Kapus Soybean Anudan E-KYC 2024 कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे अनुदानासाठी पात्र 96 लाख शेतकऱ्यांपैकी 68 लाख शेतकऱ्यांनी आधार ही केवायसी केलेली आहे परंतु 21 लाख 38 हजार शेतकऱ्यांनी अजूनही केवायसी केलेली नाही.
ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी करणे अजूनही बाकी आहे अशा शेतकऱ्यांची यादी प्रत्येकामध्ये प्रदर्शित करण्यात आलेली आहे ही केवायसी केल्याशिवाय अनुदान मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकर ये केवायसी करायचे आहे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
हे वाचा : जमीन मोजणी मोबाईल वरून
Kapus Soybean Anudan E-KYC 2024 शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक
अर्थ साहाय्यासाठी ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांनी आधार लिंक करणे आवश्यक आहे आधार लिंक केल्यानंतरच बँक खात्यावर शासनाकडून ही रक्कम डीबीटी च्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे आतापर्यंत 96 लाख खातेदार पैकी 68 लाख खातेदार यांनी आपले आधार संमती दिली आहे यापैकी नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेमध्ये 46.68 लाख आधार क्रमांक झाले आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांची ही केवायसी करण्याची आवश्यकता नाही.
परंतु या व्यतिरिक्त राहिलेले 21.38 लाख शेतकऱ्यांनी त्यांचे आधार ई-केवायसी करणे आवश्यक आहे यापैकी 2.30 लाख शेतकऱ्यांनी दिनांक 25 सप्टेंबर 2024 अखेर ही केवायसी पूर्ण केली आहे तर उर्वरित 19 लाख शेतकऱ्यांसाठी विभागाने नवीन पोर्टल वरती सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
Kapus Soybean Anudan E-KYC 2024 कशी करावी ?
शेतकऱ्यांची ई-केवायसी करणे अद्यापही बाकी आहे अशा शेतकऱ्यांची यादी प्रत्येक गावामध्ये प्रदर्शित करण्यात आलेली आहे सदरच्या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यक अशी संपर्क साधावा कृषी सहाय्यक त्यांच्या लॉगिन च्या माध्यमातून उपलब्ध सुविधा द्वारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल नंबर वरती येणाऱ्या आठवीच्या माध्यमातून ई-केवायसी करता येते.
- Kapus Soybean Anudan E-KYC 2024 तसेच शेतकरी स्वतः सुद्धा या पोर्टल वरती जाऊन ओटीपी च्या माध्यमातून किंवा बायोमेट्रिक च्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात जाऊन ही केवायसी करू शकतात
- शेतकऱ्यांनी सर्वप्रथम https://scagridbt.mahait.org/ या संकेतस्थळावर जावे
- या पोर्टलच्या मुख्य पानावरती वितरण स्थिती या पर्यायावर क्लिक करायचे आहे
- शेतकऱ्यांनी आपला आधार नंबर तिथे टाकायचा आहे
- नंतर मोबाईल नंबर वर प्राप्त ओटीपी वापरून किंवा सेवा सुविधा केंद्रातील बायोमेट्रिक मिशनच्या माध्यमातून केवायसी पूर्ण करायचे आहे.
KYC पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा !
कापूस सोयाबीन अनुदान साठी kyc करणे अवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे अश्या शेतकऱ्यांना kyc करण्याची आवश्यकता नाही. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो व ज्यांनी kyc पूर्ण केली आहे अश्या 68 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यास सुरवात झाली आहे. येत्या 1 ते 2 दिवसात राज्यातील पात्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम dbt च्या सहाय्याने जमा करण्यात येणार आहे.
1 thought on “ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार कापूस सोयाबीन अनुदान ; वाचा सविस्तर माहिती : Kapus Soybean Anudan E-KYC 2024”