बांबू लागवड अनुदान योजना शेतकऱ्यांना मिळणार बांबू लागवड करण्यासाठी अनुदान

बांबू लागवड अनुदान योजना

    bambu lagwad yojana मराठी तंत्रज्ञान माहिती या वेबसाईटवर शेतकऱ्यांसाठी विविध योजना विषयी माहिती बघत असतोत. तसेच आज आपण बांबू लागवड अनुदान योजना 2024 या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी बांबूंची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

 तसेच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवड करण्यासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली जाते. बांबू ही एक पटकन वाढणारी आणि बहु उपयोगी अशी वनस्पती आहे. बांबू या वनस्पती पासून विविध प्रकारच्या वस्तू बनविल्या जातात. जसे की फर्निचर, कागद आणि बांधकाम साहित्य. तसेच बांबूची लागवड ही हवामान सुधारण्यास मदत करेल.

   महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी शेती विषयी विविध योजना राबवण्यात आलेले आहेत. या योजना महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात वाढ व्हावी आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य मध्ये विविध योजनेची अंमलबजावणी करीत असते.

    महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे. या शेती व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी या योजनेअंतर्गत आर्थिक अनुदान देण्याचे ठरवले आहे.

   महाराष्ट्र राज्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांची शेती ही कोरडवाहू आहे. तसेही  प्रर्जन्य , वादळ, पाऊस  तसे पण इतर कारणामुळे शेतीचे व पिकांचे  मोठ्या   प्रमाणात  नुकसान होत असते. याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. याचे परिणाम मात्र शेतकऱ्यावर होत असतात. पिकाची नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीत उत्पन्न कमी होते .मग शेती करायला परवडत नाही .

   या सर्व गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र राज्य शासनाने वेगवेगळ्या योजनेअंतर्गत अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच आज आपण बांबू लागवडीसाठी किती अनुदान देण्यात येते याविषयी  सविस्तर माहिती पाहणार आहोत .

बांबू लागवड अनुदान योजना

बांबू लागवड अनुदान योजना माहिती

  bambu lagwad yojana बांबू लागवडीमुळे महाराष्ट्रातील  शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल व त्यांचे जीवनमान उंचाविण्यास मदत होईल. बांबू ही अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे या वनस्पतीस (Green Gold) असे पण म्हणतात. यामुळे बांबू ही वनस्पती सर्वसामान्य लोकांनालाकूड विषयी गरजा पूर्ण करण्यासाठी सहज उपलब्ध होणारे आणि परवडणारी वनस्पती आहे.

   यामुळे या वनस्पतीला गरिबाचे लाकूड असे पण म्हटले जाते. इतर वनस्पती पेक्षा बांबू ही पटकन वाढणारी वनस्पती आहे. यामुळे बांबूची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर उत्पन्न मिळून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.

यासाठी शेतकऱ्यांना उत्तम बांबू रोपांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. शेतामध्ये किंवा बांधावर बांबू लागवड करता यावी म्हणून राज्यातील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात त्यांच्या बांधापर्यंत बांबूच्या टिश्यू कल्चर रोपांचा पुरवठा व्हावा यासाठी अटल बांबू समृद्धी योजना सुरू करण्यात आलेली आहे.

योजनेचे नाव

बांबू लागवड अनुदान योजना bambu lagwad yojana

लाभ

 या योजनेअंतर्गत बांबूची शेती करण्यासाठी 80 टक्के अनुदान

योजनेचे लाभार्थी

या योजनेचे लाभार्थी राज्यातील शेतकरी

 उद्देश

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे.

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाइन 

बांबू लागवड अनुदान योजनेचे उद्दिष्टे

  •  महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा केला जाणार आहे.
  •  या योजनेअंतर्गत शेतीतून होणाऱ्या उत्पन्ना ला वाढ करण्यासाठी शेतामध्ये बांबू लागवड क्षेत्र वाढविणे.
  •  राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सदरविण्यासाठी शेतीच्या बांधावर टिश्यू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करणे
  •  या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल व त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि नवीन रोजगाराची संधी निर्माण करून देणे.
  •  शेती व्यवसायासोबत एक उत्तम जोडधंदा पर्याय उपलब्ध होईल.

बांबू लागवड अनुदान योजनेचे वैशिष्ट्ये

  •  बांबू लागवड अनुदान योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग खात्यामार्फत करण्यात आलेली आहे.
  •  बांबू लागवड अनुदान योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे.
  •  बांबू या रोपांची एकदा लागवड केल्यानंतर 40-100 वर्षापर्यंत लागवड करायची गरज नाही कारण की  बांबूचे रोपे दीर्घकाळ राहू शकतात.
  •  बांबू या पिकाला शेतीतल्या दुसऱ्या पिकासारखे काहीही नुकसान होत नसते विशेष म्हणजे या पिकाला कमी किंवा जास्त पावसाचे परिणाम होत नाहीत.
  •  शेत जमिनीची धूप व जलसंवर्धन या दोन्ही बाबींचा बांबू लागवडीमुळे शेतीस फायदा मिळण्यास मदत होईल .
  •  बांबू या पिकामध्ये कोंबा पासून तर पानापर्यंत 26 मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याची क्षमता आहे.
  •  शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करावी म्हणून त्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.

काय आहे बांबू लागवड अनुदान योजना

  • या योजनेतून जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना बांबू लागवड करायची आहे. त्यांनी आपले प्रस्तावा ग्रामरोजगार सेवकांमार्फत तयार करून व ग्रामपंचायतिचा ठराव घेऊन पंचायत समितीला सादर करावा लागेल.
  •  त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्यांचे संमती पत्र घेऊन शासनाने निर्धारित 2 केलेल्या नर्सरी मधून रोपे खरेदी करायचे आहेत. या रोपांची लागवड 15 बाय 15 या अंतरावर करावी लागेल. त्यानंतर लाभार्थी व्यक्तीस टप्प्याटप्प्याने सात लाखांचे अनुदान मिळेल.

बांबू रोपांची अशी करावी लागवड

  •  या पिकाची लागवड एक हेक्टर क्षेत्रात 1111 बांबू रोपांची लागवड करावी लागेल.
  •   यासाठी पात्र व्यक्तीस चार वर्षात 6.90 लाखांचे अनुदान देण्यात येते.
  •   पहिल्या वर्षी 2.76 लाख रुपये
  •  दुसऱ्या वर्षी 1.56 लाख रुपये
  •  तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी 76 हजार रुपयांच्या अनुदान मिळते.

बांबू रोपांची लागवडीचे फायदे

  •  बांबूची मुळे मजबूत असतात त्यामुळे मातीची धूप रोखण्यास मदत होते.
  •  बांबूचे झाड कार्बन डाय-ऑक्साइड शोषण घेत असते आणि ऑक्सिजन सोडत असते त्यामुळे हवा शुद्ध होते.
  •  बांबूचे झाड पाणी पाणी शोषून घेतात त्यामुळे पुराचा धोका टळतो आणि दुष्काळापासून बचाव होण्यास मदत होते.
  •  एक नवीन रोजगाराची संधी निर्माण होते.
  •  बांबू ही वनस्पती विविध उद्योगासाठी कच्चामाल आहे
  •  बांबू चा वापर इतर बांधकामासाठी केला जातो

अटल बांबू समृद्धी योजनेसाठी पात्र लाभार्थ्याच्या निवडीचे निकष

  •  अर्जदार व्यक्तीची 7/12 व 8 अ,गाव नकाशा.
  •  ग्रामपंचायत/नगरपरिषद/नगरपंचायत यांचेकडून रहिवासी असल्याबाबत दाखला.
  •  बांबूची लागवड करायच्या शेतामध्ये  ठिबक सिंचन आणि रोपे लहान असताना डुकरांपासून रोपांचे संरक्षण करण्यासाठी कुंपणाची सोय असल्याबाबतचे हमीपत्र.
  • आधार कार्ड झेरॉक्स
  •  अर्जदार व्यक्तीचे बँक खाते क्रमांक आणि पासबुकची झेरॉक्स.
  •  अर्जदार व्यक्तीने बँक खाते आधार क्रमांकाची जोडणे आवश्यक आहे.
  •  अर्जदार व्यक्तीच्या शेतामध्ये बांबू रोपांना पाणी देण्यासाठी विहीर/शेततळे/बोअरवेल असल्याबाबतचे हमीप
  • अर्जदार व्यक्तीला ज्या शेतामध्ये किंवा शेताच्या बांधावर बांबूची लागवड करायची आहे ते क्षेत्र नकाशावर हिरव्या रंगाने दर्शविणे.
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  •  विहित नमुन्यात बांबू रोपांची निगा व संरक्षण करण्याबाबतचे हमीपत्र.

अटल बांबू समृद्धी योजनेचे लाभार्थी

  •  महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी अटल बांबू समृद्धी योजनेसाठी पात्रता आहेत.

बांबू लागवड अनुदान योजना अंतर्गत फायदे

  • राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बांबू रोपाची लागवड करण्यासाठी जो खर्च होतो त्या खर्चाच्या ऐंशी टक्के रक्कम अनुदान शासनातर्फे देण्यात येईल.
  •  या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या उत्पादनात वाढ होऊन आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
  •  राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेऊन बांबू लागवडीसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
  •  राज्यातील शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण होईल आणि तसेच त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
  •  अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचा विकास होईल आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहतील.

बांबू लागवड अनुदान योजना आवश्यक पात्रता

  •  या योजनेत पात्रता असण्यासाठी अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  •  सिंचनाची सुविधा असावी लागेल.
  •  लाभार्थी व्यक्तीकडे बांबू लागवडीसाठी आवश्यक असलेली जमीन किमान 1 हेक्टर असावी.
  •  इतर कोणत्याही सरकारी अनुदान योजनेसाठी लाभार्थी नसणे.

बांबू लागवड अनुदान योजना अटी व नियम

  •  या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दिला जाईल.
  • या योजनेचा लाभ महाराष्ट्र बाहेरील शेतकऱ्यांना घेता येणार नाही
  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी  आणि बांबू रोपापासून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे ठिबक सिंचन स्वयं उपलब्ध असणे गरजेचे आहे.
  • रोपे लहान असताना त्याची निगा राखण्यासाठी आणि डुकरा पासून सुरक्षा ठेवण्यासाठी शेतीभोवती कुंपण सोय असणे गरजेचे आहे.
  •  बांबूची लागवड पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना जिओ टॅग/जी .आय .एस .द्वारे फोटो पाठवणे गरजेचे आहे.
  •  एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त एक हेक्टर (2.5 एकर) क्षेत्रातच लागवड करता येईल.
  •  या योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 600 बांबू रुपे (500 लागवड+100 मरअळी) देण्यात येतील
  •  अर्जदार व्यक्तीला अर्जासोबत शपथ पत्र देणे गरजेचे आहे.
  •  या अगोदर अर्जदार व्यक्तींनी केंद्र किंवा राज्य शासनाकडून कोणत्याही बांबू लागवडीसाठी अनुदान घेतलेले नसावे.
  •  या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला घेता येईल.

बांबू लागवड अनुदान योजना आवश्यक लागणारे कागदपत्रे

  •  आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  •  रहिवाशी प्रमाणपत्र
  •  ई-मेल आयडी
  •  मोबाईल नंबर
  •  पासपोर्ट आकाराचे फोटो
  •  बँक खाते क्रमांक

बांबू लागवड अनुदान योजना अर्ज करण्याची पद्धत

  • सर्वप्रथम अर्जदार व्यक्तीला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  •  वेबसाईटवर गेल्यानंतर होम पेज वरील Bamboo Board मध्ये Bamboo Application वर क्लिक करावे.
  •  त्यानंतर अर्जदार व्यक्तीसमोर बामु समृद्धी योजनेचा अर्ज ओपन होईल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून आवश्यक ती लागणारे कागदपत्रे जोडून अपलोड करावी.
  •  त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून तो अर्ज सबमिट करावा.
  •  अशाप्रकारे या योजनेची अर्ज प्रक्रिया तुम्ही करू शकाल.

Leave a comment