मोफत शिलाई मशीन योजना
free shilai machine
Table of Contents
Toggleदेशातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असते. या मध्ये महिलांच्या हिताच्या योजना राबवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
केंद्र सरकार कडून राबवण्यात येणाऱ्या पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात येणार आहे.
शिलाई मशीन वाटप करण्यासाठी महिलांना 15000 रुपये निधी त्याच्या बँक खट्यामद्ध जमा करण्यात येणार आहे.
या योजनेच्या अंतर्गत महिलांना प्रशिक्षण देखील दिले जात आहे.
मोफत शिलाई मशीन योजना पात्रता
- मोफत शिलाई मशीन साठी अर्जदार भारतीय असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये च्या आत असणे आवश्यक आहे.
- ही योजना देशातील सर्व प्रवर्गांसाठी आहे.
- यात सहभागी होण्यासाठी अर्जदार व्यक्तीचे रेशन कार्ड ला नाव असने अवश्यक आहे.
- अर्जदाराचे बँक खाते आधार संलग्न असणे बंधनकारक आहे.
मोफत शिलाई मशीन योजना आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबूक
- पॅन कार्ड
- पासपोर्ट फोटो
- रेशन कार्ड
- मोबाइल क्रमांक (आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक)
- घरातील सर्व सभासदाचे आधार कार्ड.
- अर्जदार हमीपत्र
मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया
या योजनेमद्धे अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन आहे. आपण या मध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
अर्ज करण्यासाठी आपणास https://pmvishwakarma.gov.in/ या संकेतस्थळावर जाव लागेल.
त्या ठिकाणी लॉगिन पर्यायावर क्लिक करा.
आपला आधार लिंक मोबाइल क्रमांक टाका
आपल्या आधार लिंक मोबाइल वर आलेला ओटिपी भरा.
आपल्या समोर फॉर्म उघडेल तो फॉर्म व्यवस्थित भरा.
शेवटी आपला अर्ज सबमीट करा.
अर्ज सबमीट झाल्यानंतर अर्जाची प्रत काढून घ्या.
अर्ज सादर झाल्यावर असा दिला जातो लाभ.
आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर आपल्या भागातील ग्रामपंचायत / नगरपरिषद यांच्या लॉगिन वरुण आपल्या अर्जाला मंजूरी घ्यावी लागते.
नगर परिषद किंवा ग्रामपंचायत ने अर्ज मंजूर केल्यानंतर आपला अर्ज जिल्हा उद्योग केंद्रात सादर होतो.
जिल्हा उद्योग केंद्र त्या अर्जाची तपासणी पूर्ण करून घेतली जाते.
तपासणी पूर्ण झाल्यानंतर आपल्या प्रशिक्षण आयोजनाची तारीख व वेळ व ठिकाण कळवले जाते. (कॉल किंवा एसएमएस द्वारे)
त्या नंतर आपण आपले प्रशिक्षण पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.
आपले प्रशिक्षण पूर्ण केल्या नंतर आपल्याला 15000 हजार रुपये रक्कम वितरित केली जाते. त्या रकमेच्या सहाय्याने आपल्याला शिलाई मशीन व हवे असणारे साहित्य खरेदी करू शकता. free shilai machine
निष्कर्ष
पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत मिळणारी फ्री शिलाई मशीन विषयी आपण सर्व माहिती घेतली आहे. या मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे या बद्दल माहिती देण्यात आली आहे. आपणास जर या योनेबद्दल काही अडचण असेल तर आपण आम्हाला संपर्क करू शकता आम्ही आपणास नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू.
आपल्या जवळील मित्र नतेवाईक यांच्या पर्यंत ही माहिती नक्की शेयर करा जेणे करून त्यांना देखील या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
Yojna baddal mahiti