कृषि योजना मेळावे : कृषी विभागातील विविध योजनांच्या प्रचारासाठी कृषी विभागातील विविध अधिकाऱ्यांच्या हस्ते दिनांक 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त राज्यभरात मेळावे आयोजित करण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
कृषी विभागांतर्गत विविध महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते तालुक्यात मिळावे आयोजित करण्यात येणार आहेत. अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.
कृषि योजना मेळावे या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होते?
झालेल्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे हे बोलत होते, त्यावेळेसच या बैठकी मध्ये कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज उपस्थित होत्या त्याबरोबरच उपसचिव संतोष कराड, उपसचिव प्रतिभा पाटील, दूरदश्य प्रणाली द्वारे कृषी संचालक विजयकुमार आवटे व विविध महामंडळाचे अधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित होते.
कोण कोणत्या योजनांचा प्रचारार्थ
कृषिमंत्री धनंजय मुंडे झालेल्या बैठकीमध्ये म्हणाले की, राज्य शासन राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून दरवर्षी कमीत कमी 50 हजार रुपये देत आहे. तसेच राज्य शासनामार्फत कृषी यांत्रिकीकरणासाठी आणि उत्पादन वाढीसाठी राज्यांमध्ये वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. तसेच कृषी व पशुसंवर्धन विभाग अंतर्गत कार्य करत असणारे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, पुण्यश्रोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग विकास महामंडळ, आत्मा प्रकल्प, कृषी उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत मेळावे आयोजित करून प्रत्येक योजनांची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
कृषि योजना मेळावे 2 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त राज्यातील प्रत्येक तालुक्यात मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांच्या भल्यासाठी व त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत किती लाभ दिला जाणार आहे, पात्रता, लागणारी कागदपत्रे, अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्दलची सर्व माहिती 2 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त राज्यातील प्रत्येक तालुकास्तरावर होणारा मेळाव्यामध्ये दिली जाणार आहे.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.