पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेता येईल ? कोणती कागदपत्रे लागतात याबद्दल पहा सविस्तर माहिती

पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत देशातील 140 पेक्षा जास्त जातीच्या लोकांना लाभ दिला जाईल.या योजनेचा आज वर्षपूर्ती सोहळा असून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांशी आपले मनोगत व्यक्त करत आहेत.
देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी आज महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर असताना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्तर ते वर्धा येथील कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधत आहे. पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांची संवाद साधत असताना असे म्हणाले की, प्रधानमंत्री विश्वकर्मा या कार्यक्रमादरम्यान विश्वकर्मा योजनेच्या पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि ऋणपत्र देण्यात येतील.

पीएम विश्वकर्मा

हे वाचा : पीएम विश्वकर्मा प्रशिक्षण कसे दिले जाते

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

गेल्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी विश्वकर्मा ही योजना कारागीर आणि शिल्पकारांना मदत करण्यासाठी राबविण्यात आलेली होती. या योजनेअंतर्गत देशातील 140 हून अधिक जातीच्या कारागीर आणि शिल्पकारांना लाभ देण्यासाठी योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 प्रकारच्या व्यवसायातील 18 लाभार्थ्यांना ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमादरम्यान ऋणपत्रांचे वितरण करणार आहेत. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी एक टपाल तिकीटही जारी करतील.

पीएम विश्वकर्मा योजना सविस्तर माहिती

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही देशातील 140 हून अधिक जातीच्या व्यक्तींना लाभ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली होती. या योजनेअंतर्गत 140 हून अधिक जातीच्या कारागिरांना कमी व्याज दराने 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाते. या योजनेत 17 पेक्षा जास्त कारागीर आणि पारंपारिक कामगारांचा सहभाग आहे.

पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ कसा घेता येईल?

  • या योजनेत विश्वकर्मा समाजातील 140 हून अधिक जातींचा समावेश करण्यात आलेला आहे.
  • विश्वकर्मा या योजनेचा लाभ फक्त कारागिरांनाच दिला जाईल.
  • या योजनेत अर्ज करण्यासाठी केवळ कुशल कारागीर आणि कारागीर करू शकतील.
  • पण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरी करीत नसावा.
  • अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती कर भरत असेल तर या योजनेसाठी अपात्र ठरू शकेल.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा अर्ज करण्यासाठी खालील दिलेले कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • मोबाईल क्रमांक
  • जातीचे प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

अर्ज करण्याची पद्धत

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार व्यक्तीला तुमच्या जवळच्या CSC सेंटरवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

Leave a comment

Close Visit Batmya360