सारथी व महाज्योती : च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 23 सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सारथी आणि महाज्योती च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चा लाभ दिला जाणार आहे . असा निर्णय घेण्यात आलेला आहे.सारथी आणि महाज्योती च्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांक पासून 100% शिष्यवृत्ती चा लाभ देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आलेली आहे. तर आपण आज या लेखांमध्ये या शिष्यवृत्तीचा लाभ कधी दिला जाईल, कुणाला दिला जाईल. याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
सारथी च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ
सारथी व महाज्योती. छत्रपती राजाराम महाराज आरती शिष्यवृत्ती सन 2020-24 या शैक्षणिक वर्गातील इयत्ता 9वी,10 दहावी आणि 11 वी च्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविली जाते. या विद्यार्थ्यांना लाभ घेण्यासाठी किंवा सहभागी होण्यासाठी. आता या सार्थीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सारथी संस्थेच्या एक एप्रिल 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत कायम नोंदणी असलेल्या 724 विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती चा लाभ दिला जाणार आहे. बार्टी प्रमाणेच सारथी च्या विद्यार्थ्यांनाही आता नोंदणी दिनांक पासून शंभर टक्के शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे . शिष्यवृत्ती लाभ मिळण्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला होता. आणि या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. बार्टी प्रमाणे व महा ज्योतीच्या विद्यार्थ्यांनाही नोंदणी दिनांक पासून शंभर टक्के शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे.
महाज्योती च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चा लाभ
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन संस्था(महा ज्योती)ची स्थापना 22 ऑगस्ट 2019 पासून करण्यात आलेली या योजनेअंतर्गत महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांक पासून शंभर टक्के अधिछात्रवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे. महा ज्योती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना विनामूल्य स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रशिक्षण संस्था ही एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीला शिष्यवृत्तीसाठी 35 कोटीचा वार्षिक खर्च आहे. या योजनेअंतर्गत महाज्योतीच्या पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांक पासून शंभर टक्के अधिछत्रवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे. महाज्योती शिष्यवृत्ती चा लाभ जास्तीत जास्त विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील युवक – युवती व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम महाज्योती अंतर्गत राबविण्यात येतात. महाज्योती अंतर्गत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, JEE/NEET/MHT- CET,MPSC,UPSC आदी स्पर्धात्मक परीक्षाचे प्रशिक्षण देण्यात येते. तसेच या उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतात. तसेच महा ज्योतीच्या पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांक पासून शंभर टक्के अधिछत्रवृत्तीचा लाभ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. यामुळे महाज्योतीच्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
सारथी व महाज्योती च्या विद्यार्थ्यांसाठी अधिछत्रवृत्तीचा लाभ
सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चा लाभ दिला जाणार आहे. लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ,अजित पवार यांच्या नियोजन विभागाने बार्टी प्रमाणेच सारथी व महाज्योती च्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांक पासून शंभर टक्के अधिछत्रवृत्ती मिळण्याबाबत प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला होता . आणि या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. बार्टी प्रमाणेच सारथी व महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना पण नोंदणी दिनांक पासून शंभर टक्के अधिछत्रवृत्ती मिळणार आहे त्यासाठी सारथी संस्थेच्या एक एप्रिल 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत कायम नोंदणी असलेल्या 724 विद्यार्थ्यांना आणि महाज्योती च्या पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांक पासून शंभर टक्के शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे. यामुळे संबंधित विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे त्याबद्दल आभार मानले आहेत.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.