Namo shetkari update : महाराष्ट्रातील शेतकरी सध्या दोन गोष्टींची आतुरतेने वाट पाहत आहेत – पाऊस आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता. पावसाने काही ठिकाणी दिलासा दिला आहे, पण शेतकऱ्यांच्या खात्यात नमो हप्त्याची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही. एक तारीख गेली, दुसरी आली, तीही गेली आणि आता २२ जुलैची वाट पाहत आहोत.
शेतकऱ्यांची अपेक्षा आणि वास्तव
योजनेच्या निधी वितरणाबाबत GR (शासन निर्णय) १७ जुलैपर्यंत येईल अशी आशा होती. त्यामुळे २२ जुलैला हप्ता वितरित होईल असे वाटले. मात्र, राज्य सरकारने अद्याप दोन हप्ते थकीत आहेत. यावर्षीच्या पावसाळी अधिवेशनात प्रत्येक आमदार आणि मंत्री नमो शेतकरी योजनेचे गुणगान करताना दिसले. “शेतकऱ्यांचा सन्मान” म्हणून ही योजना राबवली जात असल्याचे सांगितले जाते.

पण वास्तव काय आहे? खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी हप्ता मिळाला असता तर शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला असता. आता खरीप हंगाम जवळ आला आहे, अनेक शेतकरी दोनदा पेरणी करत आहेत. काही मंत्री बियाणे देण्याची घोषणा करत आहेत, पण प्रत्यक्षात तेही पुरेसे होत नाहीत. या परिस्थितीत किमान एक छोटा हप्ता मिळाला तरी शेतकरी बियाणे खरेदी करू शकतील आणि काही प्रमाणात आधार मिळेल.

शेतकऱ्यांच्या अडचणी आणि सरकारची जबाबदारी
सध्या शेतकरी आर्थिक संकटात आहेत. दोन हप्ते थकीत असताना पेरणी, खत, कीटकनाशके यासाठी खर्च करणे कठीण झाले आहे. २२ जुलै हा मुख्यमंत्री यांचा वाढदिवस आणि दिवंगत अजित दादा पवार यांचा जन्मदिन. या दिवशी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी जोरदार आहे.

१ जुलैला राज्य शेतकरी दिन साजरा झाला, पण त्यादिवशीही काही झाले नाही. आता २२ जुलैही अशाच प्रकारे जाईल की काय, अशी भीती वाटते. सरकारने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

तुलना करा: सरकार ४०,००० कोटींचे कर्जमाफी, ४८,००० कोटींचे विज बिल माफी, हजारो कोटींच्या ‘लाडकी बहिण’ योजनांसाठी निधी उपलब्ध करत आहे. पण नमो शेतकरी योजनेसाठी निधीची कमतरता दिसते. ही फक्त शेतकऱ्यांची उपेक्षा नाही तर अवमान आहे.
शेतकऱ्यांनी काय करावे?
- आवाज उठवा: प्रत्येक शेतकरी, शेतकऱ्यांचा मुलगा आपल्या पद्धतीने आवाज उठवावा.
- प्रतिनिधींना प्रश्न विचारा: आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना टॅग करा आणि एकच प्रश्न विचारा – नमो शेतकरी हप्ता कधी येणार?
- सामूहिक मागणी: थकीत हप्ते तातडीने वितरित करण्याची मागणी करा. जाहिराती आणि प्रचार यापेक्षा प्रत्यक्ष कृती हवी.



