PM Ujjawala Yojana : सध्या घरगुती गॅस च्या किमती खूप वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना एवढ्या महागडा गॅस घेणे परवडत नाही. घरगुती गॅस च्या किमती 900 रुपयाहून अधिक वाढल्या आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या नागरिकांना घरगुती याचा खर्च परवडत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने अशा नागरिकांसाठी पीएम उज्वला योजना सुरू केली आहे. जेणेकरून अशा नागरिकांना आर्थिक हातभार लागू शकेल. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील नागरिकांना 550 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर दिला जातो. पीएम उज्वला योजनेअंतर्गत केंद्र सरकार पात्र असणाऱ्या नागरिकांना 14.2 किलोच्या तीन सिलेंडर साठी सबसिडी दिली जाते. सरकारी एकूण 1600 रुपये थेट महिलांच्या बँक अकाउंट मध्ये जमा करण्यात येते. PM Ujjawala Yojana

उज्वला योजनेचा दुसरा व्हर्जनदेखील लॉन्च
आता नागरिकांना उज्वला योजनेअंतर्गत सबसिडी दिली जाणार आहे. यासाठी उज्वला योजनेचा दुसरा व्हर्जनदेखील लाँच करण्यात आले आहे .त्यामुळे उज्वला (PM Ujjawala Yojana) योजनेच्या लाभार्थ्यांना सबसिडी दिले जाणार आहे .पत्र असणाऱ्या लाभार्थ्यांना सबसिडी दिली जाणार आहे .केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात 2016 रोजी केली होती .या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील नागरिकांना ग्रामीण भागातील कुटुंबांना एलपीजी गॅस दिले जातात .ग्रामीण भागातील अनेक महिला आजही चुलीवर स्वयंपाक करतात. चुलीवर जेवण बनवल्यामुळे धूर होतो आणि त्याचे दूषित परिणाम हे घरात असणाऱ्या व्यक्तींवर म्हणजेच वृद्ध असणाऱ्या नागरिकांवर,लहान मुलांवर, स्वयंपाक करणाऱ्या महिलांवर होत असतात .या पासून सुटका व्हावी म्हणून केंद्र सरकारकडून गॅस सिलेंडर कमी किमतीत देण्यात येत आहे .PM Ujjawala Yojana
हे वाचा : लाडक्या बहिणींना कधी मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता.
PM Ujjawala Yojana पात्रता काय आहे?
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे .
- या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच घेता येणार आहे
- महिलाची वय 18 किंवा त्यापेक्षा अधिक असावे .
- या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती किंवा जमातीतील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात .
- ज्या महिलांनी पीएम आवास योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे .
पीएम उज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- रेशन कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र
- बँक खाते क्रमांक
- बीपीएल प्रमाणपत्र
या योजनेचा अर्ज कसा करायचा
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या वेबसाईटवर https://pmuy.gov.in/ujjwala2.html जावे लागेल .
- त्यानंतर तुम्हाला अप्लाय फॉर उज्वला कनेक्शन वर क्लिक करायचे आहे .
- त्यानंतर तुम्हाला गॅस एजन्सी चे नाव निवडायचे आहे .
- यानंतर Indane, Bharat Gas किंवा HP Gas यापैकी ऑप्शन निवडून घेत आहे. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे.
- रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
- मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन केल्यानंतर सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
- त्यानंतर अर्जाची एक प्रिंट काढून ती प्रिंट घेऊन एजन्सी मध्ये जायचे आहे. तेथे तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
- अशा पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.