Us Todani Anudan Yojana : प्रधानमंत्री राष्ट्रीय विकास योजनेअंतर्गत 2022-23 या वर्षासाठी सुरू करण्यात आलेल्या ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पाला आता 2025- 26 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे . या प्रकल्पासाठी 232.43 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे .यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणासाठी मोठा आधार मिळणार आहे .Us Todani Anudan Yojana

प्रकल्पाला मुदत वाढ आणि प्रशासकीय मान्यता
साखर आयुक्त,पुणे यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष 2025 -26 मध्ये ऊस तोडणी यंत्रणांना अनुदान देण्यासाठी 232.43 कोटी रुपयांच्या खर्चास मुदतवाढ आणि प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे .मंजुरी मिळाल्याने आता पुढील वर्षातील शेतकरी या योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रणासाठी अर्ज करू शकतात आणि अनुदानाचा लाभ घेऊ शकतात .
केंद्र शासनाच्या 21एप्रिल 2025 च्या पत्रातील निर्देशानुसार First Come, First Serve म्हणजेच, पहिला अर्ज पहिला लाभ या पद्धतीने लाभार्थ्याची निवड केली जाणार आहे. यापूर्वी कृषी विभागाने Maha-dbt पोर्टल साठी हे धोरण स्वीकारले आहे. आता ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पासाठी देखील याच धोरणाचा अवलंबन केलं जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा फायदा घ्यावा .
प्रकल्पाचा मूळ कालावधी आणि मुदतवाढ
ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पाचा मूळ कालावधी सन 2022 -23 आणि 2023-24 असा दोन वर्षाचा होता .परंतु आता या प्रकल्पाला सन 2024- 25 साठी एका वर्षाची मुदत देण्यात आली आणि आता पुन्हा सन 2025-26 या वर्षासाठी देखील मदत वाढ मिळाली आहे.आहेत म्हणजेच, दोन वर्षाचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता एकूण चार वर्षाचा कालावधी मंदिर करण्यात आलेला आहे .यामुळे शेतकऱ्यांना यंत्र खरेदीसाठी भरपूर वेळ मिळाला आहे .Us Todani Anudan Yojana
यापुढे मुदतवाढ मिळणार नाही
साखर आयुक्तांनी या संदर्भात स्पष्ट सूचना देण्यात आले आहे की,यानंतर सदर प्रकल्पाला कोणतीही मुदत वाढ दिली जाणार नाही त्यामुळे,ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे,त्यांनी याच वर्षात(2025-26) मध्ये अर्ज करून आपली प्रक्रिया पूर्ण करावी .यावर्षी कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण करण्याची दक्षता साखर आयुक्त, पुणे यांनी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत .Us Todani Anudan Yojana