Shet Tale Anudan Yojana वैयक्तिक शेततळ्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार; कृषी आयुक्तालयाकडे निधी वितरित

Shet Tale Anudan Yojana : राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबवल्या येत आहे. या योजनेअंतर्गत सुरुवातीला राज्यांमध्ये काही ठराविक भागासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती परंतु आता संपूर्ण राज्यभरात सुरू करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच,वैयक्तिक शेततळे,शेततळ्याचे अस्तरीकरण,हरितगृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकांसाठी अनुदान देण्यात येत आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतील 2024-25 चा निधी कृषी आयुक्तालयाला वितरित करण्यात आला आहे .त्यामुळे आता अर्जातील मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना शेततळ्याचं (Shet Tale Anudan Yojana) अनुदान महाडीबीटी पोर्टल वरून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे .

Shet Tale Anudan Yojana

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी किती निधी वितरित करण्यात आला

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतील 2024- 25 वैयक्तिक शेततळ्याचं प्रलंबित अनुदान कृषी आयुक्तालयाला वितरित करण्यात आले आहे . वैयक्तिक शेततळ्यासाठी (Shet Tale Anudan Yojana) 6 कोटी 39 लाख 40 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे . याबाबत शासन निर्णय सरकारने प्रसिद्ध केला आहे . त्यामुळे शेतकऱ्यांना शेततळ्याचं प्रलंबित अनुदान महाडीबीटीवरून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे .

हे वाचा : विहीर बांधणीसाठी शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू ; पहा काय आहे पात्रता

कृषी आयुक्तालयाच्या मागणीनुसार वैयक्तिक शेततळ्यासाठी निधीला मान्यता

  • राज्य शासनाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2024 -25 साठी 400 कोटी रुपयांच्या निधीची तब्येत केली आहे .
  • या निधीमधून 300 कोटी रुपये सूक्ष्म सिंचनासाठी पूरक अनुदान देण्यात आले आहे .
  • तसेच वैयक्तिक शेतकऱ्यासाठी 100 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती .
  • त्यापैकी कृषी आयुक्तालयाच्या मागणीनुसार वैयक्तिक शेततळे साठी निधीला मान्यता देण्यात आली .

राज्य सरकारने 2024-25 मध्ये विविध कृषी योजनेचा निधी देण्यास विलंब केला आहे . त्यामुळे पात्र असूनही शेतकऱ्यांना निधीसाठी प्रतीक्षा करावी लागली .या कारणामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे .शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न सुटावा यासाठी दुष्काळग्रस्त भागामध्ये या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो .Shet Tale Anudan Yojana

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत कोणकोणत्या घटकांसाठी लाभ दिला जातो

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत सूक्ष्म सिंचना सह पूरक अनुदानाबरोबरच, वैयक्तिक शेततळे ,शेततळ्याचे अस्तरीकरण, हरितगृह उभारणे आणि शेडनेट हाऊस उभारणे या घटकांकरिता राज्य सरकार अनुदान देते. Shet Tale Anudan Yojana

वैयक्तिक शेततळ्यासाठी असा करा अर्ज

मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकांचा समावेश करण्यात आला आहे.ज्या शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्याचा लाभ घेत आहे त्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Shet Tale Anudan Yojana

अर्ज केल्यानंतर कशा पद्धतीने निवड होते

ज्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकांसाठी अर्ज केलेला आहे त्या शेतकऱ्यांची निवड ही लॉटरी पद्धतीने केली जाते.
ज्या शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड होते त्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल नंबर वर एक एसएमएस द्वारे संदेश प्राप्त होतो. त्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीचा 7/12 ,8 अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, हमीपत्र, जातीचा दाखला अशी कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. Shet Tale Anudan Yojana

Leave a comment

Close Visit Batmya360