Soyabean MSP Kharedi 2024 सोयाबीनची हमीभावाने खरेदी प्रक्रिया सुरू करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे राज्यांमध्ये 13 लाख 8 हजार टन सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याला केंद्राने परवानगी दिली हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी 1 ऑक्टोंबर पासून सुरू होणार असून प्रत्यक्ष खरेदी 15 ऑक्टोंबर पासून सुरू करण्यात येणार आहे.
यासंबंधीचे परिपत्रक सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने सध्या जाहीर केले आहे सोयाबीन सोबतच राज्य सरकारने मूग आणि उडदाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी मान्यता दिली आहे राज्यांमध्ये यावर्षी खरीप हंगामातील 13 लाख 8 हजार 238 टनांची खरेदी होणार आहे उडदाची पेटी 8120 टन खरेदी हमीभावाने होणारा आहे तर मुगाची 17688 टन खरेदी होईल असे परिपत्रकामध्ये सांगण्यात आले आहे.
हे वाचा : 2024 रब्बी बियाणे अनुदान , अर्ज करण्यास सुरुवात
Soyabean MSP Kharedi 2024 हमीभावाने सोयाबीन, मूग आणि उडीद विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया दिनांक 01 ऑक्टोंबर पासून सुरू होणार आहे तर मूग आणि उडीद यांची हमीभावाने खरेदी दिनांक 10 ऑक्टोंबर पासून सुरू होणार आहे सोयाबीनची खरेदी 15 ऑक्टोंबर पासून सुरू होईल असेही परिपत्रकात म्हटले आहे.
मूग आणि उडदाची खरेदी करत असताना कृषी विभागाच्या उत्पादनाच्या पहिल्या अंदाजानुसार जिल्ह्यानुसार प्रत्येकाने प्रत्येक शेतकऱ्याकडून आणि केंद्र ठरवून निश्चित केलेल्या उद्दिष्ट प्रमाणे खरेदी होणार आहे तर 13 लाख 8 हजार 238 टन पैकी पहिल्या टप्प्यात 10 लाख टनांची खरेदी करावी असेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
Soyabean MSP Kharedi 2024 शेतकऱ्यांना आधार :
सध्या बाजारामध्ये सोयाबीनचा भाव दबावात आहे काही ठिकाणी सोयाबीनची काढणी सुरू झाली आहे परंतु मालामध्ये सुद्धा ओलावा जास्त आहे तसेच पावसाने खराब झालेला मला बाजारात येत आहे अशा मालाला 4 हजारांपासून भाव मिळत आहे तर एफ ए क्यू दर्जाच्या मालाला 4300 ते 4600 रुपयांचा मिळत आहे आता सरकारने हमीभावाने खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे प्रत्यक्ष खरेदी सुरू होईल तेव्हापासून बाजारात नव्या मालाची आवक वाढत जाणार आहे त्यामुळे सरकारच्या हमीभाव खरेदीचा शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे सरकारच्या या खरेदीमुळे खुल्या बाजारातही भाव सुधारण्यास मदत होईल.
एकूण उत्पादनापैकी 25% खरेदी होणार :
Soyabean MSP Kharedi 2024 सरकारच्या अंदाजानुसार राज्यात मागील हंगामात 52 लाख 30 हजार टन सोयाबीन उत्पादन झाले होते. राज्यात यावर्षी देखील सोयाबीन उत्पादन गेल्या वर्षीच्या जवळपास राहू शकते असा, अंदाज वर्तवण्यात आला आहे तर केंद्र सरकारने राज्यांमध्ये 13 लाख 8 हजार टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे म्हणजेच राज्यात उत्पादित होणाऱ्या एकूण उत्पादनाच्या जवळपास पंचवीस टक्के खरेदी राज्य सरकार करणार आहे.
काय आहे नोंदणी प्रक्रिया ?
हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना ई समृद्धी पोर्टलवर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे ही समृद्धी पोर्टलवर नोंदणी करत असताना आधार नंबर, पिकांची नोंद असलेला सातबारा आणि बँक पासबुक ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
2 thoughts on “सोयाबीन मूग उडीद हमीभावाने होणार खरेदी ; एकूण उत्पादनापैकी 25 टक्के होणार खरेदी : Soyabean MSP Kharedi 2024”