नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 5 वा हप्ता वितरित करण्यासाठी निधी मंजूर.

नमो शेतकरी महासन्मान निधी च्या पाचव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्वपूर्ण माहिती. 5 ऑक्टोबर 2024 रोजी पीएम किसान सम्मान निधि योजना पुढील हप्ता म्हणजे 18 व्या हप्त्याचे वितरण होणार आहे. आणि याच हप्त्याच्या सोबत शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजचा पाचवा हप्ता देखील वितरित केला जाऊ शकतो.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच पुढील हप्ता जमा करण्याच्या संदर्भातील हालचाली सरकार कडून सुरू करण्यात आलेले आहेत. दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एका शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला ज्या मध्ये नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

हे वाचा : कापूस सोयाबीन अनुदान अशी करा अनुदान kyc

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

किती निधी केला मंजूर

शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पुढील हप्त्याचे वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 2254 कोटी 96 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजूरी देण्यात आलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना ही अत्यंत आनंदाची बातमी सरकार कडून देण्यात आली आहे.

कधी मिळणार नमो शेतकरी योजनेचा लाभ.

नमो शेतकरी महासन्मान निधी वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना हा लाभ दिला जाऊ शकते. राज्यात घेण्यात येणाऱ्या कुठल्याही एका कार्यक्रमामध्ये या निधी चे वितरण केले जाऊ शकते. हा हप्ता कधी वितरित करणार या बाबत अजून तरी स्पष्टता कृषि विभाग किंवा कृषि मंत्री यांच्या कडून देण्यात आलेले नाही.

निधी वितरित करण्या बाबत संभाव्य तारीख.

पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता वितरित करण्यासाठी 5 ऑक्टोम्बर 2024 ही तारीख ठरवण्यात आली आहे. 18 वा हप्ता यासाठी आता मोठा कार्यक्रम आहे तो म्हणजे वाशिम जिल्ह्यातील पी एम किसान सन्मान निधी योजना चा लाभ वितरण. राज्य सरकार कडून निधी मंजूर करण्याच्या हालचाली नुसार राज्य सरकार देखील हा निधी याच कार्यक्रमांतर्गत वितरित करण्याचा प्रयत्न करणार आहे. या मुळे राज्यातील शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबर रोजी 4000 रुपये निधी वितरित केला जाऊ शकतो. त्या मध्ये 2000 पीएम किसान योजनेचे असतील व 2000 नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे असतील. (नमो शेतकरी महासन्मान निधी योजेबद्दल तारीख अधिकृत घोषित करण्यात आली नाही. परत्नू निधी वाटप करण्यासाठी लागणारा निधी राज्यं सरकार कडून मंजूर करण्यात आला आहे. )

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

शासन निर्णय पाहन्यायासाठी येथे क्लिक करा.

हे पण वाचा:
Krishi samruddhi scheme शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना ! ८०% अनुदान, २५ हजार कोटींची तरतूद Krishi samruddhi scheme

Leave a comment