सारथी मार्फत मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण ; पहा काय आहे पात्रता : Sarthi Drone Training 2024

Sarthi Drone Training 2024 राज्यामधील नक्षीत गटातील शेतकरी युवक आणि युवती यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे आयोजित महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थेमार्फत ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Sarthi Drone Training 2024

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे यांच्यामार्फत सारथी संचालक मंडळाच्या बैठकीतील मान्य ठरावानुसार राज्यातील मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा, समाजातील शेतकरी किंवा युवक आणि युवती यांना सारथी संस्थेच्या खर्चाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिमोट पार्लर प्रशिक्षण संस्थेमार्फत मोफत ड्रोन पालक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

महिलांसाठी ड्रोन दिदी योजना

Sarthi Drone Training 2024 मोफत ड्रोन प्रशिक्षण :

सारथी द्वारे ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी निधीची तरतूद केली असून असे प्रशिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत स्थापित झालेल्या रिमोट पायलट प्रशिक्षण केंद्रमार्फत आयोजित करण्यात आले आहे. या केंद्राने सारथी संस्थेशी समंजस करार करून लक्षात गटामधील युवक आणि युवतींना सदस्यासाठी अशी प्रशिक्षण देण्यासाठी सहमती दर्शवली आहे.

हे प्रशिक्षण सात दिवसाचे असून यामध्ये पाच दिवस ड्रोन पायलट आणि दोन दिवस फवारणी करण्याचे प्रशिक्षण आणि अनुभव याचा समावेश असणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये या केंद्रावर सात दिवसाच्या दहा प्रशिक्षणार्थीच्या चार बॅचेस घेण्यास संबंधित केंद्राने मान्यता दिली आहे.

या योजनेसाठी पात्रता काय आहे ?

  • लाभार्थ्याचे वय 18 ते 40 वर्षे असावे.
  • लाभार्थी कृषी पदावर अथवा कृषी पदविका धारक असावा मात्र असे लाभार्थी अर्ज न केल्यास इतर विषयांच्या पदवितरांचा विचार केला जाईल.
  • मागील तीन वर्षाचे उत्पन्न रुपये आठ लाख पेक्षा जास्त नसावे किंवा सक्षम प्राधिकार्‍यांचे आर्थिक दुर्बल प्रमाणपत्र असणे
  • प्रशिक्षणार्थी लाभार्थ्याकडे वैद्य पासपोर्ट असावा.
  • वैद्यकीय योग्यता प्रमाणपत्र असावे.
  • शेतकरी कुटुंबातील सदस्य प्राधान्य दिले जाईल. Sarthi Drone Training 2024.

Sarthi Drone Training 2024 या योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

  • प्रशिक्षणासाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे.
  • ड्रोन प्रशिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडे ऑनलाईन अर्ज करावा.

प्रशिक्षणाचे ठिकाण व निवड :

  • सारखीमार्फत प्राप्त वर्ग पैकी प्रतिस्पताह दहा याप्रमाणे प्रतिमेहिना 40 प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.
  • प्रथम टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातून दहा प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे।
  • महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी केंद्र. Sarthi Drone Training 2024.

Leave a comment