डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना – शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण योजना.

कृषी स्वावलंबन योजना सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजना शेतकऱ्यांचे शेती उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करतात. यासाठी योजनांचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना अटी व नियमांचे पालन करणे आवश्यक असते. त्यासोबतच अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याचीही माहिती बराच वेळ शेतकऱ्यांना नसते. त्यामुळे आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत मिळणाऱ्या लाभ व अर्ज प्रक्रिया याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

हे वाचा: शेतकऱ्यांना मिळणार मोफत सौर पंप.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या घटकाला दिले जाते अनुदन.

राज्यातील अनुसूचित जाती जमाती आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. इतर सर्वसामान्य शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही योजना अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Kanda Anudan  Kanda Anudan :कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा! 28 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर, तुम्हाला मिळणार का? लगेच पहा

अनुदान मर्यादा वाढ :या योजनेचे अंतर्गत नवीन विहीर अनुदान मर्यादा वाढवण्यात आली आहे. याआधी 2 लाख 50 हजार रुपये नवीन विहिरीसाठी अनुदान देण्यात येत होते. परंतु आता नवीन नियमानुसार ही रक्कम 4 लाख रुपये करण्यात आलेली आहे. यामुळे योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.

इतर लाभ : विहिरी सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत विहीर दुरुस्ती, शेततळे प्लास्टिक अस्तिकरण, बोरवेल अनुदान, वीज जोडणी पंपसंच, ठिबकसंच, तुषार सिंचन, पाईपलाईन यासारख्या विविध घटकांसाठी अनुदान वितरित केले जाते.

कोणत्या घटकासाठी किती अनुदान दिले जाते.

घटकमिळणारे अनुदान
विहीर खोदकाम४,००,०००
विहीर दुरुस्ती१,००,०००
शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण२,००,०००
इनवेल बोअरिंग४०,०००
वीज जोडणी२०,०००
पंप संच४०,०००
ठिबक सिंचन९७,०००
तुषार सिंचन४७,०००
पीव्हीसी पाइप५०,०००
यंत्रसामग्री५०,०००

लाभ घेण्यासाठी अटी शिथिल

योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी काही कठोर नियमावली लावण्यात आलेली होती जसे की दोन विहिरीमधील अंतर 500 फूट असावे. त्यासोबतच शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न मर्यादा दीड लाख रुपये च्या आत असावे. या अटीमधून आता शेतकऱ्यांना सूट देण्यात आलेले आहे, ज्यामुळे अधिक शेतकरी या योजनेमध्ये पात्र ठरतील व त्यांना योजनेचा लाभ मिळेल.

हे पण वाचा:
Protsahan Anudan शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 50 हजार प्रोत्साहन योजना सुरू, पण ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ.Protsahan Anudan

योजनेची पात्रता

  • शेतकरी अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध समाजातील असणे आवश्यक आहे.
  • लाभ घेणारा शेतकऱ्याचे नावे शेत जमीन असणे आवश्यक आहे.
  • शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याने ज्या घटकासाठी अर्ज करत आहे त्या घटकाचा याआधी लाभ घेतलेला नसावा.

अर्ज कसा करावा.

अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल वर जाऊन, डॉक्टर बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना या घटकांतर्गत नवीन अर्ज सादर करावा लागेल. अर्ज सादर करताना शेतकऱ्याची सातबारा, आठ अ ,आधार कार्ड ,बँक पासबुक ,जात प्रमाणपत्र एवढी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

योजनेची मिळणारे फायदे

डॉक्टर बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी जलस्रोत व सूक्ष्म सिंचन यासारख्या घटकांना प्रोस्थाहन देऊन अनुदान दिले जाते . ज्याच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमाती मधील शेतकऱ्यांची शेती उत्पन्न वाढेल व शेतकरी आत्मनिर्भर बनतील.

हे पण वाचा:
Crop Insurance Nuksan Bharpai List शेतकऱ्यांना दिलासा! 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, पहा जिल्ह्यांची यादी.Crop Insurance Nuksan Bharpai List

Leave a comment