कापूस सोयाबीन अनुदान अशी करा अनुदान kyc

अनुदान kyc शासनाने भावांतर योजने अंतर्गत शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन या पिकासाठी प्रति हेक्टर 5 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. हे अनुदान शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करणे आवश्यक आहे. ही kyc करण्यासाठी याआधी कृषी सहाय्यक यांच्याकडे कागदपत्रे जमा करण्यास सूचना दिल्या होत्या, परंतु कृषी सहायक यांच्यामार्फत केवायसी करण्यासाठी विलंब होत असल्यामुळे केवायसी करण्याची सुविधा आता स्वतः शेतकऱ्यांना किंवा आपण आपल्या जवळील सीएससी केंद्र किंवा महाऑनलाईन केंद्र या ठिकाणी जाऊन सुद्धा आपली केवायसी करू शकतात ही केवायसी नेमकी कशी करायची, स्वतः मोबाईल मधून कशी करू शकतो याबद्दलची माहिती आपण पाहूया.

हे वाचा : कापूस सोयाबीन अनुदान ई -पीक पाहणी अट रद्द

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

एवढ्या शेतकऱ्याची अनुदान kyc बाकी.

राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून आतापर्यंत 68 लाख शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण केली आहे, मात्र यामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांना आपली केवायसी करणे आवश्यक आहे. केवायसी करण्यासाठी 19 ते 20 लाख शेतकरी अजूनही बाकी आहेत . या शेतकऱ्यांनी तात्काळ केवायसी करावी असे आव्हान देखील कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे. ज्यामुळे अनुदान मिळण्यासाठी अडचणी निर्माण होणार नाही.

अशी करा अनुदान kyc

अनुदान kyc

अनुदान केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना https://scagridbt.mahait.org/ या संकेतस्थळावर जावे लागेल या संकेतस्थळावर गेल्यानंतर शेतकऱ्यांना लॉगिन login आणि डिस्ट्रूबमेंट स्टेटस disbursement status हे पर्याय दिसतील. यापैकी स्वतः केवायसी करण्यासाठी डिस्ट्रूमेंट स्टेटस disbursement status या पर्यायावर क्लिक करावे लागेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर एंटर करावा लागेल. आधार नंबर एंटर केल्यानंतर आपल्या समोर दिसणारा कॅप्चर कोड भरावा लागेल. कॅप्चर कोड भरल्यानंतर ओटीपी किंवा बायोमेट्रिक यापैकी एक निवडावे लागेल. ओटीपी च्या माध्यमातून आपल्या आधार लिंक मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवण्यात येईल ओटीपी भरून अनुदान kyc आपण पूर्ण करू शकतात.

1 thought on “कापूस सोयाबीन अनुदान अशी करा अनुदान kyc”

Leave a comment