पी एम किसान मानधन योजना, शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरमहा 3000 रुपये पेन्शन देणार. पाहूया पात्रता आणि अटी

पीएम किसान मानधन योजना

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी किंवा त्यांच्या हितासाठी केंद्र सरकार राज्यांमध्ये वेगवेगळ्या योजना राबवत आहे. पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना 3 हजार रुपये पेन्शन देणार आहे. जेणेकरून वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या पेन्शनचा लाभ होईल.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

  शेतकऱ्यांसाठी पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरमहा 3000 रुपये पेन्शन देणार आहे. या पेन्शनचा लाभ कसा घेता येईल, पात्रता काय आहे,अटी जाणून घेऊया.

पी एम किसान मानधन योजना पात्रता

केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये पाठवत आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 17 हप्त्याची रक्कम म्हणजे 34 हजार रुपये पाठवण्यात आलेले आहेत. परंतु पीएम किसान सन्मान योजने प्रमाणेच शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही देखील महत्त्वाची आहे.

शेतकऱ्यांना पीएम किसान मानधन योजनेअंतर्गतच वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन दिले जाणार आहे.  त्यासाठी ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. तर जाणून घेऊया आपण याचा लाभ कसा घेतला जाईल.

PM किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा फायदा

   पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना उतरत्या वयामध्ये पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत पेन्शन दिले जाणार आहे त्याचा फायदा होईल.

60 वर्षाच्या पुढे हे शेतकरी या पेन्शनच्या आधारे आपल्या जीवन लागणारा रोजचा खर्च भागवू शकतील.

पीएम किसान मानधन योजना काय आहे?

   पीएम किसान मानधन योजनेद्वारे वयाच्या साठ वर्षानंतर शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये पेन्शनच्या स्वरूपात दिले जाते. या योजनेमध्ये लाभ ज्या शेतकऱ्यांची इच्छुक आहे त्यांना घेता येईल त्यासाठी शेतकऱ्यांना 55 ते 200 रुपये जमा करावी लागतील.  वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये दिले जातील.

पीएम किसान मानधन योजनेचा लाभ कसा घ्यायचा

   पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना नागरी सुविधा केंद्रातून किंवा राज्य नोडल ऑफिसर यांच्याकडून या पीएम किसान मानधन योजनेसाठी नोंदणी करता येते . त्यासाठी शेतकऱ्यांची वय 18 ते 40 दरम्यान असावे, त्या शेतकऱ्यांना वयाचे 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत 55 ते 200 रुपयांचा प्रिमियम भरावा लागेल.

ज्या शेतकऱ्यांनी 55 ते 200 रुपये प्रीमियम भरला आहे. त्या शेतकऱ्यांना वयाचे 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन दिले जाणार आहे.

पीएम किसान मानधन योजनेचा लाभ शासकीय आकडेवारीनुसार आतापर्यंत 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे.

पीएम किसान मानधन योजना अटी

या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी खालील दिलेल्या अटीचे पालन करावे.

  •  या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या शेतकऱ्यांचे वय 18 ते 40 दरम्यान असावे.
  •  या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन असणे आवश्यक आहे.

1 thought on “पी एम किसान मानधन योजना, शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरमहा 3000 रुपये पेन्शन देणार. पाहूया पात्रता आणि अटी”

Leave a comment

Close Visit Batmya360