या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी 307 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर : Nuksan Bharpai Anudan Vadh 2024

Nuksan Bharpai Anudan Vadh 2024 राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 307 कोटी 25 लाख रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे राज्यांमध्ये नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 दरम्यान विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती त्यामुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय गुरुवारी प्रसिद्ध केलेला आहे. अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेती पिकाचे नुकसान झाले असेल तर राज्य सरकारकडून पुढील हंगामासाठी निविष्ठा अनुदान स्वरूपामध्ये मदत केली जाते.

कापूस सोयाबीन अनुदान KYC

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Nuksan Bharpai Anudan Vadh 2024 राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी 2024 मध्ये अनुक्रमे 144 कोटी आणि 2109 कोटी रुपये दिलेले आहेत तसेच जानेवारी ते मे 2024 दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 596 कोटी रुपयांचे आर्थिक मदत केलेली आहे परंतु नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता त्यानुसार राज्य सरकारने 307 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिलेली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले शेतकऱ्यांना राज्य सरकार द्वारे अनुदान स्वरूपामध्ये या आर्थिक रकमेचा लाभ दिला जातो.

अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेती पिकाचे नुकसान झाले असल्यास राज्य सरकारकडून पुढील हंगामासाठी अनुदान स्वरूपात मदत दिली जाते राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी 2024 मध्ये अनुक्रमे 144 कोटी आणि 2109 कोटी रुपये दिले आहेत.

Nuksan Bharpai Anudan Vadh 2024 या योजनेद्वारे 26 जिल्ह्यांचा समावेश :

Nuksan Bharpai Anudan Vadh 2024 कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजी नगर,, परभणी, बीड ,जालना ,धाराशिव, नांदेड ,हिंगोली ,लातूर ,विदर्भातील अमरावती ,नागपूर, भंडारा ,गोंदिया ,चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, तसेच कोकण मधील ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश केला आहे. नुकसानग्रस्त भागांमध्ये या 26 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायतीचे राहते आणि बहुवार्षिक विकासासाठी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अनुदान देण्यात येणार आहे त्याचे वितरण डीबीटी पोर्टल च्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा करण्याचे आदेशही शासन निर्णयामध्ये देण्यात आलेले आहेत. सरकार द्वारे शेतकऱ्यांना अतिवृष्टी मुळे झालेल्या त्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी अनुदान दिले जाते.

नुकसान अनुदानात वाढ मिळणार 13600 रुपये

Nuksan Bharpai Anudan Vadh 2024 राज्य सरकार ने राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ति व्यवस्थापन NDRF मधून वाटप करण्यात येणाऱ्या निधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या जुन्या पद्धतीत शेतकऱ्यांना हेक्टरी 8700 रुपये आर्थिक मदत केली जात होती ज्या मध्ये 2 हेक्टर ची मर्यादा ठेवण्यात आली होती. आता नव्या नियमाने शेतकऱ्यांना हेक्टरी 13600 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे, त्या सोबतच या मधील मर्यादा 3 हेक्टर पर्यन्त करण्यात आली आहे. ज्या मुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता नैसर्गिक नुकसान झाल्यास प्रती हेक्टर 13600 रुपये अनुदान नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहे.

Leave a comment