पक्ष जाहीरनामा जाहीर! पहा कोणत्या पक्षाचे काय आहेत आश्वासणे , निवडणूक जाहीरनामा


निवडणूक जाहीरनामा महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात आजपासून सुरू झाला असून महाविकास आघाडी व महायुतीचे नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, शिवसेना युबीटी पक्ष उद्धव ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष यांचा जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

राज्यात सत्ता मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. त्यात निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना किंग मेकर ठरू नये या करिता, विरोधी पक्ष देखिल महिलांना प्रती महिना वाढ देण्याचे आश्वासन देत आहेत. तर सत्ताधारी देखील या योजनेतून निधी वाढ देऊ असे आश्वासन देत आहेत. याच निवडणुकाच्या अनुषंगाने कोणत्या पक्षाने काय जाहीरनामा काढला हे पाहुयात.

काँग्रेस पक्षाचा निवडणूक जाहीरनामा

  • महालक्ष्मी योजने अंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास देणार.
  • शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे सरसगट कर्जमाफ तसेच नियमित कर्ज फेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन.
  • जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करणार.
  • 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत औषधउपचार करणार.
  • बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा निवडणूक जाहीरनामा

  • लाडकी बहिण योजने संदर्भात बहिणींना दीड हजार नाही तर तब्बल 2100 रुपये देण्यात येणार आहे.
  • सोबत महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिलांना पोलिस दलात समावेश करण्याचा वादा करण्यात आला आहे.
  • धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.
  • ग्रामीण भागात 45000 पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा वादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेला आहे.
  • शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेती पिकांच्या एम.एस.पी वरती 20% अनुदान देण्याचा वादा अजित दादांच्या पक्षाकडून करण्यात आलेला आहे.
  • वीज बिलात 30% कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याचा वादा करण्यात आला आहे.
  • वृद्ध पेन्शन धारकांना आता 1500 वरुण महिन्याला 2100 रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.
  • दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून दर महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतनाचा वादा करण्यात आलेला आहे.
  • 25 लाख नवीन रोजगार निर्मितीचा वादा देखील केला आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा निवडणूक जाहीरनामा

  • लाडक्या बहिणींना रु.2100 प्रत्येक महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन!
  • शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.15,000 प्रत्येक वर्षाला रु.12,000 वरुन रु.15,000 देण्याचे तसेच MSP वर 20% अनुदान देण्याचे वचन!
  • प्रत्येकास अन्न आणि निवारा प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन!
  • वृद्ध पेन्शन धारकांना रु.2100 महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 देण्याचे वचन!
  • जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन!
  • 25 लाख रोजगार निमिर्ती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 प्रशिक्षणातून महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 विद्यावेतन देण्याचे वचन!
  • 45,000 गावांत पाणंद रस्ते बांधणार राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधण्याचे वचन!
  • अंगणवाडी आणि आशा सेविकांना रु.15000 आणि सुरक्षा कवच महिन्याला रु.15,000 वेतन आणि संरक्षण देण्याचे वचन.
  • वीज बिलात 30% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा निवडणूक जाहीरनामा

  • राज्यातील मुलींना उच्च शिक्षण मोफत दिले जात आहे. पण, मुलांना नाही. त्यामुळे आमचे सरकार आल्यावर मुलींप्रमाणेच मुलांनाही उच्च शिक्षण मोफत दिले जाईल.
  • पोलीस ठाण्यात गेल्यावर महिलांना तक्रार करण्याबद्दल कळत नाही. त्यामुळे सरकार आल्यावर तातडीने महिला पोलिसांची भरती केली जाईल. राज्यात पोलीस ते वरिष्ठ पदांपर्यंत महिला अधिकारी असणारे विशेष पोलीस ठाणे सुरू केले जाईल.
  • अदाणींचा धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द केला जाईल. त्याठिकाणी धारावीकरांना उद्योगधंद्यांसह घरे दिले जातील, अशी घोषणा ठाकरेंनी केली. धारावी, मुंबईत भूमिपुत्रांना माफक दरात घरे उपलब्ध करून दिले जातील,
  • महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना हमीभाव दिला जाईल.
  • पाच वर्षाच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार. दरात कोणताही बदल केला जाणार नाही. डाळ, तांदूळ, साखर, तेल या वस्तुंचे भाव स्थिर ठेवणार.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Aadhar Online
Aadhar Online आधार कार्ड वरील मोबाईल नंबर ऑनलाईन कसा बदलायचा? पहा सविस्तर..

1 thought on “शेतकऱ्यांना धक्का! या योजनेच्या निधी वाढीला सरकारचा ब्रेक. farmer scheme update”

Leave a comment

Close VISIT MN CORNERS