Voter Registration App 2024 भारतातील कोणत्याही नागरिकांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली तर त्याला मतदानाचा हक्क प्राप्त होतो याबद्दल अनेक तरुण-तरुणी नागरिकांना माहिती नसते भारत लोकशाही देश आहे त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार मतदारांनी केलेल्या मतदानाने निवडले जातात त्यामुळे प्रत्येकाच्या मताला अनमोल किंमत आहे आता मतदार नोंदणी नागरिकांना घरबसल्या करता येऊ शकते अशी माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिली.
लोकशाहीमध्ये मतदानाला अधिक महत्त्व असते 100% मतदारांनी मतदान केले तरच सुदृढ लोकशाही मतदानाच्या माध्यमातून अस्तित्वात येते परंतु मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये 55 ते 60 टक्के मतदान झाल्याचे आढळले आहे सुदृढ लोकशाहीसाठी 100% मतदान होणे आवश्यक आहे. मतदान यादी मध्ये नाव नोंदणी करणे हे खूप गरजेचे आहे. यामुळे अठरा वर्षे पूर्ण असलेल्या सर्व तरुण-तरुणींना मतदानाचा लाभ घेता येऊ शकतो.
Voter Registration App 2024 अनेक नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जागरूकता नसते त्यामुळे जिल्हा प्रशासन वेळोवेळी मतदार जनजागृती करीत असते काहींना मतदानाची इच्छा असते मात्र मतदार यादी मध्ये नाव नसल्यामुळे मतदान करता येऊ शकत नाही ऐनवेळी मतदार यादी मध्ये नाव टाकता येत नाही त्यामुळे 18 वर्षे वय होताच प्रत्येकाने मतदान नोंदणी केली तरच त्याचे नाव कायमस्वरूपी मतदार यादी मध्ये असते मतदान नोंदणी साठी संबंधित प्रभागाच्या बुथवर संबंधित कागदपत्रे घेऊन जावे लागते मात्र आता घरबसल्या सर्वांनाच मतदान नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हे वाचा : निवडणुकीच्या तोंडावर सरकार चे धडाकेबाज निर्णय.
Voter Registration App 2024 ॲपच्या माध्यमातून दुरुस्ती देखील करता येते :
Voter Registration App 2024 नवीन मतदारांना घरबसल्या मतदान यादी मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी आणि इतर निवडणूक विषयक सुविधा मिळवण्यासाठी वोटर हेल्पलाइन ॲप उपयुक्त आहे निवडणूक आयोगाने तयार केलेले ॲप डाऊनलोड करून घ्यावे कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये न जाता ॲपच्या मदतीने नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादी मध्ये नाव समाविष्ट करता येऊ शकते.
अथवा अस्तित्वात असलेल्या मतदार यादी मधील नावात दुरुस्ती आणि छायाचित्रात बदल देखील करता येऊ शकतो मृत मतदाराचे नव नातेवाईक वगळू शकतात तसेच घरपोच मोफत मतदान ओळखपत्र ही मिळवता येऊ शकते गुगल प्ले स्टोअर वरील https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen या लिंकच्या माध्यमातून हे ॲप डाऊनलोड करून या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो.