Pm Kisan And Namo Shetkari Yojana Hafta 2024 महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याचे ₹2000 आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्याशिवाय महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महा सन्मान योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
हे वाचा : दसऱ्या निमित्त रेशन कार्ड धारकांना मिळणार या वस्तु
देशांमधील शेतकऱ्यांना ₹2000 तर महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारचे असे एकूण 4000 रुपये दिले जाणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये वाशिम येथे होणाऱ्या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या खात्यावर ती रक्कम वर्ग केली जाणार आहे.
Pm Kisan And Namo Shetkari Yojana Hafta 2024 किती शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपये ?
केंद्र सरकारने पीएम किसान सम्मान योजना 2019 च्या निवडणुकीपूर्वी सुरू केली होती त्या योजनेअंतर्गत आतापर्यंत 17 हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर नमो शेतकरी महासंघ योजना सुरू केली होती या योजनेद्वारे शेतकऱ्यांना यापूर्वी चार हप्त्याची रक्कम दिली गेली होती.
महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासंघ निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे महाराष्ट्र मधील एकूण 91.53 लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान सम्मान निधि आणि राज्याच्या नमूद शेतकरी महा सन्मान निधी या योजनांचे प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकूण 4000 रुपये जमा केले जाणार आहेत.
पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 17 हप्त्यामध्ये 34 हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत देशांमधील या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची संख्या 9 कोटी 40 लाख इतकी आहे पी एम किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्या द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 20 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित करण्यात येईल. Pm Kisan And Namo Shetkari Yojana Hafta 2024
Pm Kisan And Namo Shetkari Yojana Hafta 2024 केवायसी करणे बंधनकारक :
पीएम किसान सम्मान निधि योजना चे 18 व्या हप्त्याची रक्कम मिळवायची असल्यास या योजनेतील पात्र शेतकऱ्यांना ₹2000 मिळवायचे असल्यास ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले आहे ही केवायसी करण्यासाठी शेतकरी पी एम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
तिथे केवायसी पर्याय वरती क्लिक करून आधार क्रमांक टाकावा लागेल यानंतर फोन वरती ओटीपी क्रमांक येईल तो ओटीपी क्रमांक नोंदवल्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल पी एम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटस सह पी एम किसान चे ॲप आणि नागरी सुविधा केंद्रांमध्ये जाऊन ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते.
2 thoughts on “शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4000 जमा ; योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी करणे बंधनकारक : Pm Kisan And Namo Shetkari Yojana Hafta 2024”