नुकसान भरपाई महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जून ते ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय अतिवृष्टीमुळे झालेल्या 12 जिल्ह्यातील नुकसान भरपाई नुकसान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्य सरकारने नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. नुकसान भरपाई चा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 25 हजार रुपये प्रति हेक्टर जमा करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने नुकसान भरपाई साठी निधी
राज्य सरकारने जून ते ऑगस्ट 2024 दरम्यान अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसान भरपाई साठी एकूण 23 कोटी 72 लाख 93 हजार रुपये निधी मंजूर केलेला आहे. या नुकसान भरपाईचा लाभ 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. गोंदिया, लातूर, नाशिक, पुणे, धुळे ,नंदुरबार ,जळगाव, ठाणे, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. या राज्य शासनाच्या निर्णयामुळे अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना खूप मोठी मदत होणार असून, त्यांना पुन्हा शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
हे वाचा : दूध अनुदानात वाढ
तात्काळ अनुदान वितरण प्रक्रिया
राज्य शासनाच्या आदेशानुसार, तात्काळ अनुदान प्रक्रिया केली जाणार आहे. या निधीचा लाभ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. या निधीचे वाटप शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या आधारे करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
शासनाच्या निर्णयात मोठा बदल
जानेवारी या महिन्यामध्ये शासनाने नवीन निर्णय घेतलेला होता, या अंतर्गत नुकसान भरपाईच्या निकषात मोठे बदल करण्यात आलेले होते. राज्य शासन या अगोदर फक्त 2 हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई दिली जात होती ,परंतु आता जिरयत, बागायत आणि बहुवार्षिक पिकांसाठी 3 हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई दिली जाणार आहे. या बदलामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाभ मिळेल.
विभागनिहाय अनुदान वाटप
अनुदानाचे विभाग निहाय वाटप करण्यात आले आहे, ज्यामुळे प्रत्येक भागातील नुकसानीचा विचार करून अनुदानाची मदत दिली जाणार आहे.
- नागपूर विभागासाठी 8 कोटी रुपये.
- पुणे विभागासाठी 2 कोटी रुपये.
- नाशिक विभागासाठी 7 कोटी रुपये.
- संभाजीनगर विभागासाठी 3 कोटी रुपये.
- कोकण विभागासाठी 3 कोटी रुपये.
हा निधी प्रत्येक भागातील नुकसानीचा विचार करून मंजूर करण्यात आलेला आहे. यामुळे सर्व भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल
अवकाळी पावसाची नुकसान भरपाई
शेतकऱ्यांच्या पिकांचे अवकाळी पावसामुळे मार्च ते मे 2024 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झालेले होते. यामुळे राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. अवकाळी पावसामुळे मार्च ते मे 2024 या कालावधीमध्ये झालेल्या नुकसान भरपाई साठी पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 44 कोटी 74 लाख 25 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये पुणे विभागासाठी 42 कोटी रुपये आणि नागपूर विभागासाठी 2 कोटी रुपये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हा निधी वाटप केला जाणार आहे.
फेब्रुवारी या महिन्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत
फेब्रुवारी 2024 मध्ये अवकाळी पावसामुळे बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. राज्य शासनाने बुलढाणा आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांसाठी विशेष मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 5 कोटी 5 लाख 7 हजार रुपये. तर यवतमाळ जिल्ह्यासाठी 17 लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे. या शासनाच्या निर्णयामुळे बुलढाणा जिल्ह्यातील आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या आर्थिक मदतीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या नुकसानीसाठी प्रतीक्षा
मराठवाडा आणि विदर्भातील ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मदतीने आश्वासन दिले होते, परंतु अजून या नुकसानीसाठी मदतीची प्रतीक्षा सुरू आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर मदत मिळावी म्हणून सरकारकडे मागणी केलेली आहे.
जुलै ऑगस्ट मधील शेतकऱ्यांना अनुदान शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.