बस सुंदरी : आता ज्या नागरिकांना विमानांमधून प्रवास करणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी ही बस खूप फायदेशीर ठरणार आहे. या बस मध्ये पण तेवढेच सुविधा उपलब्ध आहेत . चहा -पाणी नाश्ता तसेच जसे एअर होस्टेस आहे, तसेच या बससाठी होस्टेस बस सुंदरी असणार आहे. विशेष म्हणजे या बससाठी डिझेलच्या बस पेक्षा तिकीट कमी असणार आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना बसमधून प्रवास करणे शक्य होईल.
नितीन गडकरी यांनी नवीन प्रोजेक्ट बद्दल माहिती दिलेली आहे. माहिती देत असताना ते म्हणाले सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करत असल्याचं म्हटलं.
इलेक्ट्रिकच्या बसेस मध्ये काही अडचण नाही , असे म्हणता नितीन गडकरी यांनी माहिती दिली.
माहिती देत असताना ते असे म्हणाले की, मी आता नवीन प्रोजेक्ट करतोय. या नवीन प्रोजेक्ट मध्ये टाटा कंपनीचं मी झेकोस्लेव्हिया येथे स्कोडा कंपनीसोबत जॉईंट व्हेंचर करून दिलेय . या प्रोजेक्ट मध्ये देशात इलेक्ट्रिक बस चालू केल्या जाणार आहेत. या बस मध्ये विमान सेवे प्रमाणे बस सुंदरी असणार आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एक कार्यक्रमांत दिली आहे.
एक देश एक निवडणूक संकल्पनेला मंजुरी
इलेक्ट्रॉनिक्स बस मध्ये सुविधा
बस सुंदरी इलेक्ट्रिक बस ही 18 ते 40 मीटर ची आहे. आणि ती बस ज्यावेळेस बस स्टॉप वर थांबेल त्यावेळेस इलेक्ट्रिक बस अर्ध्या मिनिटांमध्ये 40 किमीची चार्जिंग करेल. त्यामुळे कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही तसेच या बस मध्ये एक्झिक्युटीव्ह क्लास पण आहे, लॅपटॉप पण या बस मध्ये असेल. विशेष म्हणजे या बससाठी होस्टेस हे , जसे एअर होस्टेस आहे तसेच हे पण बस सुंदरी असणार आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या बसमध्ये चहा-पाणी, नाश्ता बस मधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मिळेल. विशेष म्हणजे, या बसचं तिकीट डिझेलच्या बस पेक्षा 30 टक्के कमी असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी ही बस खूप फायदेशीर ठरणार आहे. अशी माहिती नितीन गडकरी यांनी पुण्यात झालेल्या कार्यक्रमातून दिलेली आहे.
बस सुंदरी बसची पहिली सुरुवात कोठे होणार
या बसची पहिली सुरुवा नागपूर येथे होणार आहे. म्हणजे हा इलेक्ट्रिक बसचा पहिला प्रोजेक्ट नागपूरला सुरू होणार असून, त्यानंतर या इलेक्ट्रिक बसचा प्रोजेक्ट पुण्यामधील रिंग रोडवर हा प्रोजेक्ट सुरू करण्यात येईल.
एका भविष्यकाळामध्ये या इलेक्ट्रिक बसमुळे प्रदूषण मुक्त बनवण्यासाठी इथेनॉल चा वापर करणाऱ्या या सार्वजनिक वाहतुकीची सेवा सुरू करण्याबाबत नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केलेय.