सिंचन अनुदान वाटपासाठी शेतकऱ्यांना करावी लागते प्रतीक्षा

सिंचन अनुदान: वाटपासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजून किती दिवस थांबावे लागणार आहे. असा प्रश्न सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानासाठी महिनो महिने थांबलेल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे. तसेच सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना आता सुमारे 72 कोटी पेक्षा जास्त निधीची गरज आहे . परंतु सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानासाठी शासनाने 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आह आहे . पण तोही निधी शेतकऱ्यांच्या खात्यात पडायला विलंब होत असल्याने सिंचन अनुदानाची लाभार्थी मनोगत व्यक्त करीत आहेत.

सिंचन अनुदान


कृषी आयुक्तालयाकडून सूक्ष्म सिंचनासाठी 123 कोटी 92 लाख रुपये पाच सप्टेंबर रोजी च्या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आले होते. परंतु त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी 5 कोटी 93 लाख 42 हजार रुपयांचा समावेश आहे. म्हणजेच, शासनाकडून 123 कोटी ९२ लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यातील बुलढाणा जिल्ह्यासाठी पाच कोटी 93 लाख 42 हजार रुपयांचा समावेश आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

धुळे- नंदुरबारला 18 कोटींचा निधी

राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षणप्रवण क्षेत्र तसेच, आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत सन 2024 – 25 मधील वित्त विभागामार्फत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या माध्यमातून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या 400 कोटीच्या कार्यक्रमास 16 मे 2024 रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे.

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना लाभ अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे

सिंचन अनुदानासाठी रखडलेले आर्थिक संकट

कृषी आयुक्तालयाकडून पुरेसे अनुदान घटकांसाठी प्राप्त निधीची मागणी व सध्याची स्थिती असलेल्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी पुरेसे अनुदान घटकांसाठी 123 कोटी 92 लाख रुपये निधी वितरित करायला मंजुरी देण्यात आली होती. परंतु त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी पाच कोटी 92 लाख आणि 42 हजार रुपये निधीचा समावेश आहे
हा निधी मंजूर होऊन 2 आठवडे झाले तरी पण अजून शेतकऱ्यांच्या हक्काची रक्कम अजूनही सिंचन अनुदानाच्या लाभार्थ्यांना मिळू शकलेली नाही.
यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे परंतु अजूनही सिंचन अनुदानाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना मिळालेला नाहीये.

Leave a comment