Nafed Kanda Kharedi: नाफेडच्या कांदा खरेदीची प्रतीक्षा संपणार? आता तारीख लवकरच जाहीर होणार, वाचा संपूर्ण माहिती
Nafed Kanda Kharedi : गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घसरत असलेल्या कांद्याच्या बाजारभावामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. नाफेड (NAFED) द्वारे कांदा खरेदीला अखेर याच आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे, अशी महत्त्वाची माहिती नाशिक विभाग व्यवस्थापक आर. एम. पटनाईक यांनी दिली आहे. नाफेड आणि एनसीसीएफ (NCCF) यांच्यातील कांदा खरेदीसंबंधीची सर्व प्रक्रिया जवळजवळ …