्प्यात मोजक्याच मालाला मिळाला आहे.

हंगामाचा विचार करता प्रत्यक्षामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपये भाव मिळाला होता गेल्यावर्षीच्या भावापेक्षा यावर्षी 10,000 रुपयांचा भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती त्यामुळे शेतकरी सुरवातीच्या टप्प्यात कापूस विकत नव्हते परंतु उद्योगांना कापसाची गरज होती त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात कापसाचे भाव 9 हजार पेक्षाही जास्त वाढवले आहेत.

Kapus Soyabean Rate 2024 डिसेंबर आणि जानेवारीमध्ये बाजारामधील आवक कमी राहील परंतु फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांनी विक्री वाढवली फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सरासरीच्या तुलनेत आवक दुप्पट राहील.

कापूस भाव वाढीसाठी पोषक घटक :

  • देशांमधील घटलेले उत्पादन
  • शेतकऱ्यांकडे असणारा कमी स्टॉक
  • यावर्षीच्या हंगामात कापूस लागवड कमी होण्याचा अंदाज
  • आंतरराष्ट्रीय पातळीवरील लागवड घटण्याची शक्यता
  • बांगलादेश सहज शेजारच्या देशांमधील घटलेले उत्पादन
  • देशातील उद्योगांची वाढलेली क्षमता
  • देशातील लग्नसराई आणि समारंभामुळे कापडाला उठाव

सोयाबीन दरात होणार की नाही ?

Kapus Soyabean Rate 2024 यावर्षी सोयाबीन बाजारात अर्जेंटिना मधील उत्पादन घटनेमुळे मोठ्या घडामोडी घडल्या आहेत सोया पेंड निर्यात आणि उत्पादनात अर्जेंटिना आघाडीवर आहे अर्जेंटिना मध्ये मागील हंगामात 349 लाख टन उत्पादन झाले होते ते यावर्षी 250 लाख टनांवर स्थिर होऊ शकते.

तसेच बांगलादेश सह भारताच्या शेजारील देशांना ब्राझील मधून सोया पेंड आयात करण्यामध्ये अडचणी असतात डिलिव्हरी पोहोच होण्यासाठी विलंब होतो त्यामुळे बांगलादेश, जपान. वियतनाम इत्यादी देश भारताकडून सोया पेंड घेत असतात.

सोयाबीनला कशाचा आधार आहे ?

  • शेतकऱ्यांकडे साठा कमी झाला.
  • सोया पेंड निर्यात जवळपास दुप्पट झाले.
  • एप्रिल मध्ये निर्यात विक्रमी होण्याची शक्यता.
  • सरकारकडून खात्यातील आयात शुल्क वाढीचा अंदाज.
  • बाजारातील आवक कमी होण्याचा अंदाज.
  • आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर पूर्व पातळीकडे.
  • शेजारील देशांची सोयाबीन साठी भारताला पसंती.
  • सोया पेंड दर मंदीतून सावरले.

तूर भावात तेजी कायम राहणार ?

चालू हंगामामध्ये तूर बाजारात येण्याच्या आधीपासूनच तेजीत आहे तुरे नवा माल बाजारामध्ये येण्याच्या आधीच 7 हजारांचा टप्पा गाठला होता याला मुख्य कारण होते देशांमधील घटलेली लागवड आणि उत्पादकता.

भारताला दरवर्षी 45 ते 46 लाख टन तुरीची आवश्यकता असते मागील हंगामामध्ये देशात 43 लाख 50 हजार टन उत्पादन झाले होते तर आयात आठ लाख 60 हजार टन होते त्यामुळे देशात अतिरिक्त पुरवठा राहून दर दबावात होते शेतकऱ्यांना हमीभाव ही मिळाला नव्हता.

Kapus Soyabean Rate 2024 त्यामुळे यंदा लागवड कमी झाली यामध्ये बदलते वातावरण आणि पावसाचा पिकाला फटका बसलेला त्यामुळे उत्पादन 36 लाख टनांवर राहिले असा सरकारचा अंदाज आहे परंतु व्यापारी आणि उद्योगाच्या मते 30 ते 32 लाखाच्या वरच उत्पादन स्थिरावेल.

2 thoughts on “कापूस सोयाबीनचे कसे असणार दर ; तुरीला तेजी कायमच राहणार ? Kapus Soyabean Rate 2024”

Leave a comment