vanaspati-anudan: औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान…!

vanaspati-anudan : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे औषधी व सुगंधी वनस्पतीच्या लागवडीसाठी पुन्हा अनुदान योजना सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून अनुदान मागणी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.

औषधी व सुगंधी वनस्पती लागवड हा घटक एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात बंद करण्यात आलेल्या होता परंतु आता यावर्षी नव्याने समाविष्ट करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना लागवडीसाठी किती अनुदान दिले जाणार आहे याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुकता लागुन होती. तर आजच्या या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.vanaspati-anudan

vanaspati-anudan

ही योजना 2020 पासून बंद

ही योजना 2015 ते 2020 या दरम्यान राज्यामध्ये यशस्वीपणे राबवण्यात आली होती , आणि त्या काळामध्ये 818 हेक्टर क्षेत्रावर औषधी वनस्पती लागवड करण्यात आली असून त्यावेळेस 4 कोटीहून अधिक रक्कम वाटण्यात आली होती. मात्र, त्यानंतर ही योजना 2021 पासून बंद करण्यात आली होती. आता पुन्हा ही योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सुरू करण्यात आली आहे, यासाठी शेतकऱ्यांना लागवड खर्चाच्या 40% पर्यंत अनुदान मिळणार. त्यामुळे लागवडीला वेग येण्याची शक्यता आहे.vanaspati-anudan

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ration Card e-KYC Ration Card e-KYC :घरी बसल्या रेशन कार्ड E-KYC कशी करायची ? पहा सविस्तर

हे वाचा : राष्ट्रीय फलोत्पादन अभियान

कोणत्या औषधी वनस्पती लागवड आणि किती मिळणारा अनुदान?

या योजनेमध्ये ज्येष्ठमध, शतावरी, कालीहरी, सफेद मुसळी, अश्वगंधा, ब्राम्ही, तुलसी, जटामासी, गुग्गूळ, मंजिष्ठा, कुटकी, अतिस, पिंपळी, विदारीकंद, चिराटा, पुष्करमूळ या औषधी वनस्पतीची लागवड करता येते .औषधी वनस्पतीची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते .औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी प्रति हेक्टर दीड लाख रुपयाचा खर्च गृहीत धरून या खर्चाच्या 40 टक्के अनुदान सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहे . तसेच, अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना कोणतेही औषधी वनस्पती लागवडीसाठी हेच अनुदान 50 टक्क्यापर्यंत दिले जाणार आहे .या अनुदानाचा लाभ दोन हेक्टर पर्यंत मिळू शकतो .vanaspati-anudan

कोण-कोणत्या सुगंधी वनस्पती लागवड आणि किती मिळणार अनुदान?

वनस्पतीच्या लागवडीसाठी पण अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये गुलाब, रोझमेरी, निशिगंध, जिरेनियम, कॅमोमाईल, चंदन, दवणा, जाई, लॅव्हेंडर यांसारख्या वनस्पतींचा समावेश आहे. सुगंधी वनस्पती लागवडीचा खर्च सव्वा लाख रुपये गृहीत धरून, या योजनेअंतर्गत सुगंधी वनस्पती लागवड करण्यासाठी सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान दिले जाणार आहे .तसेच, अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना हेच अनुदान 50 मिळणार आहे .

हे पण वाचा:
PM Kisan Installment Date PM Kisan Installment Date: पीएम किसानचा 20 वा हप्ता या दिवशी होणार जमा; तारीख जाहीर

तसेच, पामरोसा, गवती चहा, तुळस, व्हेटिव्हर, जावा, सिट्रोनेला, गोड तुळशीपत्र या वनस्पतींसाठी या साठी देखील अनुदान दिले जाणार आहे .प्रतिहेक्टरी 50 हजार रुपयांचा खर्च गृहीत धरून 40 टक्के अनुदान वाटले जाणार आहे .vanaspati-anudan

शेतकऱ्यांनी येथे करावा अर्ज

जर शेतकऱ्यांना यातील कोणत्या पण वनस्पतीच्या लागवडीसाठी अनुदान पाहिजे असल्यास mahadbtmahait.gov.in (महाडीबीटी संकेतस्थळावर) अर्ज करावा लागेल, असे महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाने म्हटले आहे.vanaspati-anudan

हे पण वाचा:
PM Kisan Mandhan Yojana PM Kisan Mandhan Yojana :या योजने मधून शेतकऱ्यांना मिळणार दर महिन्याला 3000 रुपये ,असा घ्या लाभ..!

Leave a comment